Collector and District Magistrate Satara

  • Home
  • Collector and District Magistrate Satara

Collector and District Magistrate Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Collector and District Magistrate Satara, Government Official, near LIC Building, Powai Naka,, .

Official Facebook - District Collector Satara
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना, प्रशासकीय कार्यक्रम तसेच आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती उपलब्ध होण्यासाठी हे समाजमाध्यम खाते सुरू करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकारी- श्री. संतोष पाटील (भा.प्र.से) Our Responsibilities:
✅ Implementing government policies and development programs
✅ Ensuring law and order in the district
✅ Addressing public g

rievances and welfare initiatives
✅ Disaster management and emergency response
✅ Supervision of elections and census activities

We are committed to transparent and efficient governance, working towards the development and well-being of all citizens in Satara. Stay updated with the latest news, schemes, and events from the district administration.

🔹 Follow this page for regular updates and important announcements.

05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृती विषयक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व पर्यावरण संवर्धनाची माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

🌱 निसर्ग संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

#महसूलविभाग #महाराष्ट्रशासन

05/06/2026
🌿📚 ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या...
05/06/2026

🌿📚 ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन पुस्तिकेचे प्रकाशन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगर परिषद व ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृती विषयक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती, पक्षी व पर्यावरण संवर्धनाची माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

🌱 निसर्ग संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

#महसूलविभाग #महाराष्ट्रशासन

🚩 पालखी सोहळा सुखकर व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन सज्जदि. ०४ जून - संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्य...
04/06/2026

🚩 पालखी सोहळा सुखकर व सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज

दि. ०४ जून - संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची व पालखी तळांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

आषाढी वारी सुखकर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

#महसूलविभाग #महाराष्ट्रशासन #पालखी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा ,District Information Office ,Satara

📢 सातारा जिल्ह्यातील माहिती आता Public App वर!सातारा जिल्हा प्रशासनाच्या विविध योजना, उपक्रम, महत्त्वाच्या सूचना, प्रेस ...
04/06/2026

📢 सातारा जिल्ह्यातील माहिती आता Public App वर!

सातारा जिल्हा प्रशासनाच्या विविध योजना, उपक्रम, महत्त्वाच्या सूचना, प्रेस नोट्स, जनजागृती मोहिमा तसेच जिल्ह्यातील ताज्या घडामोडींची अधिकृत माहिती आता Public App वर उपलब्ध आहे.

👉 सर्व नागरिक, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी खालील लिंकद्वारे Public App डाउनलोड करून Collector Office Satara ला Follow करावे.

Public App Download Link-
http://publicapp.co.in/mobile

📱 Public App ID: https://public.app/deeplink/user/t46AnPTX8lbY1kAPZivqfOhYo4J2

अधिकृत व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आजच Follow करा आणि ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा.

अधिकृत व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आजच Follow करा आणि ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा.

📢 जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येत्या तीन महिन्यांत सुरू करा – सेवा हक्क आयुक्त मा. सुधा...
03/06/2026

📢 जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येत्या तीन महिन्यांत सुरू करा – सेवा हक्क आयुक्त मा. सुधाकर तेलंग यांचे निर्देश

सातारा, दि. ३ जून : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त मा. सुधाकर तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. सुधाकर तेलंग यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील तीन महिन्यांच्या आत आपले सरकार सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

तसेच जिल्ह्यात ‘आदर्श सेतू केंद्र’ आणि ‘आदर्श सेवा केंद्र’ उभारण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. नागरिकांना पारदर्शक, सुलभ आणि विहित कालावधीत सेवा मिळणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

मा. तेलंग यांनी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सेवा हक्क कायद्याची माहिती देणारे डिजिटल माहिती फलक लावणे, सेतू केंद्र चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे तसेच नगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याबाबतही निर्देश दिले.

“अपील प्रकरणांचा जलद निपटारा करा” असे आवाहन करताना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रथम व द्वितीय अपील प्रक्रियेचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांच्या सोयीसाठी सातारा जिल्ह्यात लवकरच ‘आदर्श सेतू केंद्र’ उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

03/06/2026

मौजे ऊळुंब, ता. वाई येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा गावभेट दौरा; विविध योजनांची माहिती व नागरिकांशी संवाद

वाई, दि. 01 जून 2026 : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मौजे ऊळुंब, ता. वाई येथे गावभेट दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या व स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौरादरम्यान जिल्हाधिकारी यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
यावेळी पात्र लाभार्थ्यांना रेशनकार्डांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजना, महसूल विभागाच्या सेवा तसेच नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला बचत गटांबाबत जनजागृती करण्यात आली तसेच महिलांना स्वावलंबन, उद्योग व शासकीय योजनांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गावभेटीदरम्यान प्रशासनाने लोकाभिमुख उपक्रम राबवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश देण्यात आला.

#महसूलविभाग #महाराष्ट्रशासन

Address

Near LIC Building, Powai Naka,

415001

Opening Hours

Monday 09:45 - 18:15
Tuesday 09:45 - 18:15
Wednesday 09:45 - 18:15
Thursday 09:45 - 18:15
Friday 09:45 - 18:15

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector and District Magistrate Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share