Maya CARE Maharashtra

Maya CARE Maharashtra वृद्धांना हॉस्पिटल/बँक/शासकीय काम/औषधे/ वेळ घालवणे/व्हिडिओ कॉल/लिहणे/सर्व सुविधा मोफत दिल्या जातात.

29/10/2025

*बातमी क्षेत्रातील आघाडीची वृत्तवाहिनी बीबीसी मराठी ने माया केअर या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मोफत मदत करणाऱ्या संस्थेबद्दल प्रसारित केलेली माहिती.*
कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जेणेकरून एखाद्या गरजू जेष्ठ नागरिकांना मोफत मदत मिळेल किंवा एखाद्या दिव्यांगाला रोजगार मिळेल.
www.mayacare.org
[email protected]
Call- 18005721343

आज दिनांक 16.10.25 गुरुवार रोजी संध्याकाळी राजा मंत्री उद्यान इथे माया केअर फाउंडेशन पुणे येथील स्वयंसेवकांची मीटिंग झाल...
16/10/2025

आज दिनांक 16.10.25 गुरुवार रोजी संध्याकाळी राजा मंत्री उद्यान इथे माया केअर फाउंडेशन पुणे येथील स्वयंसेवकांची मीटिंग झाली.
सर्वप्रथम श्री. विद्याधर जोशी यांनी माया केअर च्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतची थोडक्यात माहिती सांगितली. तसेच स्वतः देत असलेली सेवा व काही अनुभव कथन केले.
तसेच 'माया केअर ' चे काम सर्व स्वयंसेवकांनी सेवा भावाने करावे व देणगी कशी मिळवावी याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले.
त्यानंतर आलेल्या सर्व स्वयंसेवकांनी आपापली ओळख करून दिली व नंतर माया केअर चे ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 चे त्रैमासिक मराठी व इंग्रजी वृत्तपत्राचे प्रकाशन करून खाजगी वितरणासाठी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना त्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सुरू होणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

भारतीय संस्कृतीत कृतज्ञता या भावनेला खूप महत्व आहे. अगदी सकाळी झोपेतून  उठल्या-उठल्या "कराग्रे वसते लक्ष्मी... करमुलेतु ...
08/09/2025

