एकच ध्यास, ग्राम विकास

एकच ध्यास, ग्राम विकास सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेमार्फत ग्रामीण समाजाच्या शाश्वत विकासासाठी

हनुमान नगर स्वछता मोहीम फुलाजी अभ्यासिका/बाजीप्रभू अभ्यासिकावार:-शनिवारदिनांक:-20/9/2025 आज आम्ही  आमच्या अभ्यासिकेजवळ त...
21/09/2025

हनुमान नगर
स्वछता मोहीम
फुलाजी अभ्यासिका/बाजीप्रभू अभ्यासिका
वार:-शनिवार
दिनांक:-20/9/2025
आज आम्ही आमच्या अभ्यासिकेजवळ तसेच ग्रामपंचायतसमोरचा परिसर स्वच्छ करून घेतला.सर्व मुलांनी आपापल्या घरून झाडू तसेच खराटे आणले होते. मुलांनी आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करून कचराकुंडीत
टाकले.

एकूण विद्यार्थी:-30
अभ्यासिका प्रमुख:-०२- निशा मोंढे, सोनाली बरफ
युवा प्रमुख:- निखिल अंधेर

गाव सशक्तीकरण वर्गात ठरल्याप्रमाणे हनुमान नगर येथील युवा प्रमुख निखिल अंधेर याने गाव स्वच्छता मोहीम राबविली.

बोईसर विभागातील युवा प्रमुखांना लोकनायक बिरसा मुंडा डिजिटल लर्निंग सेंटरच्या प्रशिक्षक सुगंधा काठ्या ताई मार्गदर्शन करीत आहेत.

#ग्रामविकासप्रकल्प
#समुत्कर्ष_अभ्यासिका
#सेवा_सहयोग_फाऊंडेशन

🌹 पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा – वाणीपाडा 🌹दिनांक: 28/08/2025वार: गुरुवारवेळ: रात्री 9.30 ते 11.00🙏 नमस्कार 🙏आज वाणीपाडा ...
03/09/2025

🌹 पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा – वाणीपाडा 🌹
दिनांक: 28/08/2025
वार: गुरुवार
वेळ: रात्री 9.30 ते 11.00

🙏 नमस्कार 🙏

आज वाणीपाडा येथे पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.
आजच्या आधुनिक काळात आपली परंपरा, संस्कृती आणि पारंपरिक नृत्य विस्मरणात चालले आहेत. पुढच्या पिढीला आपली ओळख जपून ठेवण्यासाठी अशा परंपरांचा सन्मान व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

या उद्देशाने बोईसर शिगाव वाणीपाडा येथे ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये गावातील पुरुष, महिला, तरुण तसेच मुले-मुली यांनी उत्साहात भाग घेतला आणि पारंपरिक गौरी नृत्य सादर केले.

नृत्यामध्ये उत्तम वादक, उत्तम गायक, पारंपरिक वेशभूषा आणि उत्तम नर्तक या चार प्रकारच्या बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेत 35 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला तर प्रेक्षकांची संख्या 100 पेक्षा जास्त होती.

एक तास चाललेल्या रंगतदार नृत्यस्पर्धेनंतर विजेत्यांना गावातील कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये 1)प्रथम क्रमांक( उत्तम गायक)-नवशी विष्णू उंबरकर
2)द्वितीय क्रमांक-पारंपरिक वेशभूषा-पार्वती तांडेल
3)तृतीय क्रमांक -उत्तम वादक -रवींद्र उंबरकर 4)चौथा क्रमांक -उत्तम नर्तक आणि गायक - सुरज सुमडा यांना मिळाले.यानंतर प्रेक्षकांना आपली संस्कृती व परंपरा जपण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

शेवटी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या कि त्यांनी त्यांचा गावात प्रथमच अशी स्पर्धा झाली ज्यामधे गावातील पुरुष आणि स्रियानी सहभाग घेतला. नेहमी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुण मुलेच सहभागी होतात पण आज सर्व स्रिया आणि पुरुष सहभागी झाले होते, काही लोकांना माहित नव्हते बक्षीस मिळणार आहे,त्यांना अंदाजही नसताना त्यांना बक्षीस मिळाले त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धेचा आनंद घेतला.

🌹 पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा – वाणीपाडा 🌹दिनांक: 28/08/2025वार: गुरुवारवेळ: रात्री 9.30 ते 11.00वाणीपाडा येथे पारंपरिक ...
31/08/2025

🌹 पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा – वाणीपाडा 🌹
दिनांक: 28/08/2025
वार: गुरुवार
वेळ: रात्री 9.30 ते 11.00

वाणीपाडा येथे पारंपरिक गौरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.

