Sangita patil ZP

Sangita patil ZP जिल्हा परिषद अध्यक्ष,सांगली जिल्हा �

श्री नागनाथ बिरुदेव मंदिर, कापुसखेड येथे आयोजित आरती व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आल...
18/05/2026

श्री नागनाथ बिरुदेव मंदिर, कापुसखेड येथे आयोजित आरती व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात आदर्श निर्माण करावा व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, पालक व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक व सामाजिक वातावरणात संपन्न झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठेपिरान ता. मिरज, जि. सांगली यांच्या वतीने ...
16/05/2026

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठेपिरान ता. मिरज, जि. सांगली यांच्या वतीने आयोजित “राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम” अंतर्गत “राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे” निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहून डेंग्यू प्रतिबंध, स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सदस्या मा. मीनाताई पाटील, प्रशांत दादा अवधूत, मिरज पंचायत समितीचे सभापती, तन्वीताई कमलेकर, पंचायत समिती सदस्य अरविंददादा कवठेकर, विनायक दादा जाधव, स्नेहलताई पाटील, कवठेपिरानच्या सरपंच अनीताताई माने, दुधगावच्या सरपंच पाखरेताई, तुंगच्या सरपंच विमलताई सूर्यवंशी, कसबे डिग्रजचे सरपंच रियाजभाई तांबोळी, सावळवाडीच्या सरपंच माणगावे ताई, माळवाडीचे सरपंच आदिकदादा कांबळे, कवठेपिरणचे उपसरपंच सुशांत दादा देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रभारी हिवताप अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Maharashtra HealthDepartment

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangita patil ZP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share