BJP Bhosari

Call Website

BJP Bhosari Official Page of BJP Bhosari (PCMC)
भारतीय जनता पार्टी, भोसरी अधिकृत फेसबुक पेज

🚩 संघटनात्मक एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद… विजयासाठी भाजपा सज्ज!पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभू...
17/10/2026

🚩 संघटनात्मक एकजूट, कार्यकर्त्यांची ताकद… विजयासाठी भाजपा सज्ज!

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्व मंडल अध्यक्ष, प्रभारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव आणि श्री. कौत्सुभ मुरलीधर गावडे यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

निवडणुकीची रणनीती, मतदारांशी संपर्क, संघटनात्मक समन्वय आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करत विजयाच्या ध्येयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली पुण्यासह पाचही जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते सज्ज आहेत!

कार्यकर्त्यांची ऊर्जा, संघटनेची बांधिलकी आणि विजयाचा दृढ संकल्प यांच्या बळावर यशाचा नवा इतिहास घडवूया!

अजेय भारत… अजेय भाजपा! 🚩

🗳️ मतदान: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ: सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

Devendra Fadnavis Ravindra Chavan Dr. Mrs. Smita Jadhav Kaustubh Gawade Official Krish Mahadik BJP Maharashtra

#भाजपा #अजेयभाजपा #अजेयभारत #पुणे #भोसरी #पुणेपदवीधरमतदारसंघ #पुणेशिक्षकमतदारसंघ

14/10/2026

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5000 अग्रीम मदत देण्यात येणार. दुष्काळाचा निधी देण्याची कार्यप्रणाली पूर्ण होण्याची वाट न पाहता दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम देणार!
- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस



संघ शताब्दी वर्ष : शंभर वर्षाची साधना, अनंत शतकांची प्रेरणा..! 🚩राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड जिल्हा, आळंदी गटा...
12/10/2026

संघ शताब्दी वर्ष : शंभर वर्षाची साधना, अनंत शतकांची प्रेरणा..! 🚩

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी-चिंचवड जिल्हा, आळंदी गटाच्या वतीने आयोजित ‘शताब्दी शाखा संगम’ हा कार्यक्रम ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यात संघाचा अनुयायी स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी अनुभूती आहे.

‘संघटित व्हा! संघटित राहा! राष्ट्रासाठी समर्पित व्हा..!’ हा ध्येयमंत्र घेऊन एकात्मता, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य आणि स्वबोध या पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजीवन अधिक सशक्त करण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ झाला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मा. अतुलजी लिमये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आळंदी गटाचे संघचालक मा. सतीश कांतीलाल चौरडिया जी आणि परिसरातील सर्व शाखाबांधवांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून हा सोहळा अत्यंत सुंदररीत्या संपन्न झाला.

राष्ट्रसेवेचा संकल्प, संस्कारांचा वारसा आणि संघटित समाजशक्तीचा विश्वास घेऊन राष्ट्राच्या परमवैभवासाठी सदैव समर्पित!

भारत माता की जय! 🇮🇳
वंदे मातरम्! 🚩

#संघशताब्दीवर्ष #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #शताब्दीशाखासंगम #राष्ट्रसेवा #राष्ट्रभक्ती #संघटनशक्ती

07/10/2026

LIVE: पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे सेवा संकल्प अभियानातून संबोधन

27/09/2026

🔴 LIVE | पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी | मन की बात | सेवतीर्थ, नवी दिल्ली

01/09/2026

’’सहिष्णुता’’ हाच हिंदुत्वाचा दागिना; पण..!

‘‘विकासाभिमूख आणि सर्वसमावेशक हिंदुत्व’’ हा अजेंडा घेऊन आम्ही देव-देश-धर्मासाठी समर्पित भूमिकेतून महाराष्ट्रभरात काम करीत आहोत. महाराष्ट्राचे नेते आणि माझ्यासाठी आदर्श व्यक्तीमत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी ‘‘हिंदूनायक’’ म्हणून केलेला नामोउल्लेख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला धर्मकार्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा देणारा आहे.

‘‘’’सहिष्णुता’’ हाच हिंदुत्वाचा दागिना‘‘ आहे, पण..! एखाद्याने थोबाडीत मारली म्हणून; दुसरा गाल पुढे करणारे आम्ही हिंदुत्ववादी नाहीत. धार्मिक द्वेषभावनेतून कोणी अंगावर आला, तर त्याचे थोबाड फोडण्याची शिकवण आम्हाला आमचा धर्म शिकवतो.

धर्मो रक्षति रक्षितः ।
धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः ।

आदरणीय देवाभाऊ,
संस्कार, संस्कृती आणि स्व-धर्माभिमानाची ही शिकवण अशीच पाठिशी राहू द्या..! राष्ट्रनिर्मिती आणि धर्म रक्षणासाठी भगवा खांद्यावर घेवून आयुष्यभर मिरवेन अभिमानाने... असा विश्वास देतो.

जय श्रीराम..
जय शिवराय...
जय शंभूराजे..!



महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतून...
01/09/2026

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीच्या हेतूने नियोजनात्मक विकासाचे महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगती करत आहे. महाराष्ट्राची घोडदौड आता थांबणार नाही याची खात्री आहे.

🔰 मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त) 🔰

✅ (गृह विभाग)
नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर.

✅ (सार्वजनिक आरोग्य विभाग)
शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक

✅ (सार्वजनिक बांधकाम विभाग)
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा.

✅ (जलसंपदा विभाग)
कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार

Devendra Fadnavis Ravindra Chavan CMOMaharashtra BJP Maharashtra

#मंत्रिमंडळनिर्णय

महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प, संघटनशक्तीला नवी ऊर्जा! भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची महत्त्वपूर्ण...
31/08/2026

महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प,
संघटनशक्तीला नवी ऊर्जा!

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर विचारमंथन झाले.

‘संघटन हेच सामर्थ्य आणि जनसेवा हेच ध्येय’ या विचारातून भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देताना सरकारच्या लोकाभिमुख योजना आणि विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. यावेळी राज्यभरातील भाजपचे सन्माननीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हास्तरीय पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकसित महाराष्ट्राचा संकल्प…
मजबूत संघटनेची साथ…
आणि जनसेवेचा अखंड प्रवास!

📍 पुणे
🗓️ ३१ ऑगस्ट २०२६

Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Maharashtra

🚩 मजबूत संघटन, सशक्त भाजपा! 🚩भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीमध्ये पिंपरी-चिंचवड जिल्हा कोअर कमिटीची घोषणा हा न...
30/08/2026

🚩 मजबूत संघटन, सशक्त भाजपा! 🚩

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीमध्ये पिंपरी-चिंचवड जिल्हा कोअर कमिटीची घोषणा हा निश्चितच कार्यकर्त्यांसाठी उत्साह आणि अभिमानाचा क्षण आहे.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार जाहीर झालेल्या या कोअर कमिटीमध्ये नियुक्त केलेल्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. तसेच माझी देखील या कोअर कमिटीमध्ये नियुक्ती केल्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार!

पक्षाने सोपविलेली प्रत्येक जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ पद नसून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी आहे.

आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा संघटना अधिक व्यापक, सक्षम आणि जनतेशी जोडणारी करण्यासाठी एकजुटीने काम करूया.

कार्यकर्ता हीच ताकद… संघटन हीच शक्ती… आणि राष्ट्रसेवा हेच अंतिम ध्येय..!🚩

Devendra Fadnavis Ravindra Chavan Mahesh Landge Shankar Jagtap Amit Gorkhe-अमित गोरखे Uma Khapre - उमा खापरे BJP Maharashtra

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Bhosari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share