आजच्या आधुनिक काळात आपली परंपरा, संस्कृती आणि पारंपरिक नृत्य विस्मरणात चालले आहेत. पुढच्या पिढीला आपली ओळख जपून ठेवण्यासाठी अशा परंपरांचा सन्मान व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.

या उद्देशाने बोईसर शिगाव वाणीपाडा येथे ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये गावातील पुरुष, महिला, तरुण तसेच मुले-मुली यांनी उत्साहात भाग घेतला आणि पारंपरिक गौरी नृत्य सादर केले.

नृत्यामध्ये उत्तम वादक, उत्तम गायक, पारंपरिक वेशभूषा आणि उत्तम नर्तक या चार प्रकारच्या बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेत 35 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला तर प्रेक्षकांची संख्या 100 पेक्षा जास्त होती.

एक तास चाललेल्या रंगतदार नृत्यस्पर्धेनंतर विजेत्यांना गावातील कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली त्यामध्ये 1)प्रथम क्रमांक( उत्तम गायक)-नवशी विष्णू उंबरकर
2)द्वितीय क्रमांक-पारंपरिक वेशभूषा-पार्वती तांडेल
3)तृतीय क्रमांक -उत्तम वादक -रवींद्र उंबरकर 4)चौथा क्रमांक -उत्तम नर्तक आणि गायक - सुरज सुमडा यांना मिळाले.यानंतर प्रेक्षकांना आपली संस्कृती व परंपरा जपण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

शेवटी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या कि त्यांनी त्यांचा गावात प्रथमच अशी स्पर्धा झाली ज्यामधे गावातील पुरुष आणि स्रियानी सहभाग घेतला. नेहमी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुण मुलेच सहभागी होतात पण आज सर्व स्रिया आणि पुरुष सहभागी झाले होते, काही लोकांना माहित नव्हते बक्षीस मिळणार आहे,त्यांना अंदाजही नसताना त्यांना बक्षीस मिळाले त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धेचा आनंद घेतला.

- सुगंधा काठ्या, लोकनायक बिरसा मुंडा डिजिटल लर्निंग सेंटर, शिगाव, सेवा सहयोग फाऊंडेशन.

🌼✨ सणासुदीची खास सजावट – ‘आम्रपाली’ तोरण ✨🌼💚 सेवा सहयोग फाऊंडेशनच्या ग्राम विकास प्रकल्पातून ग्रामीण महिलांनी प्रेमाने व...
20/08/2025

🌼✨ सणासुदीची खास सजावट – ‘आम्रपाली’ तोरण ✨🌼

💚 सेवा सहयोग फाऊंडेशनच्या ग्राम विकास प्रकल्पातून ग्रामीण महिलांनी प्रेमाने व कौशल्याने तयार केलेले 🌿 आंब्याच्या पानांच्या नक्षीचे, कपड्याचे मोहक तोरण 🌿
🎉 सण-श्रावणात आपल्या घराचे सौंदर्य वाढवा, आणि एकाच वेळी

👉 स्वदेशी व ग्रामीण उद्योगांना चालना द्या
👉 प्लास्टिकमुक्त सजावटीचा संकल्प पाळा

💰 किंमत: फक्त ₹300 (कुरीयर चार्जेस वेगळे लागतील.)

✅ टिकाऊ
✅ हाताने तयार केलेले
✅ पारंपरिक, आकर्षक आणि पर्यावरणपूरक

📞 ऑर्डरसाठी संपर्क: रवींद्र नम - 9028607723

💐 आपण खरेदी केलेले प्रत्येक तोरण ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेला बळ देतं आणि प्लास्टिकविरहित सण साजरे करण्यास मदत करतं. 💐

#महिला_सक्षमीकरण_उपक्रम ्यास_ग्राम_विकास
#स्वदेशी_संकल्प

आरोग्य रक्षक - आरोग्य शिबीर ठिकाण - पाटिलपाडा, शिगाव, पालघर.  दिनांक -16 ऑगस्ट 2025वार - शनिवार वेळ -10 ते 12दिनांक 16 ऑ...
19/08/2025

आरोग्य रक्षक - आरोग्य शिबीर

ठिकाण - पाटिलपाडा, शिगाव, पालघर.