भारतीय संस्कृतीत कृतज्ञता या भावनेला खूप महत्व आहे. अगदी सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या "कराग्रे वसते लक्ष्मी... करमुलेतु गोविंदम प्रभाते करदर्शने " हि प्रार्थना करून आपण पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो . माता- पिता-गुरु यांच्याशी कृतज्ञ असावे अशी शिकवण आपणास दिलेली आहे . आपण निरनिराळे सण साजरे करून झाडेझुडपे ,पशुपक्षी यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते . महालय, ज्याला महालय श्राद्ध पक्ष(पितृपक्ष) असेही म्हणतात, हा भाद्रपद वद्य पक्षात सर्व पूर्वजांचा आणि मृत नातेवाईकांचा सन्मान करण्यासाठी केला जाणारा एक विधी आहे. यामध्ये आत्म्यांना मुक्ती मिळविण्यासाठी करण्यासाठी विधी केले जातात,आपल्या पूर्वजांकडून दीर्घायुष्य, समृद्धी, ज्ञान, आणि मोक्ष यासाठी आशीर्वाद मागितले जातात. कुटुंब आणि पूर्वजांच्या कल्याणासाठी तो आवश्यक मानला जातो. यातून आपल्या पूर्वजांविषयी आदर बाळगणे ,त्यांचेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे नावाने दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हि कामे आपण या पंधरा दिवसात करतो .
माया केअर फाउंडेशन हि संस्था पुण्यात २००८ साली स्थापन झालेली एक सामाजिक संस्था आहे (NGO ). एकट्या किंवा दुकट्या तसेच कुटुंबात राहूनही जे अपंग आहेत अशा जेष्ठ नागरिकांना सेवा देणारी हि संस्था आहे . आज महाराष्ट्रात या संस्थेचा विस्तार पुणे,मुंबई , कोल्हापूर, नागपूर ,छ. संभाजीनगर आणि बहुतेक जिल्ह्याचा ठिकाणी झालेला आहे .तसेच महाराष्ट्राबाहेर बहुतेक सर्व मोठ्या शहरात हि संस्था कार्यरत आहे . इंग्लडंमधे 4 ठिकाणी व नेपाळमधील काठमांडू मध्ये सुद्धा सेवा देण्यास सुरुवात झाली आहे.
या संस्थेचे स्वयंसेवक ज्या सेवा देतात त्याचे सर्वसाधारण स्वरूप असे आहे की जेष्ठ नागरिकांची बँकेची कामे करणे, पैसे काढणे, चेक भरणे, पैसे पाठविणे इत्यादी . त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यास आय सी यु बाहेर थांबणे, त्यांना औषधें आणून देणे. रेल्वेस्टशन , एसटी स्टँड विमानतळ येथे पोहचविणे किंवा तेथून सुरक्षितपणे घेऊन घरी पोहचविणे, त्यांना जेवणासाठी डबा आणून देणे त्यांची पेन्शन संबधीची कामे करणे इत्यादी गोष्टी हे स्वयंसेवक मोफत करतात. तसेच वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना मदत करणे इत्यादी कामे आमचे स्वयंसेवक करतात . दोन वर्षांपूर्वी पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये "May I Help You" हा कौंटर उघडला आहे याशिवाय इतर 6 हॉस्पिटल मध्ये "May I Help You" चे कौंटर उघडले आहेत. सकाळी 9 ते 1 या वेळेत हॉस्पिटल मध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या रुग्णांना मोफत मदत केली जाते. तसेच शहरातील कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दाखल केलेल्या रुग्णांबरोबर सहाय्यक नसेल तर तशी सेवा दिली जाते .वृद्धाश्रमातील वृद्धांना स्वयंसेवक अशीच मदत करीत असतात .एवढेच काय त्यांचेसाठी करमणुकीचे कार्यक्रम करतात. निरनिराळ्या कंपन्या यांचेकडे CSR यासाठी निधी असतो त्यातून ते प्रथमोपचाराची किट्स, वॉकर्स ,व्हीलचेयर्स आम्हाला उपलब्ध करून देतात तो निरनिराळ्या वृद्धश्रमात तसेच कमी उत्त्पन्न असलेल्या वृद्धांना आम्ही उपलब्ध करून देतो. यापेक्षा कितीतरी जास्त आणि वेगवेगळी कामे आमचे स्वयंसेवक करीत असतात. कोविड च्या काळात तर सुमारे १२०० जेष्ठ नागरिकांची लसीकरण करण्यासाठी नोंदणी केली , तसेच त्याना सेंटर वर घेऊन जाणे आणि परत घरी आणून सोडणे इत्यादी कामे सुद्धा आमच्या स्वयंसेवकांनी केली आहेत .
या सेवा देण्यासाठी बॅक ऑफिस मध्ये जे लोक लागतात ते सर्व दिव्यांग आहेत. सुमारे 120 लोक बॅक ऑफिस मध्ये काम करतात. आणि याशिवाय दिव्यांग मुला , मुलींना प्रशिक्षण देणे , त्यांना नोकरीची संधी इतर संस्थांमध्ये मिळवून देणे, इतर कंपन्यांचे बीपीओ चालविणे ,कस्टमर कॉलिंग करणे यासाठी संस्था त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांना इतर कंपन्यांमधून वर्क फ्रॉम होम ची कामे मिळवून देते. अशा रीतीने 1300 पेक्षा जास्त दिव्यांग मुला-मुलींना रोजगार मिळून दिला आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व सेवा मोफत आहेत.एकही रुपया या कामासाठी म्हणून घेतला जात नाही. स्वयंसेवक घरातून तो संबंधित जेष्ठ नागरिकाच्या घरी जातो त्यासाठी लागणारा प्रवासखर्च सुद्धा त्यांचेकडून घेतला जात नाही, तो खर्च संस्था करते . या सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहेत . अर्थात त्यांनी देणगी दिली तर त्याचा स्वीकार होतो पण देणगीचा आणि कामाचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो
आत्तापर्यंत सुमारे 40,000 पेक्षा जास्त भेटी आमच्या स्वयंसेवकांनी सुमारे 5000 पेक्षा जास्त वृद्धाच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये मिळून दिलेल्या आहेत. 250 प्रथमोपचाराची किट्स उपलब्ध करून दिलेले आहेत . पुणे व बंगलोर मधील जेष्ठ नागरिक याना 105 वॉकर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. पुणे ,बंगलोर व हैद्राबाद मधील जेष्ठ नागरिक याना 32 व्हीलचेयर्स उपलब्ध करून दिलेले आहेत .
या पंधरवड्यात दानधर्म करण्यासाठी माया केअर फॉउंडेशन अत्यंत योग्य आणि अत्यंत पात्र अशी संस्था आहे . तरी आपणास विंनती अशी कि या पवित्र अशा भाद्रपद महिन्याच्या या पंधरा दिवसात आमच्या संस्थेला देणगी दयावी . आपल्या देणगीचा योग्य तोच विनियोग होईल याची खात्री बाळगा आणि अशी देणगी देऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करा.
देणगीसाठी डिटेल्स खाली देत आहे
Bank Details
Bank Name: ICICI Bank
Branch: Tilak road
A/C Name: Maya CARE Foundation
A/C No: 187501000462
IFSC Code: ICIC0001875
आपण चेक द्वारे सुद्धा आम्हाला देणगी देऊ शकता तसेच mayacarefoundation@icici हा UPI ID वापरून किंवा सोबत QR कोड देत आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण आम्हास देणगी देऊ शकता
सदर देणगीस आयकर खात्याकडून आयकरात सूट मिळते . ज्यांना अशी सूट पाहिजे असेल ते याचा लाभ घेऊ शकतात.अधिक माहितीसाठी आपण खालील नंबर वर संपर्क करू शकता...
Toll Free Number: 1800 572 1343
For WhatsApp:
9552510400 / 9552510411 /8055995966.
+44 7825 698416 / +44 7570 374657
www.mayacare.org
[email protected]

