RCS - India My Nation

RCS - India My Nation *All Indians are our brothers and Sisters
* Peaceful fight for Society Rights.

Please Join
23/04/2026

Please Join

Lets Participate
21/03/2026

Lets Participate

Lets Begin with a new task.
14/03/2026

Lets Begin with a new task.

News on Peshwa.
12/12/2025

News on Peshwa.

Kindly participate and help the activity..Organiser Pune Contact Mr. Vijay B.कृपया स्पेशल विद्यार्थी सहाय्य निधी संकलणास...
05/12/2025

Kindly participate and help the activity..
Organiser Pune
Contact Mr. Vijay B.
कृपया स्पेशल विद्यार्थी सहाय्य निधी संकलणासाठी आयोजित केलेल्या धावण्याच्या उपक्रमाला सहकार्य करा.
संपर्क -श्री. विजय

Happy Birthday -Dada
18/10/2025

Happy Birthday -Dada

दादा,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉 तुझं सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व खरंच प्रेरणादायी आहे. तुझी मेहनत, समर्पण आणि लोका...
18/10/2025

दादा,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎉 तुझं सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व खरंच प्रेरणादायी आहे. तुझी मेहनत, समर्पण आणि लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
येणारे नवीन वर्ष तुला आणखी यश, सामर्थ्य आणि संधी घेऊन येवो. तुझ्या नेतृत्वाखाली समाजात सकारात्मक बदल घडवत रहो, आणि नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवत रहा! 💪
वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा!

निष्पाप लोकांना असे अटक करणे कितपत योग्य आहे?कुठलाही गुन्हा घडला नाही तसे पुरावेही नाहीत, छत्तीसगढ मध्ये अटक करण्यात आले...
31/07/2025

निष्पाप लोकांना असे अटक करणे कितपत योग्य आहे?
कुठलाही गुन्हा घडला नाही तसे पुरावेही नाहीत, छत्तीसगढ मध्ये अटक करण्यात आलेल्या सिस्टरांना तातडीने सोडा अशी आमची मागणी आहे, अन्यथा संविधानिक मार्गाने देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, झालेल्या प्रकाराचा जाहीर निषेध.

Sr. Preeti Mary and Sr. Vandana Francis needs to release on an immediate basis.They are innocent and without any evidence, false allegations registered against them, Victims are doing pure social work for all. Otherwise we will go for constitutional protests all over the country

Lucas Kedari,
President RCS

Unitedly we can definitely fight for the truth and to preserve the constitutional rights of the community and citizens o...
08/07/2025

Unitedly we can definitely fight for the truth and to preserve the constitutional rights of the community and citizens of India.
8 july 2025 Peaceful agitation is the right example of unity where in All Christians gather together including Hindu Brothers, Muslim Brothers and Republican leaders, it is a real india.Christian Forum team played an outstanding role.

Thanks to all my brothers and sisters, leaders, Fathers, Pastors, Nuns.

God Bless you all.

पुण्यात ऐतिहासिक शांती मोर्चा संपन्न झाला, आपण भारतीय असून एक आहोत याचे दर्शन या शांती मोर्चात झालें, सर्व जाती धर्माचे लोक, नेते व सर्व माझे ख्रिश्चन बांधव सामील झालें, पुण्यातील कलेक्टर ऑफिस वर झालेला मोर्चा समाजासाठी दिशा दर्शक ठरला. गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने कारवाई करावी व लोकशाही तत्वे जोपसावी असे सर्वाकडून नमूद करण्यात आले.

लुकस केदारी
अध्यक्ष RCS

आज दि. 18 जून 2025 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची एक प्रकारे सुपारी देण्याच्या व जीवे मारण्याच्या क...
19/06/2025

आज दि. 18 जून 2025 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंची एक प्रकारे सुपारी देण्याच्या व जीवे मारण्याच्या केलेल्या विधानावरून पुणे जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले, निवेदनामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जे आक्षेपार्य विधान केलेला आहे त्याचा निषेध नोंदविण्यात आला. आणि त्याच वेळेस त्यांची तातडीने अटक करावी अशी देखील मागणी करण्यात आली, सदरचे आंदोलन रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या व नॅशनल दलित कौन्सिल च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस)केदारी, राजेंद्र चक्रनारायण,फेबियन सॅमसन,संगीता पापाणी, सुधीर खरात, पिटर डिसूझा,धिवर राजेंद्र तसेच इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते, ख्रिस्ती समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी इतर जाती धर्मातील बंधू-भगिनी विशेषतः राहुल डांबाळे, विठ्ठल कारंडे, जावेद शेख, मुझमिल सय्यद देखील हजर होते.
लुकस केदारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अत्यंत कडक व अभ्यासातून ख्रिश्चन समाजावर विनाकारण होणाऱ्या धर्मांतर केसेस च्या बाबतीत भूमिका मांडली, तसेच फादर, पास्टर वर हल्ले झालें तर खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले.

