25/12/2024
निती आयोगाच्या सामाजिक न्याय विभागाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर वर्किंग ग्रुप (समिती) स्थापन केला आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, विशेषतः पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यातून येणारे नैराश्य दूर करण्यासाठी उपाययोजना करणे हा या ग्रुपचा मुख्य उद्देश आहे.
या समितीमध्ये वेगवेगळ्या सहा केंद्रीय मंत्रालयाचे सचिव आणि IIT, IIM, AIIMS या महत्त्वाच्या संस्थांचे संचालक सदस्य आहेत. यावरुन या समितीचे महत्त्व आणि गांभीर्य आपल्या लक्षात येईलच. एव्हड्या वरिष्ठ स्तरावर मला काम करण्याची संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. खरं पाहिले तर पहिल्या पिढीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न माझ्यापेक्षा वेगळे किंवा चांगल्या प्रकारे कोणी सांगू शकेल असे मला वाटत नाही. या निमित्ताने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मला काम करण्याची संधी मिळते ही एक अभिमानाची गोष्ट आहे!!