दिनांक -16 ऑगस्ट 2025

वार - शनिवार

वेळ -10 ते 12

दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी पाटीलपाडा येथे आरोग्य रक्षक प्रकल्प द्वारे शिबीर आयोजित करण्यात आले होते. 33 रुग्णांना औषधं देण्यात आली त्यापैकी 4 महिला, 3 पुरुष, 26 मुलं होती. ग्रामस्थांना अंगदुखी, सर्दी-खोकला, ताप इत्यादि आजार असल्याचे निदर्शनास आले.

आरोग्य रक्षक उपक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांना मोफत आयुर्वेदिक औषधे पुरविण्यात येतात, त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवण्यात येतात.

्यास_ग्राम_विकास
#आरोग्यरक्षक
#ग्रामविकासप्रकल्प
#सेवासहयोगफाऊंडेशन

**आरोग्य रक्षक उपक्रम – आरोग्याची सेवा, गावकर्‍यांच्या दारोदारी**पाटील पाडा ग्रामविकास प्रकल्पांतर्गत कार्यरत असणाऱ्या आ...
12/07/2025

**आरोग्य रक्षक उपक्रम – आरोग्याची सेवा, गावकर्‍यांच्या दारोदारी**

पाटील पाडा ग्रामविकास प्रकल्पांतर्गत कार्यरत असणाऱ्या आरोग्य रक्षकांनी मागील महिन्यात एकूण **171 कुटुंबांना घरोघरी भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस** केली. यामध्ये **99 कुटुंबांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या लहानसहान आजारांवर आयुर्वेदिक औषधांची मदत** करण्यात आली. या गोळ्या **नियमित वापरासाठी मार्गदर्शनासह** विनामूल्य दिल्या गेल्या.

**आरोग्य रक्षक उपक्रम** म्हणजे गावपातळीवर एक आरोग्यसंधान — जेथे छोट्या आजारांवर तत्काळ उपचार मिळतात आणि नागरिकांचे आरोग्य नियमित तपासले जाते. या उपक्रमामुळे **गावकऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली** असून **आजारी पडल्यावर शहरात जाण्याची गरज कमी झाली आहे**. घरपोच सेवा मिळत असल्यामुळे गावकरी आता स्वतःहून आरोग्यविषयक माहिती विचारतात, औषधे नियमित घेतात आणि **स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊ लागले आहेत**.

हा उपक्रम **Hexaware कंपनीच्या CSR निधीच्या मदतीने, सेवा सहयोग फाउंडेशनमार्फत, 2024 पासून राबवला जात आहे.** एक आरोग्यसेवा देणारा उपक्रम म्हणून याचे **स्थानिक पातळीवर मोठे महत्त्व निर्माण झाले आहे.** गावातील महिलांनी आणि वृद्धांनी विशेषतः या सेवेला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

# # # कामाचा परिणाम :

* 171 कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण आणि सल्ला
* 99 कुटुंबांना आयुर्वेदिक औषधांची मदत
* गावकऱ्यांमध्ये आरोग्याबाबत संवाद आणि जागरूकता वाढली
* किरकोळ आजारांवर त्वरित उपाय उपलब्ध

# # # CSR उपक्रमाचा परिणाम :

* आरोग्य सेवा गावात पोहोचली
* प्राथमिक टप्प्यावरच्या आजारांचे नियंत्रण
* आरोग्य रक्षक म्हणून स्थानिक महिलांना रोजगार व सन्मान
* CSR मार्फत गावात सकारात्मक सामाजिक बदल

आरोग्य रक्षक उपक्रम हा **CSR व ग्रामीण आरोग्याच्या एकत्रित प्रयत्नांचा उत्कृष्ट नमुना** ठरतो आहे. या उपक्रमामुळे **गावकऱ्यांचे आरोग्य सशक्त होत आहे** आणि **आरोग्यसेवेबाबत त्यांचा विश्वास वाढत आहे.**

्यास_ग्राम_विकास
#आरोग्य_रक्षक
#ग्रामीणआरोग्य
#ग्रामविकासप्रकल्प
#सेवा_सहयोग_फाऊंडेशन

आय. ए. व्ही. एल. कंपनी सीएसआरच्या माध्यमातून माणगाव येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी वक्रतुंड रेसिडेन्सी, माणगाव येथे उद्योज...
01/07/2025

आय. ए. व्ही. एल. कंपनी सीएसआरच्या माध्यमातून माणगाव येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी वक्रतुंड रेसिडेन्सी, माणगाव येथे उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत 'बेसिक ब्युटीशियन' कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मयूरी झेरॉक्स सेंटरच्या Advocate मयूरी तार्लेकर, गीतांजली ट्रेडर्सच्या तृप्ती वडके आणि प्रोफेशनल कम्प्युटर सर्विसच्या रतिक्षा वाढवळ इत्यादी मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.