   प्रिय ज्येष्ठ नागरिक व मित्रहो...         गणेश उत्सव 2 दिवसांवर आला आहे. या गणेशोत्सवात जेष्ठ नागरिकां करता माया केअर...
25/08/2025


प्रिय ज्येष्ठ नागरिक व मित्रहो...
गणेश उत्सव 2 दिवसांवर आला आहे. या गणेशोत्सवात जेष्ठ नागरिकां करता माया केअर फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा पुरवणार आहे. या सेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे , मूर्ती आणण्यासाठी सोबत सहकार्य करणे, बाहेरून वस्तूंची ने-आण करून देणे. गणेश उत्सवा संदर्भात लागणाऱ्या अन्य गोष्टीत सहकार्य करणे जसे कि डेकोरेशनचे साहित्य आणून देणे. फुल , अगरबत्ती, धूप आदीसाठी आमचे माया केअर चे स्वयंसेवक आपल्यासाठी सदैव तयार आहेत.
तरी ज्या ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारची मदत हवी आहे अशा नागरिकांनी माया केअरशी निशंक मनाने संपर्क साधावा व आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी. आपली संधी आमच्यासाठी एक नवी उर्जा आहे. तसेच ज्यांच्या जवळपास जेष्ठ नागरिक राहतात त्यांच्यापर्यंत व इतर ग्रुप वर ही माहिती नक्की पाठवून सहकार्य करावे. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. धन्यवाद...🙏🏻
संपर्क- 18005721343(toll free)
Mob- 9552510400/11
[email protected]
https://mayacare.org
तसेच ज्यांना कोणाला मोकळ्या वेळेमध्ये सामाजिक कार्य करण्याची आवड आहे व आमच्या सोबत काम करू इच्छिता त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.

