Bhausaheb Bhoir

Bhausaheb Bhoir विरोधी पक्षनेता तथा नगरसेवक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Corporator: PCMC
Leader of opposition PCMC Corporation
President: A.B.M.

Natya Parishad, Pimpari - Chinchwad
Vice-President: A.B.M. Natya Parishad, Mumbai
Ex-Member: DPDC, Pune

सूर, संगीत आणि सन्मानाचा अविस्मरणीय सुवर्णक्षण!२१ वा प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कार!​अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपर...
29/08/2026

सूर, संगीत आणि सन्मानाचा अविस्मरणीय सुवर्णक्षण!
२१ वा प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कार!

​अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत प्रतिष्ठित २१ वा 'आशा भोसले पुरस्कार' सोहळा आज श्री मोरयाच्या पावन भूमीत अत्यंत दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.
​या मंगलप्रसंगी जगप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना भारतीय संगीत सूर्य पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या शुभहस्ते मानाचा २१ वा आशा भोसले पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. विजय सूर्यवंशी,आमदार अमितजी गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मा. योगेशजी बहल, नगरसेवक गौरव घुले, माझे ज्येष्ठ बंधू श्री. कृष्णकुमार गोयल, पुरस्कार निवड समितीचे श्री. दिलीप काटकर सौ. वंदना गांगुर्डे, माझ्या कन्या रुणाल साकला, मानसी भोईर घुले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच बहुसंख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
यावेळी श्रेया घोषाल यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. स्वरांचे तेज, दिग्गजांची उपस्थिती आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभलेली ही सुरमयी संध्याकाळ समस्त पिंपरी-चिंचवडकरांच्या कायम स्मरणात राहील यात शंका नाही. आशा भोसले पुरस्काराची ही शृंखला अशीच दिवसेंदिवस बहरत राहो, हीच नटराज चरणी प्रार्थना!

29/08/2026

आशा भोसले पुरस्कार - 2026

28/08/2026
आपल्या परिसरातील समस्त खानदेश बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माता कानबाई उत्सवात’ उपस्थित राहून कानबाई मातेचे...
24/08/2026

आपल्या परिसरातील समस्त खानदेश बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माता कानबाई उत्सवात’ उपस्थित राहून कानबाई मातेचे मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.
​खानदेशी संस्कृतीचा अनमोल वारसा आणि समृद्ध परंपरेची ओळख करून देणारा हा उत्सव अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रोट, पुरणपोळीचा नैवेद्य, पारंपरिक गाणी आणि बांधवांचा एकोपा यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
​या मंगल प्रसंगी सर्व परिसरातील खानदेशी बांधवांची भेट झाली, त्यांच्याशी संवाद साधता आला याचे मनापासून समाधान वाटले. मातेच्या चरणी हीच प्रार्थना की सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो!
​आयोजन समिती व सर्व खानदेश बांधवांचे मनापासून आभार व मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🚩

बालकलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील अभिनय क्षमतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘बाल रंग...
23/08/2026

बालकलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील अभिनय क्षमतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘बाल रंगभूमी परिषद, ‘पुणे शाखा’ आणि पिंपरी-चिंचवड शाखा’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा २०२५’ चा बक्षीस वितरण समारंभ आज शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, “नाट्यछटा हा बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि त्यांच्यातील कलागुणांना दिशा देणारा एक प्रभावी माध्यम आहे. कै. सौ. मनीषा भोईर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य करत आहे.”
आपल्या चिमुकल्या दोस्तांनी रंगमंचावर सादर केलेल्या विविध नाट्यछटा, त्यांचा अप्रतिम अभिनय आणि चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून मन अत्यंत प्रसन्न झाले. बालकलाकारांमधील या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हाच या आयोजनामागील आमचा मुख्य उद्देश होता.
​या सोहळ्यास नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, गुणी शिक्षकवृंद, मार्गदर्शक, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पालक आणि उत्साही बालचमूंची उपस्थिती लाभली. सर्व विजेत्या व सहभागी चिमुकल्या कलाकारांचे मनापासून कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या बाल रंगभूमी परिषदेच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि स्थानिक आयोजकांचे मनापासून आभार!

Address

Bhoirnagar
Pune
411033

Telephone

+919922501504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhausaheb Bhoir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhausaheb Bhoir:

Shortcuts

Share