RCS

*6th Christian Rights Conference Held in Pune*https://youtu.be/a4WuFd3iHqA?si=5aYG_4rIMrjYNbmb*“End Atrocities Against C...
02/06/2025

*6th Christian Rights Conference Held in Pune*
https://youtu.be/a4WuFd3iHqA?si=5aYG_4rIMrjYNbmb
*“End Atrocities Against Christians"– MP P. Wilson*

Opne | Like | Share |Subscribe
www.themediaworld.in

Media World News Networkख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सनपुण्यात सहा...

*ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सन**पुण्यात सहावी ख्रिस्ती हक्...
01/06/2025

*ख्रिश्चन समाजावरील अत्याचार थांबवा, व राजकीय प्रतिनिधित्व, स्वतंत्र महामंडळ द्या -पी विल्सन*

*पुण्यात सहावी ख्रिस्ती हक्क परिषद संपन्न*

पुणे : देशात ख्रिस्ती समाजावर दिवसागणिक अत्याचार वाढत आहेत =, संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहे, मणिपूर चा प्रसंग, फा. स्टेन वरील अन्याय, चर्च वर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा,पास्टर यांवर होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. असे सांगत अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने जागे करावे लागेल, महाराष्ट्र राज्यतिल ख्रिस्ती बांधवाना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार, व लवकरच राष्ट्रीय पातळीवर समिती बनवणार असल्याचे द्रुमकचे राज्यसभा खासदार पी विल्सन यांनी सांगितले. तसेच दलित ख्रिस्चनाना सवलती संविधानाच्या आधारे मिळाल्या पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.

रिजनल ख्रिश्चन सोसायटीच्या वतीने प्रशांत (लुकास) केदारी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सहाव्या ख्रिस्ती हक्क परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पी. वील्सन बोलत होते. हक्क परिषदेच्या अध्यक्षस्थानी दिलीप नाईक होते. याप्रसंगी पुणे प्रांताचे धर्मगुरू फा. रॉक अल्फानसो, पा. पिटर जॉर्ज, सतिश मेहेंद्रे, आमदार बापूसाहेब पठारे,सिस्टर दिव्या,फा. विजय नायक, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,जॉन फर्नांडिस,फा. जो गायकवाड,रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, मुस्लिम कॉन्फरन्स चे अध्यक्ष. झुबेर मेमन, आप पक्षाचे सुदर्शन जगदाळे,सामाजिक कार्यकर्ते हुलगेश चलवादी,फेबियणं सॅमसन,खिसाल जाफरी,राजेश केळकर, समुईल सांडीराज, प्रियंदर्शनी,उद्योजक नितीन काळे, शिरीष हिवाळे, ख्रिस्ती लीगल असोसिएशन चे ऍड.बाजीराव दळवी यांनी मूलभूत हक्का विषयी माहिती दिली,पा.पद्माकर, विल्सन भोसले, पा. सुधीर साबळे, स्टीवेन गोडे,सत्यवान गायकवाड, फा.रोलँड व समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, संघटना प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात प्रशांत(लुकास) केदारी यांनी समाजावर होणाऱ्या अत्याचाराची दाहकता मांडली,राज्यस्तरीय सुरक्षा समिती,राजकीय प्रतिनिधित्व द्यावे, ख्रिस्ती समाजाला महामंडळ दयावे अशी अग्रही मागणी केली,समाजावर खोटे गुन्हे दाखल केले जातात व समाजाची बदनामी करणे समाज कंटकांनी थांबवावे असे प्रतिपादन केले,

