Satara Police

Satara Police This is the Official Satara Police page. This is our way of reaching out to you, to know you

कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे. प्रजेची उन्नती व व...
31/05/2026

कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे. प्रजेची उन्नती व विकास साधताना सामाजिक शांतता, समता, न्याय, स्वातंत्र्य या मुलभूत मानवी मूल्यांना अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्राधान्य दिले आणि जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. प्रजेच्या कल्याणासाठी अविरत धडपड करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

#राजमाताअहिल्यादेवीहोळकर

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई  4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटार सायकल व 2 मोबाईल असा...
30/05/2026

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व फलटण शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई

4 किलो 69 ग्रॅम गांजा, मोटार सायकल व 2 मोबाईल असा एकूण 2,01,725/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पो.उ.नि. परितोष दातीर यांचे पथक तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांविरुद्ध गोपनीय बातमी प्राप्त करून छापा कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

दिनांक 29/05/2026 रोजी कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी फलटण येथे नेमली असताना पो.उ.नि. परितोष दातीर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, दोन इसम हे बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्र. MH 12 HX 2649 वरून रावरामोशी पुलाजवळ कॉर्नरला मौजे धुळदेव ता. फलटण गावचे हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.नि. विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.उ.नि. परितोष दातीर, पोलीस अंमलदार अमोल माने, जयवंत खांडके, अजय जाधव, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम यांचे पथक तयार करून सदर पथकास स्थानिक फलटण शहर पोलीस ठाणेकडील अधिकारी पो.नि. अरविंद काळे, स.पो.नि. मिठू जगदाळे व त्यांचेकडील पोलीस अंमलदार यांची मदत घेऊन संयुक्तपणे छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व फलटण शहर पोलीस ठाणेकडील पथक यांनी संयुक्तपणे मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी दोन संशयित इसम मिळून आले. त्यांचेकडे असणारे पिशवीमध्ये 4 किलो 69 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ* मिळून आला असून तो गुन्ह्याचे पुढील तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मध्ये* श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. अरविंद काळे, स.पो.नि. श्री मिठू जगदाळे, नितीन शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा कडील पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार मंगेश महाडिक, अमोल माने, अजय जाधव, जयवंत खांडके, अमित झेंडे, नवनाथ कदम, अजित कर्णे, अमित सपकाळ, ओंकार यादव, स्वप्निल दौंड, धिरज महाडिक, प्रविण पवार, संकेत निकम, विजय निकम, आनंदा भोये तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार रुक्मिणी माने, बापूराव धायगुडे, निखिल गायकवाड, गणेश आवघडे, अतुल बडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

🚩 प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर 🚩स्वातंत्र्यवीरविनायक दामोदर सावरकरयांना जयंतीदिनानिमित्त विनम्र ...
28/05/2026

🚩 प्रखर राष्ट्रभक्त आणि थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर 🚩

स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर
यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...! 💐

देशभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारे सावरकरांचे विचार सदैव प्रेरणादायी राहतील.

#स्वातंत्र्यवीरसावरकर #सावरकरजयंती #राष्ट्रभक्त #क्रांतीकारक

वाठार स्टेशन पोलिसांचा मोठा दणका;जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात आरोपी ताब्यातमा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा....
27/05/2026

वाठार स्टेशन पोलिसांचा मोठा दणका;
जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात आरोपी ताब्यात

मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी वाठार पोलीस ठाणे हददीतील पाहीजे / फरारी आरोपी, चोरीच्या गुन्हयातील आरोपी तसेच अवैध्य धंदयांवर कारवाई करुन अवैध्य धंदे चालु न देण्यासाठी सक्त सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांचे अनुषंगाने श्री सुशिल भोसले सहायक पोलीस निरीक्षक वाठार पोलीस स्टेशन यांनी त्याचे डी.बी. पथकास योग्य असे मार्गदर्शन करुन पाहीजे/फरार आरोपी, चोरीच्या गुन्हयातील आरोपी तसेच अवैध्य धंदयांवर कारवाई करणेचे आदेश देवुन त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या.

