20/07/2026
नीट (NEET-2026) परीक्षेत देशातील मुलींमध्ये प्रथम आणि देशात पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या कु. श्रावणी जयश्री कृष्णा कुदळे हिचे अभिनंदन करत तिला पुढील शैक्षणिक आणि वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी या छोट्याशा गावातील श्रावणीने ७२० पैकी ७१० गुण मिळवत हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी जिद्दीने सामना करत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.