ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी Om Sai Mitra Mandal

  • Home
  • ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी Om Sai Mitra Mandal

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी  Om Sai Mitra Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी Om Sai Mitra Mandal, Social service, Salvi stop, Ratnagiri, .

Academy of Writology..@🏤पत्ता: - ॐ साई मित्र मंडळ, माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या समोर, साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड, रत्नागिर...
30/12/2025

Academy of Writology..
@🏤पत्ता: - ॐ साई मित्र मंडळ, माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या समोर, साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड, रत्नागिरी.

Badminton Summer Camp in Ratnagiri..
15/04/2024

Badminton Summer Camp in Ratnagiri..

📣रत्नागिरी शहरामध्ये एकूण १५ कलांचे एकाच छत्राखाली प्रशिक्षण मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे.. कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत आ...
28/12/2023

📣रत्नागिरी शहरामध्ये एकूण १५ कलांचे एकाच छत्राखाली प्रशिक्षण मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे.. कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत आणि कला विद्यालय.

🟠 हस्ताक्षर सुधारणा वर्ग ( वय- ८ वर्ष पासून पुढे)

🔴 प्रशिक्षिका: सौ. साक्षी सांड्ये

🔴 प्रवेशासाठी संपर्क: ८९८३६६५०४३

🔴 क्लासची वेळ - मंगळवार आणि गुरुवार, संध्याकाळी ५ ते ६

🏤पत्ता: - ॐ साई मित्र मंडळ, माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या समोर, साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड, रत्नागिरी.
📞संपर्क: ९७३०३१०७९९

25/11/2023

१ नाही, २ नाही तब्बल १४ वर्षं झाली! कशाला ?? अहो आपल्या रत्नागिरीतल्या संगीत-कला विद्यालयाला… संपूर्ण कोकणातील एकमेव अशा एकाच छताखाली १६ प्रकारच्या कला-क्रीडांचे प्रशिक्षण देणा-या ‘अन्नपूर्णा प्रभू संगीत-कला विद्यालया’ला…

नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड येथे ॐ साई मित्रमंडळ १९९५ पासून गेली २९ वर्षे कार्यरत आहे. मंडळाच्या वतीने दर वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी मंडळ सुप्रसिद्ध आहे.

२००९ साली मंडळाचे कार्यकर्ते श्री. गौरांग आगाशे यांच्या कलाप्रेमी मनात ‘एकाच छताखाली संगीत आणि विविध कलांचे शिक्षण देणारे विद्यालय असावे’ अशी कल्पना आली. त्यांनी ती श्री. अनंत आगाशे यांना सांगितली. त्यांनी ती कल्पना उचलून धरली आणि ॐ साई मित्रमंडळाच्या कार्यकारिणीसमोर मांडली. सर्वांनाच ही कल्पना आवडली आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले. रत्नागिरीच्या संगीत तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रीतील गुणिजनांना संपर्क झाले. विद्यालयाला लागणारी वाद्ये व अन्य सामग्री यांची जुळवाजुळव होऊ लागली. रत्नागिरीतील प्रतिष्ठित नागरिक श्री. विजयशेठ प्रभू यांना या संगीत-कला विद्यालयाची संकल्पना सांगताच त्यांनी आनंदाने मदतीचा हात दिला. ॐ साई मित्रमंडळाचे कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी होतेच..

आणि २५ नोव्हेंबर २००९ या दिवशी ॐ साई मित्रमंडळाच्या अंतर्गत ‘अन्नपूर्णा प्रभू संगीत-कला विद्यालया’चा शुभारंभ झाला.

स्वतः अनंत आगाशे योगशिक्षक असल्याने योगवर्गापासून विद्यालयातील वर्गांना सुरूवात झाली. मग तबला, सिंथेसायझर आणि हार्मोनियम यांचे वर्ग चालू करण्यात आले. त्यापाठोपाठ शास्त्रीय गायन, ढोलकी, कथक आणि भरतनाट्यम् नृत्य यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला. हळूहळू, बासरी, गिटार, ऑक्टोपॅड ,पखवाज असे वर्गही चालू झाले. संगीताबरोबरच चित्रकला वर्ग सुरू झाला. अशीच घोडदौड चालू असतांना बॅडमिंटन, बुद्धिबळ, ताईक्वांदो या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले.

असे एकाच छताखाली १६ प्रकारचे वर्ग असलेले संपूर्ण रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये ‘अन्नपूर्णा प्रभू संगीत-कला विद्यालय’ हे एकमेव विद्यालय आहे. ही आपणा सर्व कोकणवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे!!