माया केअर फाउंडेशन तर्फे मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर येथे रविवारी 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजता भजनाचा बहारदार कार्यक्रम ...
17/05/2025

माया केअर फाउंडेशन तर्फे मातोश्री वृद्धाश्रम चंद्रपूर येथे रविवारी 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजता भजनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे... आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती🙏🏻🙏🏻...

माया केअर फाउंडेशन पुणे स्वयंसेवक भेट..एकत्रितपणे, आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन बदलत आहोत आणि त्यांच्यासाठी एक उज्...
18/02/2025

माया केअर फाउंडेशन पुणे स्वयंसेवक भेट..

एकत्रितपणे, आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवन बदलत आहोत आणि त्यांच्यासाठी एक उज्ज्वल भविष्य घडवत आहोत.

माया केअर फाउंडेशन ही केवळ एक धर्मादाय संस्था नाही; ती ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जीवनरेखा आहे.

सहानुभूतीपूर्ण भेटी आणि मनापासूनच्या संभाषणांद्वारे, आपण आपल्या वृद्धांना मौल्यवान, प्रेमळ आणि आठवणीत ठेवल्याची खात्री करतो.

एकत्रितपणे, आपण एक मजबूत, अधिक जोडलेला समुदाय तयार करत आहोत.

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या: https://www.mayacare.org/
हेल्पलाइन क्रमांक: ➡️१८०० ५७२ १३४३

माया केअर फाउंडेशनचा अभिमानी भागीदार एसव्हीपी इंडियाचे विशेष आभार!

आपल्या संस्कृतीमध्ये भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. या दिवसात आपले वाड- वडील...
18/09/2024

