30/01/2017
कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा महाराष्ट्राला माहित
नसलेला इतिहास !
कर्मवीर भाऊराव पाटील हे राजश्री शाहू
महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील जैन
वस्तीग्रहातील विद्यार्थी होते.त्या काळात
राजश्री शाहू महाराजांचे निकटचे
सहकारी ना.भास्करराव जाधव
यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात'राज
श्री शाहू सत्यशोधक समाज'या नावाने
महात्मा जोतीराव फुले
यांच्या मुळच्या'सत्यशोधक चळवळीचे'पुनर्जीवन
करण्यात आले.
कर्मवीर भाऊराव पाटील या चळवळीतील एक
कट्टर आणि जहाल कार्यकर्ते म्हणून
उदयाला आले.स्वत: कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा एक'सत्यशोधकी जलसा'होता.ज्याद्वारे
ते महाराष्ट्रभर सत्यशोधक
समाजाच्या तत्वाचा प्रचार-प्रसार
करीत.कर्मवीर भाऊराव पाटील हे अत्यंत जहाल
वक्ते होते.त्याच्या या जहाल वकृत्वाचा एक
प्रसंग जो महाराष्ट्राला फारसा माहित
नाही तो आज मी आपणास सांगत आहे.
राजश्री शाहू महाराजांच्या नंतर
महाराष्ट्रातील'सत्यशोधक चळवळ'मंद झाली.व
कालांतराने यातील जेधे-जवळकर यांचे सारखे
सत्यशोधक
महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालील'र
ाष्ट्रीय स्वतंत्र्याच्या चळवळीत'सामील झाले
होते.त्यात कर्मवीर भाऊराव पाटील
यांचा हि समावेश होता.
महात्मा गांधीजींचा नथुराम गोडसे
या पुण्यातील सावरकरांचा शिष्य
असणार्या व आर.एस.एस
चा कार्यकर्ता असणार्या व्यक्तीने
गोळ्या घालून खून केल्या नंतर देशभर व
महाराष्ट्रभर ब्राम्हण विरोधी लाट निर्माण
झाली.त्यातून अनेक
ठिकाणी ब्राम्हणाच्या मालमत्तेवर ? बहुजन
समाजाने साहजिक हल्ले केले.जीवित
हाणी झाली नाही.आणि जी संपत्ती लुटली गेली होती ती सुद्धा क्रांतिसिंह
नाना पाटील यांच्या मुळे ब्राम्हणांना परत
देण्यात आली.
या सगळ्या परिस्थितीने भयभीत
झालेल्या पुण्यातील ब्राम्हण समाजाला धीर
देण्यासाठी त्यावेळचे महाराष्ट्राचे अत्यंत
सनातनी आणि जातीयवादी मुख्यमंत्री बाळासाहेब
खेर यांनी पुण्यात'शनिवार वाडा'येथे
सभा घेतली.व बहुजन समाजाला दम
देण्याची भाषा वापरली.त्या सभेत
बाळासाहेब खेर म्हणाले,"पुण्या तीलच नव्हे तर
देशातील समस्त ब्राम्हण
समाजाला मी बाळासाहेब खेर आश्वासन
देतो कि,हा बाळासाहेब खेर अंगात
रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत ब्राम्हणांचे बहुजन
समाजातील गुंडान पासून रक्षण करेल."
बहुजन समाजाला'गुंड'म्
हणणाऱ्या सनातनी बाळासाहेब खेर
चा समाचार कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी सातार्यात
महात्मा गांधीजींच्या हत्येच्या निषेधात
घेतलेल्या सभेत घेतला.कर्मवीर भाऊराव पाटील
त्या वेळेस म्हणाले,"अरे.......बाळास ाहेब ! बहुजन
समाजाला'गुंड'म्हणून तुझ्या जात बांधवाने केलेले
कृत्य झाकण्याचा प्रयत्न करू
नकोस.आणि तुझ्या अंगात असून असून किती रक्त
असणार ? आणि करून करून तू किती ब्राम्हणाचे
रक्षण करणार ? अरे........महात
्मा गांधीजींच्या खुनाची फळे
तुम्हा ब्राम्हणांच्या अनेक
पिढ्यांना भोगावी लागतील.तरी हि या अपराधातून
तुमची अजन्म सुटका होणार नाही !"
या सभेने चिडलेल्या मुख्यमंत्री बाळासाहेब खेर
यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या'रयत
शिक्षण संस्थेचे'शासकीय अनुदान बंद
केले.आणि रयत शिक्षण संस्थेची आर्थिक
कोंडी करण्याचा डाव टाकला.
हि घटना राष्ट्रसंत गाडगे महाराज
यांना समजली.मुख्यमंत् री बाळासाहेब खेर
पुण्यात आला असता गाडगे महाराज हातात
त्यांचा खराटा घेऊन थेट
त्यांच्या भेटीला गेले.आणि वरच्या मजल्यावर
बैठकीत बसलेल्या बाळासाहेब खेर ला खालीच
उभा राहून हाक मारली,"बाळासाहे ब ! तू
आधी बाहेर ये ! बाळासाहेबाने वरून खिडकीतून
हळूच पहिले.तर....... .! खाली गाडगे
बाबा हातात खराटा घेऊन आवेशात हाक मारत
होते.बाळासाहेब खेरची तर बोबडीच
वळली.बाळासाहेब गाडगे बाबांना न
भेटण्याचा प्रयत्न करू लागले.पण....... ! खालून
गाडगे बाबा च्या हाक सुरूच होत्या.बाकीचे
पुढारी गाडगे बाबांना शांत
करण्यासाठी धावले.पण....... !
बाबांच्या त्या रुद्ररुपाला आडवे
जाण्याची कुणाची हिंमत होई ना.शेवटी भीत
भीत बाळासाहेब खेर
खाली आले.आणि बाबांच्या पाया पडण्याचा प्रयत्न
करू लागला.तसे बाबा म्हणाले,"मागे हो !
आणि मला सांग....... का रे बाळा ! तू
त्या भाऊराव पाटलाच्या शाळांचे पैसे
का कापले ?"
आणि चांगले झाड झाड झाडले.त्यावर
बाळासाहेब खेर यांनी सातार्यात भाऊराव
पाटील माझ्या बद्दल असे असे बोलले म्हणून
सांगितले.त्यावर गाडगे बाबा म्हणाले,"तू
पुण्यात आधी काय दिवे पाजळले होते ?"यावर
बाळासाहेबांनी गाडगे
बाबांची माफी मागितली.आणि तेथेच रयत
शिक्षण संस्थेचे अनुदान परत सुरु करण्याचे पत्रच
गाडगे बाबांच्या हातात दिले.
रयत शिक्षण संस्थेच्या अनुदान बंदच्या काळात
गाडगे
बाबांनी आणि त्यांच्या शिष्या संप्रदायाने
महाराष्ट्र भरातून
देणग्या गोळा केल्या होत्या.आणि क्रांतीसिंह
नाना पाटील यांनी हि धुळे ब्रिटीश
खजिन्यातील लुटीच्या रक्कमेतील काही रक्कम
देणगी म्हणून दिली होती.