विद्यालयाची लोकप्रियता जसजशी वाढत जात आहे, तसतसे वर्ग वाढवण्यात येऊ लागले आहेत. खास लोकाग्रहास्तव योगवर्गाची महिला बॅच सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बॅडमिंटनची सकाळ आणि संध्याकाळची बॅच आहे. सुगम गायनाचे धडे गिरवणारी बालगटाची बॅचही सुरू झाली आहे.

या सर्व वर्गांमध्ये वयाचे बंधन नाही. विद्यालय सर्वांसाठी खुले आहे. तसेच इतक्या प्रकारचे वर्ग असूनही आठवडाभर विद्यालयाचे कामकाज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालू असते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्यांची प्रगती आजमावण्यात येते. विद्यालयातच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपापल्या कलांचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो आणि रंगमंचावर वावरण्याचा आत्मविश्वास येतो.

हे सर्व शक्य होत आहे ते विद्यालयाला लाभलेल्या गुणवान् अध्यापक वर्गामुळे! तसेच पालक वर्गाचीही मोलाची साथ मिळते. त्यामुळेच विद्यालयात आजघडीला ५०० हून अधिक विद्यार्थी विविध कला-क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण घेत आहेत.

या १४ वर्षांच्या प्रवासात विद्यालयाला लाभलेले माजी प्रशिक्षक श्री. विजय रानडे, श्री. नितीन लिमये, श्री. श्रीकांत काळे, श्री. विश्वेश टिकेकर, श्री. चैतन्य पटवर्धन, श्री. मंगेश मोडक, श्री. शैलेश गोवेकर, श्री. समीर कांबळे, श्री. निशांत लिंगायत, श्री. प्रथमेश शहाणे, श्री. अभय भावे, सौ. मिताली भिडे, सौ. प्राजक्ता लेले-जोगळेकर, सौ. श्वेता सावंत-शिंदे…. तसेच विद्यालयात अध्यापनकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानायला हवेत.

आज विद्यालयाची धुरा समर्थपणे पेलणारे आमचे सहकारी आहेत - श्री. अनंत आगाशे, श्री. मिलिंद गोवेकर, श्री. मंदार जोशी, श्री. संदीप कर्लेकर, श्री. राजू धाक्रस, श्री. राम कररा, श्री. मंगेश चव्हाण, श्री. शार्दूल मोरे, श्री. अमोल शिवलकर, श्री. विवेक सोहनी, सौ. सायली मुळ्ये-दामले, सौ. प्राची निमकर-रानडे, सौ. दीप्ती आगाशे, सौ. सौख्यदा वैशंपायन, सौ. राधिका कवितके, कु. स्वरांगी भागवत, कु. नेहा गोखले आणि सौ. तेजस्वी सावंत.. आणि या सर्वांना एका माळेत गुंफणारे श्री. गौरांग आगाशे….तसेच मंडळाचे श्री पराग सावंत , श्री संदीप मगदुम , श्री संजीव शेंडगे , श्री प्रशांत सावंत , सौ सपना घोसाळकर ,श्री प्रवीण मलुष्टे , श्री अरुण साळवी तसेच सर्व ओम साई मित्र मंडळाचे सदस्य...

बघता बघता विद्यालयाला १४ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विद्यालयातील गिटार प्रशिक्षक श्री. मिलिंद गोवेकर यांनी ‘theme song’ आणि प्रत्येक क्लासचा video करूया अशी कल्पना मांडली आणि त्यांनी सर्व शिक्षकांची कला एकत्रितपणे सादर होणारे ‘video theme song’ तयार केले. ते विद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या शुभप्रसंगी सादर करत आहोत. नक्की पहा..!!

Credits-
🔹Composed and Produced by - Milind Govekar
🔹Lyrics - Sayali Mulye-Damle
🔹Recordist - Omkar Sawant
🔹Recording studio - S Kumar Sound Services
🔹Special Thanks - Udayraj Sawant, Radhika Bhide
🔹DOP- Paresh Rajiwale, Saiprasad Pilankar
🔹Editor- Mayur Dali & Kavita Dali
🔹Graphic Design- Uday Patankar
🔹Social Media Partner: Digi Impulse

Link to the Video Theme Song:

https://youtu.be/zElK3hQy4uQ

📍Academy's page Link:

https://www.facebook.com/PrabhuVidyalay

📍Academy's Youtube Channel Link:

https://www.youtube.com/

अन्नपूर्णा प्रभू संगीत-कला विद्यालयाच्या अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. गौरांग आगाशे (9730310799)

*ॐ साई मित्रमंडळात रंगला दांडिया रास*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼नवरात्रीचा सांगता आणि दसरा सणाचे औचित्य साधून ॐ साई मित्रमंडळाने २४ Octob...
25/10/2023

*ॐ साई मित्रमंडळात रंगला दांडिया रास*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

नवरात्रीचा सांगता आणि दसरा सणाचे औचित्य साधून ॐ साई मित्रमंडळाने २४ October २०२३ या दिवशी ‘दांडिया रास’चे आयोजन केले होते.

मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. प्रवीणशेठ मलुष्टे तसेच मंडळाचे सदस्य श्री. संजय सुर्वे आणि श्री आस्वाद साळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रंगमंच आणि नटराज पूजन करण्यात आले.

‘दांडिया रास’चे हे सलग चौथे वर्ष होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.. सोबत होता आपल्या मंडळाचे सदस्य आणि रत्नागिरीतील प्रथितयश S kumar sound service चे Sound Engineer श्री. उदयराज सावंत यांचा *Musical Stars* हा live band आणि आकर्षक Digital lights… तसेच किबोर्ड - राजु किल्लेकर व अमेय किल्लेकर , रोटो ड्रम - सुयोग कांबळे , कच्छी ढोल - केदार लिंगायत, ऑक्टोपड -शार्दूल मोरे , बेस गिटार - सुमित जाधव , lights - योगेश म्हस्के , साऊंड - ओंकार सावंत व गायक- सुरज नाईक ,-अभिजित भट , दीप्ती आगाशे , कश्मिरा सावंत , कविता दळी , विडिओ ऍड - मयूर दळी व श्री. प्रशमेश साळवी यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला बहार आली.

लहान मुलेसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक वेशभूषा करून आली होती. प्रत्येक round नंतर उत्कृष्ट नर्तक, वेशभूषा इत्यादीसाठी निवडलेल्या सहभागींना *Unbox* कडून मंडळाच्या Discount Coupons देण्यात आली. खाद्यप्रेमींसाठी ‘आगाशे Foodcourt’ चा stall रश्मीन व रुचा दुर्वे यांनी सज्ज केला होता. अध्यक्ष श्री अनंत आगाशे ,खजिनदार - पराग सावंत व ओम साई चे युवा कार्यकर्ते ओम साई. डेकोरेटर्स चे अमरेश सावंत , lights साठी श्री गुडेकर व सिद्धिविनायक कॅटरिंग यांनी खूप मेहनत घेतली . सर्व संगीतप्रेमींनी दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद लुटला

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

23/10/2023

दस-याला ॐ साई मित्रमंडळात दांडियाचा जल्लोष !
दसरा म्हणजे सीमोल्लंघन, दसरा म्हणजे शस्त्रपूजन तसेच सोन्यासोबतच आनंद लुटणे.. त्या निमित्ताने ॐ साई मित्रमंडळ २४ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० या वेळात आयोजित करत आहे ‘दांडिया रास’.
कोरोनाच्या आधी आयोजित केलेल्या दांडिया रासला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या वर्षीही तसाच किंबहुना त्याहूनही जास्त प्रतिसाद देऊन उत्साहाने सहभागी व्हा !
💫 आपल्या साथीला आहे live orchestra with डिजिटल साऊंड आणि लाईट्स.
💫लहान मुलांसाठी फॅन्सी दांडिया असेल. त्यासाठी मुलांनी फॅन्सी ड्रेस घालून यायचे आहे. त्यानंतर लहान मुलांचा फॅन्सी दांडिया राऊंड होईल.
💫 विनामूल्य प्रवेश
💫 आगाशे foodcourt तर्फे निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी food stall आहेच.

ॐ साई दांडिया रास २०२३
15/10/2023

ॐ साई दांडिया रास २०२३

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरीगणेशोत्सव २०२३ 🎉
28/09/2023

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी
गणेशोत्सव २०२३ 🎉

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरीगणेशोत्सव २०२३ 🎉🚩 आनंदवनभुवनी  🚩२५ सप्टेंबर २०२३.
27/09/2023

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी
गणेशोत्सव २०२३ 🎉🚩 आनंदवनभुवनी 🚩२५ सप्टेंबर २०२३.

26/09/2023

ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी
गणेशोत्सव २०२३ 🎉
संगीत रजनी (अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय) दिनांक: २४/९/२३.

Address

Salvi Stop, Ratnagiri

415639

Telephone

+919730310799

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ॐ साई मित्र मंडळ, नाचणे, रत्नागिरी Om Sai Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share