06/09/2026
नवरंगांची उमंग, महिला शक्ती संग !
प्रभाग क्र. १९ येथे शिवसेनेच्या माध्यमातून तसेच माझ्या आणि मा.नगरसेवक श्री. विकास कृष्णा रेपाळे यांच्या वतीने आयोजित “नवरंग २०२५” या भव्य उपक्रमाला महिलांनी मनःपूर्वक प्रतिसाद दिला असून, अनेक मैत्रिणींनी आपले आनंददायी अनुभव व भावना व्यक्त केल्या आहेत.
या उपक्रमाअंतर्गत दररोज नवरंग छायाचित्र स्पर्धा, १०८ नवदुर्गांचा सन्मान तसेच प्रभागातील विविध ठिकाणी हळदी-कुंकू समारंभ आणि रासगरबाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात रोजच्याच दिवशी महिलांसाठी मानाची पैठणी, चांदीची पैंजणं, आकर्षक साड्या आणि भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.
चला तर मग, आपण सर्व महिला एकत्र येऊन या नवरात्रीला आनंद, ऐक्य आणि उत्साहाने सजवूया!
Vikas Repale
Namrata Bhosale-Jadhav
#घटस्थापना #नवरात्री #विकासरेपाळे #नवरंग_नवरात्रीचे