खासदार पी.विल्सन यांनी संपूर्ण भारतात कशा प्रकारे खोटे धर्मातरनाचे गुन्हे टाकले जातात, अत्याचार हा दिवसागणिक वाढत आहे, संविधानिक हक्काचा भंग काही जातीवादी शक्ती करीत आहे, त्याच वेळी मणिपूर चा प्रसंग, फा. स्टेन वरील अन्याय, चर्च वर होणारे हल्ले, ख्रिस्ती शाळा,पास्टर यांवर होणारे हल्ले याचा निषेध केला, तसेच अल्पसंख्याक आयोगाला खऱ्या अर्थाने जागे करावे लागेल असे परखडपणे सांगितले, महाराष्ट्र राज्यतिल ख्रिस्ती बांधवाना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार, व लवकरच राष्ट्रीय पातळीवर समिती बनविणार असे सांगितले, दलित ख्रिस्चनाना सवलती संविधानाच्या आधारे मिळाल्या पाहिजे असेही ते म्हणाले.

परिषदेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी समाजात ऐक्य निर्माण होण्यासाठी उपाय योजना प्रभावी केल्या पाहिजे असे सुचविले, राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी राज्यस्तरीय चळवळ उभी करण्याचा मानस त्यांनी केला व लवकरच ख्रिस्ती समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजिले जाईल असे त्यांनी सांगितले,

फा.जो गायकवाड यांनी बांधवांची समाजातील सबलिकरणाची भूमिका मांडली, पा. पिटर जॉर्ज यांनी सुरुवातीची प्रार्थना केली, पा. केळकर यांनी समाजावरील अत्याचारला न्याय मिळण्यासाठी समिती स्थापन व्हावी असे सांगितले,

आमदार बापूसाहेब पठारे यांनी ख्रिस्ती समाजाला वडगावशेरीत किंवा पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मदत करू, तसेच सांस्कृतिक भवन व आर्थिक विकास महामंडळ मिळवून देऊ असे आश्वासन दिले, माजी उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी परिषदेला संपूर्ण पाठींबा जाहीर केला, राहुल डंबाळे यांनी आंबेडकरी चळवळ ख्रिस्ती समाजाला संपूर्ण सहकार्य देईल व त्यांचे मूलभूत हक्क अबाधित राहावे यासाठी मदत करेन असे निक्षुन सांगितले,हाजी झुबेर मेमन यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री दत्ता भरणे यांनी परिषदेला ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या व ख्रिस्ती समाजाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले, बिशप थॉमस डाबरे यांनी ऑनलाईन शुभेच्छा संदेश दिला. हुलगेश चलवादी म्हणाले ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे, त्याचे भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे स्थान आहे म्हणून त्यांना डावलून चालणार नाही,या परिषदेला पुण्यातून व राज्यातून सर्व प्रतिनिधी, अल्पसंख्यांक नेते सहभागी झालें होते.

ख्रिश्चन समाजातील सामाजिक कार्य करणारे साहित्यिक नरेश चव्हाण, लोरेन्स गायकवाड यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.एस एफ एस मराठी संघटना, यावे निस्सी ख्रिश्चन संघटना, प्रेषित फॉउंडेशन,विनोद तोरणे यांच्या संघटनेचा सत्कार करण्यात आला,दीपक चक्रनारायण यांच्या गरीब मुलांच्या अनाथालय कार्यासाठी सत्कार करण्यात आला, प्रगत पदवीधर संघटना, रेंज हिल्स ख्रिश्चन युथ संघटना यांचा पी. विल्सन व सतिश मेहेंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ऍड.अँतोन कदम यांनी धर्मांतरित ख्रिस्चनाना सवलती मिळाल्या पाहिजे असे सूचित केले, जॉन मनतोडे यांनी सूत्र संचालन केले.
रिजनल ख्रिश्चन सोसायटी च्या महिला पदाधिकारी मेरी पार्गे, सलूमी तोरणे, संगीता केदारी, संगीता पापानी, प्रतिमा केदारी, शितल गायकवाड, मेरी जॉन्सन यांनी व सुधीर शिरसाठ,पिटर भोसले, नितीन भोसले,अरुण केदारी, दिलीप घुटे, पा. मुरली नायर,विनोद तोरणे, रॉकी डिसूझा,सॅमसन, जॉन केदारी,राजकुमार सतराळकर, मार्कस पंडित, जॉन फर्नांडीस, एडवीन, रवींद्र कांबळे, पॉल तोरणे यांनी स्वयंसेवकांचे कार्य केले मारियादास तेलोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Address

Pune

Telephone

+917058989337

Alerts

Be the first to know and let us send you an email when RCS - India My Nation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to RCS - India My Nation:

Share

Category