हे प्रशिक्षण प्रशिक्षक प्रतीक्षा गाडे यांच्यामार्फत दिले जाणार आहे. तर सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेच्या माणगाव येथील समन्वयक अश्विनी समेळ यांच्याकडे सदर कार्यक्रमाच्या समन्वयाची धुरा आहे!

#उद्योजकता_विकास
#एकच ध्यास_ग्राम_विकास
#ग्राम_विकास_प्रकल्प
#सेवा_सहयोग_फाऊंडेशन

सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेचे कार्यकारी समिती सदस्य तसेच संस्थेच्या ग्राम विकास प्रकल्पाचे मार्गदर्शक श्री. रविंद मिठे या...
01/07/2025

सेवा सहयोग फाऊंडेशन संस्थेचे कार्यकारी समिती सदस्य तसेच संस्थेच्या ग्राम विकास प्रकल्पाचे मार्गदर्शक श्री. रविंद मिठे यांनी दिनांक 30 जून 2025 रोजी सफाळे विभागातील दहिवाळे या गावातील 'गाव विकास' समीतीची भेट घेतली. सफाळे विभागातील 8 गावांमध्ये सध्या गाव विकास गतीविधीचे कारी सुरू आहे. यापैकी दहिवाळे गावातील महिलांनी अनेक महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून एकजूट दाखवीत आपल्या गावाची समिती तयार केली. ही समिती गेली 3 महीने विभागाच्या प्रत्येक गाव सशक्तीकरण वर्गात, शेती शाळा अभ्यास वर्गात सहभागी असते.

रविंद मिठे यांनी महिलांनी सुरू केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच आपल्यातील एकजूट कशी आपल्या कामाला सहाय्य करू शकेल यावर महिलांना मार्गदर्शन केले. तसेच यापुढे या समितीने गावातील लोकांचा आणि पुरुषांचाही सहभाग विकासाच्या कामात वाढवला पाहिजे अशी सुचा केली. पुढील एका वर्षात या समितीने स्वतःच्या गावात स्कूल बॅग शिवण्याचा उद्योग सुरू करण्याविषयी ध्येय ठेवले पाहिजे, असे देखील सुचवण्यात आले.

सध्या अभ्यासिका, शेती शाळा आणि कौशल्य विकास व जल संसाधन पुनरुज्जीवन या विषयांवर गावात समितीमार्फत कार्य सुरू आहे.

लवकरच या गावात लोकोपयोगी आणि विकासकार्याचा उदय होताना दिसून येईल यात शंका नाही!

्यास_ग्राम_विकास
#गाव_सशक्तीकरण_वर्ग
#ग्राम_विकास_प्रकल्प
#सेवा_सहयोग_फाऊंडेशन

दरवर्षी २५० हून अधिक विद्यार्थी बोईसर मधल्या स्वामी विवेकानंद सेवा केंद्र मधील संजय हेगडे कौशल्य विकास केंद्रामार्फत संग...
25/06/2025

दरवर्षी २५० हून अधिक विद्यार्थी बोईसर मधल्या स्वामी विवेकानंद सेवा केंद्र मधील संजय हेगडे कौशल्य विकास केंद्रामार्फत संगणक प्रशिक्षण घेतात.

#कौशल्यविकास
#संजयहेगडेकौशल्यविकासकेंद्र
#स्वामीविवेकानंदसेवाकेंद्र
#सेवासहयोगफाऊंडेशन

खोपोली, खालापूर परिसरात १० नव्या किशोरी वर्गांचे उद्घाटन नुकतेच पार पडले. सौ. किशोरी सुखदरे ही ताई जबरदस्त पुढाकार घेत क...
24/06/2025

खोपोली, खालापूर परिसरात १० नव्या किशोरी वर्गांचे उद्घाटन नुकतेच पार पडले. सौ. किशोरी सुखदरे ही ताई जबरदस्त पुढाकार घेत काम करीत आहे.

पहिल्यांदाच या परिसरातील गावांमध्ये फिरण्याचा योग आला.

#किशोरीविकासप्रकल्प

#सेवासहयोगफाऊंडेशन

Address

Bodan Pada
Saphala
401102

Alerts

Be the first to know and let us send you an email when एकच ध्यास, ग्राम विकास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to एकच ध्यास, ग्राम विकास:

Share

Category