दिनांक २७/०५/२०२६ रोजी श्री. सपोनि सुशील भोसले यांना गोपणिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की मौजे बिचुकले ता. कोरेगाव जि. सातारा गावचे हददीत पळसवाट नावाचे शिवारात काही लोक पैसे लावुन तीन पानी जुगार खेळत आहेत. अशी माहीती मिळताच त्यांनी पोउनि सातव व डी. बी. पथकास बोलावुन सदर ठिकाणी जावुन खात्री करा व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोहवा उदय जाधव यांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन पोलीस स्टाफ व पंच सदर ठिकाणी जावुन अचानक छापा टाकुन ७ इसम जागीच पकडुन त्याचे नाव गाव विचारून त्यांचेकडे मिळुन आलेले जुगाराचे साहित्य, मोटार सायकली, डावात व अंगझडतीत मिळुन आलेली रोख रक्कम असा एकुण ३,४५,५००/- रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेवर वाठार पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची खबर पोकॉ. विठठल काळे यांनी दिली असुन गुन्हयाचा तपास पोहवा जितेंद्र शिंदे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, पोउनि. गहिनीनाथ सातव, पोउनि नितीन भोसले, पो. हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पोलीस अंमलदार विठठल काळे, प्रतिक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे, महीला पोलीस हवा. दिपाली गुरव माधुरी दिक्षीत, आशा देशमुख, पुजा जगताप यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे.

27/05/2026

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.

कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.

#महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर

मानवतेची सेवा आणिप्रेमाचा संदेश देणाराहा ईदचा सणआपल्या आयुष्यातआनंद आणि समृद्धी घेऊन येवो… ✨🌙बकरी ईद (ईद-उल-अजहा)निमित्त...
27/05/2026

मानवतेची सेवा आणि
प्रेमाचा संदेश देणारा
हा ईदचा सण
आपल्या आयुष्यात
आनंद आणि समृद्धी घेऊन येवो… ✨🌙

बकरी ईद (ईद-उल-अजहा)
निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना
हार्दिक शुभेच्छा! 🤝💐

ुबारक #शुभेच्छा

🚩 हिंदवी स्वराज्याचे निष्ठावान शिलेदार 🚩स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे पराक्रमी योद्धेवीर बाजी पासलकरयांना स...
24/05/2026

🚩 हिंदवी स्वराज्याचे निष्ठावान शिलेदार 🚩
स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे पराक्रमी योद्धे
वीर बाजी पासलकर
यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...! 🙏
त्यांचे शौर्य, निष्ठा आणि स्वराज्याप्रती असलेले समर्पण सदैव प्रेरणादायी राहील.
#वीर_बाजी_पासलकर #स्मृतिदिन #हिंदवी_स्वराज्य #छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठा_इतिहास िवराय 🚩

वाठार पोलीस स्टेशनची दमदार कारवाईघरफोडीच्या गुन्हयातील आरोपीं आवळल्या मुसक्यामा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा....
23/05/2026

वाठार पोलीस स्टेशनची दमदार कारवाई
घरफोडीच्या गुन्हयातील आरोपीं आवळल्या मुसक्या

मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी वाठार पोलीस ठाणे हददीतील दाखल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणेकरीता सक्त सूचना दिल्या व योग्य मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे श्री सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, वाठार पोलीस स्टेशन यांनी त्याचे डी. बी. पथकास मार्गदर्शन करुन पाहीजे /फरार आरोपी व चोरीच्या गुन्हयातील आरोपीची शोध मोहीम सुरु केली.

