02/06/2026
विचारांना दिशा देणारं नेतृत्व, संघटनेला बळ देणारी शिकवण आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भारलेला प्रेरणादायी माहोल! 🚩✨
भारतीय जनता पार्टी, पुणे शहर आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला.
संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्यासाठी, जनतेपर्यंत विविध जनकल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तसेच विकासाभिमुख विचार अधिक दृढ करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आपले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री मा. सौ. माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर मा. सौ. मंजूषाताई नागपुरे, शहराध्यक्ष मा. श्री. धीरज घाटे, मा. श्री. रवींद्र साठे, आमदार मा. श्री. सिद्धार्थ शिरोळे, आमदार मा. श्री. हेमंतभाऊ रासने, आमदार मा. श्री. योगेश टिळेकर, आमदार मा. श्री. सुनील कांबळे, आमदार मा. श्री. भिमराव तापकीर, माजी आमदार मा. श्री. जगदीश मुळीक, सभागृह नेते मा. श्री. गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. श्रीनाथ भीमाले तसेच सर्व सहकारी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 💫
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनकल्याणकारी योजनांची दिशा आणि आपले मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली. 🚩
सौ. स्वप्नाली नितीन पंडित
नगरसेविका, पुणे महानगरपालिका
सदस्य, शहर सुधारणा समिती.