11/06/2025
🌿 वटपौर्णिमेनिमित्त भाजप महिला मोर्चाचा अनोखा उपक्रम 🌿
आज वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने भाजप महिला मोर्चाच्या वतीने विश्रामबाग येथील महावीर गार्डनमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. वटसावित्रीच्या व्रतानिमित्त उपवास करून, पारंपरिक वेशभूषेत सजून आलेल्या महिलांनी एकत्र येत वडाचे पूजन केले.
हिंदू संस्कृतीत वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहेच, पण या सणामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे. याच विचारातून, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. गीतांजली ढोपे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि ईशाताई साठे यांच्या सहकार्याने ५१ महिलांना तुळशीचे रोप देऊन औटी समारंभ पार पडला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन, आणि तुळशीसारख्या औषधी वनस्पतींचे आरोग्यदायी महत्त्व याची जाणीव निर्माण करणे हाच होता.
कार्यक्रमावेळी भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया संयोजिका सौ. सुष्मिता कुलकर्णी व ज्योचीताई माने यांचीही उपस्थिती लाभली.
या उत्साही आणि प्रेरणादायी उपक्रमासाठी उपस्थित महिलांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली.