24/03/2026
उळे ग्रामपंचायत व शिवाय इण्डेन गॅस एजन्सी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत १०१ लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर व मोफत गॅस कनेक्शन वितरणाचा भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. शांभवीताई सचिनदादा कल्याणशेट्टी तसेच जिल्हा परिषद सदस्य मा. नेताजीभाऊ खंडागळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देत त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे धुरापासून मुक्ती मिळून महिलांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडत आहे.
कार्यक्रमास सरपंच सौ. अंबिका दशरथ आप्पा कोळी, शिवाय इंडियन गॅस एजन्सी सोलापूरचे संचालक श्री. सागर संजय जेकेटीया, श्री दशरथ आप्पा कोळी, प्राध्यापिका सौ. प्रतिमा खंडागळे, श्री. सोमनाथ गड्डू पटणे, श्री. महादेव पाटील, श्री. यशपाल वाडकर, श्री. सिद्धाराम हेले, श्री मधुकर चिवरे, श्री राजेंद्र गुंड, श्री राज साळुंखे, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनिषा शिंदे, सौ राजश्री सुभाष येणगुरे, श्री शरणाप्पा चौडे, श्री नागनाथ कोले, श्री मनोज गुंड, श्री दत्ता खंडागळे, श्री प्रवीण कासार, श्री माऊली डांगे, श्री सिताराम राठोड, श्री प्रवीण चौगुले, पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून, लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले.
#प्रधानमंत्री_उज्ज्वला_योजना #इण्डेन_गैस