02/06/2026
आईच्या कुशीत हसणारं लेकरू,
क्षणात का नेलंस दूर तुझ्या छाया...
अजून शाळेच्या वाटा चालायच्या होत्या,
अजून स्वप्नांना पंख फुटायचे होते...
अजून आई-बाबांच्या डोळ्यातील आनंद व्हायचं होतं,
पण नियतीने सारेच हिरावून नेले...
तुझ्या जाण्याने घरातील हास्य हरपलं,
आंगणातील चैतन्य संपलं...
आज प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा
फक्त तुझीच आठवण काढत आहे...
देवेंद्र, तू गेला नाहीस,
तू प्रत्येक अश्रूत, प्रत्येक आठवणीत जिवंत आहेस...
पण तुझ्या निरागस हास्याची जागा
आता कोणच भरून काढू शकणार नाही...
काळजाचा तुकडा निघून गेला,
आईच्या डोळ्यातील प्रकाश हरवून गेला...
अजून आयुष्य जगायचं होतं,
अजून खूप मोठं व्हायचं होतं...
पण नियतीच्या एका घावाने
सर्व काही संपवून टाकलं...
भावपूर्ण श्रद्धांजली
कु. देवेंद्र आशिष सिंग
"तुझ्या निरागस हास्याच्या आठवणी
आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील..."
🕯️🌹 शोकाकुल : धडाकेबाज युवा प्रतिष्ठान व केंद्रे परिवार 🌹🕯️
ॐ शांती 🙏🏻