Hanmant Jagdale

Hanmant Jagdale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hanmant Jagdale, Thane.

सभागृह नेते, ठाणे महानगरपालिका
शिवसेना विभागीय सहसंपर्क प्रमुख-पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर)
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा अविरत वारसा.
सातत्य विकासाचे, भविष्य लोकमान्यनगरचे!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अधर्माचा नाश व धर्माच्या विजयासाठी अवतरलेले भगवान श्रीकृष्ण यांच्या ...
04/09/2026

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अधर्माचा नाश व धर्माच्या विजयासाठी अवतरलेले भगवान श्रीकृष्ण यांच्या स्मरणाने जीवनात प्रेम, करुणा आणि सत्याचा प्रकाश फुलू दे. आजच्या पवित्र जन्माष्टमी दिनी श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे कर्तव्यनिष्ठ, निर्भय आणि धर्मनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा घेऊया.
#श्रीकृष्ण_जयंती

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक हाफ्सा जुबैर अन्सारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या कार्यातून जनसेवेची नवी उंच...
04/09/2026

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक हाफ्सा जुबैर अन्सारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या कार्यातून जनसेवेची नवी उंची गाठत राहावी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश आपल्या वाट्याला यावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

प्रभागातील अरुण क्रीडा मंडळ गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गोविंदा पथकाच्या प्रत्य...
04/09/2026

प्रभागातील अरुण क्रीडा मंडळ गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गोविंदा पथकाच्या प्रत्येक सदस्यामध्ये असलेली ऊर्जा आणि संघभावना निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी सहकारी नगरसेवक प्रशांत जाधवर, सहकारी नगरसेविका वनिता घोगरे, सहकारी नगरसेविका सरिता ठाकूर, मा. नगरसेवक दिगंबर ठाकूर, मा. नगरसेविका राधाबाई जाधवर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अरुण क्रीडा मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोविंदा पथकाला आगामी दहीहंडी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या कार्यातून जनसेवेची नवी उंच...
04/09/2026

ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या कार्यातून जनसेवेची नवी उंची गाठत राहावी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश आपल्या वाट्याला यावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

भारताच्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर विचारवंत 'दादाभाई नौरोजी' यांना ...
04/09/2026

भारताच्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर विचारवंत 'दादाभाई नौरोजी' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

भारताचे 'पितामह' म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांनी देशाच्या आर्थिक आणि राजकीय जागृतीमध्ये मोलाचे योगदान दिले.
#दादाभाई_नौरोजी

महाराष्ट्राची लोकधारेतून आपली लोकपरंपरा घरोघरी पोहोचवणारे लोकशाहीर, लोकनाट्यकार कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना ज...
03/09/2026

महाराष्ट्राची लोकधारेतून आपली लोकपरंपरा घरोघरी पोहोचवणारे लोकशाहीर, लोकनाट्यकार कृष्णराव गणपतराव तथा शाहीर साबळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.

#शाहीर_साबळे

भोईर कंपाउंड मित्र मंडळ, शास्त्रीनगर यांच्या गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्याचा मान मला मिळाला. यावेळी गोविंदा प...
02/09/2026

भोईर कंपाउंड मित्र मंडळ, शास्त्रीनगर यांच्या गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्याचा मान मला मिळाला. यावेळी गोविंदा पथकातील सर्व गोविंदांशी संवाद साधत त्यांना आगामी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. परिवहन समिती सदस्य संतोष पाटील देखील उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या जयघोषात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा हा उत्सव आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि उत्साहाचा उत्सव ठरो, हीच सदिच्छा!

भोईर कंपाउंड मित्र मंडळ, शास्त्रीनगर यांच्या गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्याचा मान मला मिळाला. यावेळी गोविंदा प...
02/09/2026

भोईर कंपाउंड मित्र मंडळ, शास्त्रीनगर यांच्या गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्याचा मान मला मिळाला. यावेळी गोविंदा पथकातील सर्व गोविंदांशी संवाद साधत त्यांना आगामी उत्सवासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. परिवहन समिती सदस्य संतोष पाटील देखील उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या जयघोषात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा हा उत्सव आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि उत्साहाचा उत्सव ठरो, हीच सदिच्छा!

मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कादंबरीकार, आपल्या तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भा...
02/09/2026

मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कादंबरीकार, आपल्या तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य लिहिणारे विष्णू सखाराम खांडेकर उर्फ वि.स. खांडेकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

आज ‘श्री क्लिनिक’च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून डॉ. सोनल सिंदकर (संखे) व त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन वैद्यकीय सेवेसा...
31/08/2026

आज ‘श्री क्लिनिक’च्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून डॉ. सोनल सिंदकर (संखे) व त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन वैद्यकीय सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत आहे. ‘श्री क्लिनिक’च्या माध्यमातून गरजू रुग्णांना उत्तम उपचार व विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळो, हीच सदिच्छा. या नव्या वाटचालीसाठी संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा!

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hanmant Jagdale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Hanmant Jagdale:

Shortcuts

Share