दिनांक ०८/०२/२०२६ रोजी वाठार पोलीस स्टेशन हददीत सोनके ता. कोरेगाव गावचे हददीत घरफोडीची घटना घडली होती त्याबाबत वाठार पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.२८/२०२६ भारतिय न्याय संहिता कलम ३३४ (४) ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपणिय माहिती प्राप्त झाल्याने आरोपीबाबत गोपणिय माहीती सपोनि सुशिल भोसले सहायक पोलीस निरीक्षक यांना मिळताच त्यांनी सदरची माहितीबाबत डीबी पथकास सूचना व मार्गदर्शन करून सदर आरोपी हा पाच वर्षापुर्वीच्या गुन्हयात पाहीजे असल्याने त्यास पकडुन त्यांचेकडे अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली त्यावेळी त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील चोरुन नेलेले सोन्याचे, चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक सो सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा. श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुशिल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, पोउनि. गहिनीनाथ सातव, पोउनि. नितीन भोसले, सपोफौ. बुवासो वाघमारे, पो.हवा. उदय जाधव, जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, किशोर गिरी, दिपक साबळे, प्रकाश चव्हाण, सहदेव तुपे पोलीस अंमलदार विठठल काळे, प्रतिक देशमुख, प्रकाश मेळावणे, विजय ढाणे, माणिक कोळपे महीला पोलीस हवा. दिपोली गुरव माधुरी दिक्षीत, आशा देशमुख, पुजा जगताप यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा. उदय जाधव हे करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी:- अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन बेकायदेशिर कॉल सेंटरद्वारे संपर्क साधून फ...
23/05/2026

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी:-
अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन बेकायदेशिर कॉल सेंटरद्वारे संपर्क साधून फसवणुक करणारी टोळी जेरबंद

श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी बोगस कॉल सेंटर चालवणारे यांचेवरती लक्ष ठेऊन नागरिकांची डिजिटल अरेस्ट द्वारे फसवणूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
दिनांक 22/5/2026 रोजी श्री विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी हा कोरेगाव ते रहिमतपूर जाणारे रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावर श्रीसाई लॉजिस्टीक्स ॲन्ड कन्सल्टंस हे बोगस कॉल सेंटर सुमारे फेब्रुवारी २०२६ सुरु असून सदर कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरीकांना तुम्ही ॲमेझॉन वरुन एक वस्तू ऑर्डर केली आहे त्याचे पैसे दयावे लागतील अशी भिती दाखवून त्यांची फसवणूक करण्याकरीता बोगस कॉल सेंटर चालविले जात आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवून दिनांक 23/05/2026 रोजीचे 00.55 वा. मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी 17 इसम व 4 महिला बेकायदेशिर श्रीसाई लॉजिस्टीक्स ॲन्ड कन्सल्टंस एलएलपी या नांवचे कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन ॲपद्वारे संपर्क साधुन, तुम्ही अमॅझॉन कंपनीतुन वस्तु ऑर्डर केली आहे ती वस्तु तुम्हाला लवकर मिळण्याकरीता आम्ही तुम्हाला सहकार्य करु असे सांगतात त्यावेळी समोरील अमेरिकन इसमाने त्यांना मी ऑर्डर केलेली नाही असे सांगितल्यास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एक बनावट मेसेज व त्यामध्ये बनावट ऑर्डर क्रमांक पाठवून देवून, सदर ऑर्डर तुम्हाला नको असल्यास तुम्ही एखादया मॉलमध्ये जावून तेथील गिफ्ट व्हाउचर खरेदी करुन त्याद्वारे आम्हाला डॉलर स्वरुपात रक्कम पाठवा असे सांगतात त्यास अमेरिकन नागरिकाने नकार दिल्यास त्यास डिजिटल अरेस्ट होण्याची भिती घालून गिफ्ट व्हाऊचरद्वारे त्यांच्याकडून मोठया प्रमाणात डॉलर स्वरुपात पैसे प्राप्त करुन त्यांची फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झालेने नमुद इसमांच्या विरुध्द कोरेगांव पोलीस ठाण्यास गु.र.नं.183/2026 भान्यासंक 316(2), 318(4), 61(1), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(क), 66(ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक, अरुण देवकर पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, लैलेश फडतरे, जयवंत खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, संदिप पाटील, राजु कांबळे, अरुण पाटील, स्वप्नील शिंदे, प्रविण कांबळे, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, महेश निर्मळ,संकेत निकम, धीरज महाडीक, रोहित निकम, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, मपोहवा शकुंतला सणस, अधिका वीर यांनी सहभाग घेतला आहे.

21/05/2026

This , spill conversations, not confidentials.

Your OTP is meant for you only.



Address

76, MALHAR PETH
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satara Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Satara Police:

Share