आपल्या संस्कृतीमध्ये भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. या दिवसात आपले वाड- वडील, आजोबा पणजोबा व इतर सर्व पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे श्राद्ध केले जाते. यातून आपल्या पूर्वजांविषयी आदर बाळगणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचे नावाने दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे ही कामे आपण या पंधरा दिवसांमध्ये करतो.
#माया_केअर_फाउंडेशन ही संस्था पुण्यात 2008 साली स्थापन झालेली एक सामाजिक संस्था आहे.(NGO) एकट्या किंवा दुकटे तसेच कुटुंबात राहूनही जे अपंग आहेत अशा #ज्येष्ठ_नागरिकांना_मोफत_सेवा_देणारी_ही_जगातील_एकमेव_संस्था_आहे. आज महाराष्ट्रात या संस्थेचा विस्तार पुण्याबाहेर मुंबई ,नागपूर, छ. संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक ,सातारा, सोलापूर ,सांगली, लातूर, परभणी,जालना, बीड, लातूर, जळगाव, धुळे, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला इत्यादी ठिकाणी तर आहेत पण महाराष्ट्राबाहेरही ही संस्था कार्यरत आहे. तसेच इंग्लंडमध्ये 4 ठिकाणी व नेपाळ मधील काठमांडूमध्ये सुद्धा सेवा देण्यास सुरुवात झाली आहे.
या संस्थेचे जे स्वयंसेवक सेवा देतात त्याचे सर्वसाधारण स्वरूप असे आहे. ज्येष्ठ नागरिकांची बँकेची कामे करणे, पैसे काढणे, चेक भरणे ,पैसे पाठवणे तसेच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यास आयसीयू बाहेर थांबणे, त्यांना औषधे आणून देणे,रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, विमानतळ येथे पोहोचवणे किंवा तेथून सुरक्षितपणे घरी पोहोचवणे, त्यांची पेन्शन संबंधीची कामे करणे इत्यादी गोष्टी हे स्वयंसेवक करतात.तसेच वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना मदत करणे व त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे इत्यादी कामे आमचे स्वयंसेवक करतात.
संस्थेतर्फे एका वर्षापूर्वीच पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये *"May I Help You"* चा मदत कक्ष सुरू केला आहे. सकाळी 9 ते 1 या वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंट ना मदत केली जाते. अशा प्रकारचे मदत कक्ष 5 ठिकाणी सुरू आहेत. ही फक्त काही कामांची यादी आहे. यापेक्षा कितीतरी जास्त आणि वेगवेगळी प्रकारची कामे आमचे स्वयंसेवक करीत असतात. कोरोनाच्या काळामध्ये सुमारे 1200 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण करण्यासाठी नोंदणी केली तसेच त्यांना केंद्रावर घेऊन जाऊन त्यांना परत घरी सोडणे इत्यादी कामे सुद्धा आमच्या स्वयंसेवकांनी केली आहेत. सुमारे 2500 स्वयंसेवकांची साखळी आमच्या संस्थेमध्ये कार्यरत आहे.
या सेवा सुरळीत चालण्यासाठी बॅक ऑफिस मध्ये जे लोक काम करतात ते सर्व दिव्यांग आहेत. 60 पेक्षा अधिक लोक यामध्ये घरी बसून काम करतात यामुळे त्यांना रोजगार मिळतो व ते स्वावलंबी बनत आहेत. याशिवाय इतर दिव्यांग मुला-मुलींना प्रशिक्षण देणे, त्यांना नोकरीची संधी इतर संस्थांमध्ये मिळवून देणे, इतर कंपन्यांचे BPO चालवणे , कस्टमर कॉलिंग करणे यासाठी संस्था त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांना इतर कंपन्यांमधून वर्क फ्रॉम होम ची कामे मिळवून देते. अशा रीतीने 120 दिव्यांग मुला-मुलींना रोजगार मिळवून दिला आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माया केअर च्या या सर्व सेवा मोफत आहेत. एकही रुपया या कामासाठी म्हणून घेतला जात नाही . जो स्वयंसेवक जेष्ठ नागरिकांच्या घरी मदतीसाठी जातो त्यासाठी लागणारा प्रवास खर्च सुद्धा त्यांच्याकडून घेतला जात नाही. कारण स्वयंसेवकाला प्रवास खर्च संस्थेकडून दिला जातो. सर्व सेवा मोफत आहेत अर्थात त्यांनी स्वेच्छेने देणगी दिली तर त्याचा स्वीकार होतो. पण देणगीचा आणि कामाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
आत्तापर्यंत सुमारे 35 हजार पेक्षा जास्त भेटी आमच्या स्वयंसेवकांनी वृद्धांना दिल्या आहेत. या पंधराड्यात दानधर्म करण्यासाठी माया केअर फाउंडेशन अत्यंत योग्य आणि अत्यंत पात्र अशी संस्था आहे. तरी आपणास विनंती अशी की, या पवित्र अशा भाद्रपद महिन्याच्या या पंधरा दिवसात आमच्या संस्थेला देणगी द्यावी. देणगी पावती कर सवलतीस पात्र आहे. आपल्या देणगीचा योग्य तोच विनियोग होईल याची खात्री बाळगा आणि अशी देणगी देऊन आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करा.
देणगीसाठी तपशील :-
Bank Name: ICICI Bank
Branch: Tilak road
A/C Name: Maya CARE Foundation
A/C No: 187501000462
IFSC Code: ICIC0001875

अधिक माहितीसाठी ---

Toll Free Number: 1800 572 1343
For WhatsApp:
9552510400 / 9552510411.
+44 7825 698416 / +44 7570 374657
www.mayacare.org
[email protected]

प्रिय ज्येष्ठ नागरिक व मित्रांहो         गणेश उत्सव दोन दिवसांवर आला आहे. या गणेशोत्सवा काळात माया केअर फाउंडेशन  तर्फे ...
05/09/2024

प्रिय ज्येष्ठ नागरिक व मित्रांहो
गणेश उत्सव दोन दिवसांवर आला आहे. या गणेशोत्सवा काळात माया केअर फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत सेवा पुरवणार आहे. या सेवेमध्ये , गणेश मूर्तीची खरेदी करणे, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे , बाहेरून वस्तूंची ने-आण करून देणे. गणेश उत्सवा संदर्भात लागणाऱ्या अन्य गोष्टीत सहकार्य करणे जसे की डेकोरेशनचे साहित्य आणून देणे. फुल , अगरबत्ती, धूप आदीसाठी आमचे माया केअर चे स्वयंसेवक आपल्यासाठी सदैव तयार आहेत.
तरी ज्या ज्येष्ठ नागरिकांना गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारची मदत हवी आहे. अशा नागरिकांनी माया केअरशी निशंक मनाने संपर्क साधावा. व आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी. आपली संधी आमच्यासाठी एक नवी उर्जा आहे. तरी ज्यांच्या जवळपास जेष्ठ नागरिक राहतात त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. धन्यवाद...
संपर्क- 1800 572 1343(Toll free)
[email protected]
http://www.mayacare.org
WhatsApp -9552510400/8055995966

🚨 Attention🚨
01/04/2024

🚨 Attention🚨

महिला मंडळ पुणे यांच्या वतीने 9 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त चाकोरीबाहेरील कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्का...
12/03/2024

महिला मंडळ पुणे यांच्या वतीने 9 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त चाकोरीबाहेरील कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माया केअर च्या ज्येष्ठ स्वयंसेविका सौ. विनिता महाजन यांनी जेष्ठांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुनिता मांडके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच यामध्ये माया केअर फाउंडेशन कशाप्रकारे ज्येष्ठांना मदत करत आहे याबद्दल माहिती सांगण्यात आली व पत्रके वाटण्यात आली.
विनिता महाजन या माया केअर फाउंडेशनच्या एक प्रेमळ स्वयंसेविका आहेत. त्या प्रत्येक ज्येष्ठांना अगदी प्रेमळ पणाने मार्गदर्शन करतात व त्यांना नेहमी आनंद ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. सौ रागिनी जोशी यांनी सौ विनिता महाजन यांच्यावर सुंदर अशी कविता लिहिली आहे. आपणही अवश्य वाचावी.

*सन्मानार्थी एक समर्पीत व्यक्तीमत्व विनीता महाजन* यांचा
*काव्यातून परिचय*. . . . . . . . . . ‌
सखी एक विनीता

माधुरी पुराणिक ची झाली विनीता
केद्र शासन नोकरीत कार्यरत
मुलालाही दिले शिक्षण ते चांगले
नोकरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात

ओलांडली जरी वयाची पासष्ठी,
सेवा-भावना मात्र,तशीच आहे
जेष्ठ असूनही , *जेष्ठांसाठी कष्टी* ,
कामातील उत्साह पहात राहे

तरूणांना ही लाजवतील अशा,
जाती हाकेला त्या धाऊन जेष्ठांच्या,
कुणि सांगती मेडिसीन आणाया,
कुणी मागती मदतीच कष्टांच्या

कैक पुरस्कारांनी सन्मानीत झाल्या,
*माता जीजाऊ*, एकपात्री केले
सर्व महिलांचे , हित चिंततात
विनीता नावाचे सार्थक झाले

सून -नातवाला ही अभिमान वाटे
महाजन घराण्याचे केले नाव उज्वल
सासरचे, ओळखिचे चेष्टा करती
असावे सा-यांनी तुझ्यासम सोज्वळ

स्नेह-सखी-परी,मजवर त्यांचा,
नसे-अडसर कधी तो वयाचा
नृत्य-मंचावर असो खेळ मैदानी,
पुढाकार हर ठायी असे त्यांचा

सहभाग मॅरेथान स्पर्धेतून,
लक्ष वेधती आज तरूणींचे,
योगा , हास्य क्लब नित्य असे
आत्मसात करती सर्व गुण तयांचे

****************************
सौ.रागिणी जोशी,कोथरूड,पुणे-३८
मोबाईल नं. 7030500942
*******************.

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+18005721343

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maya CARE Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maya CARE Maharashtra:

Share