13/08/2026
**चाळीस हजार वेतनाची नोकरी द्या;
नाहीतर बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये अनुदान द्या!**
— प्राध्यापक नामदेवराव जाधव
तरुणांनो, हा प्रश्न फक्त नोकरीचा नाही… हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे!
शिक्षण घेऊनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांच्या प्रश्नाला आता केवळ आश्वासनांमध्ये न ठेवता, तो ठोसपणे शासन आणि समाजासमोर मांडण्याची गरज आहे.
चाळीस हजार रुपये मासिक उत्पन्नाची रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या; अथवा रोजगार मिळेपर्यंत बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपये मासिक अनुदान द्या, ही भूमिका घेऊन प्राध्यापक नामदेवराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन, प्रबोधन आणि आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाचा उद्देश केवळ घोषणा देणे नाही; तर तरुणांना रोजगाराच्या उपलब्ध संधी, आवश्यक कौशल्ये, रोजगार मिळवण्यासाठीची तयारी, स्वयंरोजगाराच्या शक्यता आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन मिळवून देणे हा आहे.
तरुणांनो, फक्त नोकरीची वाट पाहू नका… आपल्या हक्कासाठी आवाज उठा!
आपल्या शिक्षणाचा, कौशल्याचा आणि कष्टाचा योग्य मोबदला मिळणे हा तरुणांचा न्याय्य प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक बेरोजगार तरुणाने या आंदोलनात सहभागी होऊन आपला प्रश्न मांडला पाहिजे.
छावा वाहन चालक मालक कामगार संघ या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत असून, बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाला संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे.
संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ शेलार, प्रदेशाध्यक्ष श्री सोमनाथ भाऊ कलाटे, शहर अध्यक्ष श्री हिरामन गवारे, उपाध्यक्ष श्री संजय दौंडकर, सचिव स्वप्निल भालेकर, , अजय साळवे , विनायक ढोबळे , रुपेश घोटकुले , अविनाश जोगदंड, रवींद्र लंके , दिलीप लोंढे , चेतन राऊत, समीर इनामदार, इरफान सय्यद, सोमनाथ आवारे , निखिल येवले…मारुती बोराटे .., निखिल मुळुक, संदीप बोरगे .. दिपक कुसाळकर..तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड व परिसरातील सर्व बेरोजगार, शिक्षित आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
📅 १५ ऑगस्ट २०२६
⏰ सकाळी ११.०० वा.
📍 विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी