10/06/2026
१५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले. त्यामुळे मराठा साम्राज्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.कारण त्यांना स्वतःचा थेट वारस (पुत्र) नव्हता. शाहू महाराजांच्या मृत्यू पूर्वी महाराणी ताराबाईंनी रामराजे हे आपले नातू (शिवाजी ७ वे यांचे पुत्र) असल्याचे सांगुन त्यांना सातरच्या गादीचा पुत्र म्हणून पुढे केले. त्या नुसार रामराजे सातारच्या गादीवर बसले.पण गादीवर बसल्या नंतर महाराणी ताराबाई आणि नवीन छत्रपती रामराजे यांच्यात मतभेद सुरु झाला.सातारच्या दरबारातील अंतर्गत गटबाजीने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर मराठा साम्राज्यात अशी काही घटना घडली ज्याने इतिहास कायमचाच बदलला.
⚓ १५ सप्टेंबर १७५० सांगोला करार. ⚓
कागदाच्या एका कपट्याने बदलला स्वराज्याचा पट. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे नानासाहेब पेशवे आणि छत्रपती रामराजे यांच्यात हा अधिकृत करार झाला. या करारा नुसार छत्रपतींनी मराठा साम्राज्याचे सर्व अधिकृत प्रशासकीय,लष्करी आणि आर्थिक अधिकार अधिकृतपणे पेशव्यांच्या स्वाधीन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले अष्टप्रधान मंडळ या करारा नंतर केवळ कागदावरच राहीले आणि सर्व खात्यांचे प्रमुख थेट पेशव्यांनाच उत्तरदायी बनले.सांगोला करारा नंतर छत्रपती हे केवळ मराठा साम्राज्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रमुखच राहिले. राजाची सही आणि शिक्का ( सिक्का - कट्यार ) महत्वाचा होता मात्र निर्णय घेण्याची ताकत संपली होती.सर्व सत्ता पुण्यात, सैन्य भरती, सरदारांच्या नियुक्त्या,तह,लढाया आणि खंडणी गोळा करण्याचे सर्व अधिकार पुण्याच्या शनिवार वाड्यात केंद्रीत झाले.
हा करार स्वराज्याची एकसंघता टिकवण्यासाठी पेशव्यांनी घेतलेला गरजेचा निर्णय होता की छत्रपतींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन केलेली मोठी राजकीय फितूरी होती ?
अशीच काहिशी आजची परिस्थिती आहे...................................................✍️ संजय गाडे.
( उदयनराजे जवाब दो या आवाज दो । आत्मक्लेश आंदोलनसमयी किल्ले प्रतापगडावरुन - ६ जून २०२६ शिवराज्याभिषेक दिनी )