25/08/2024
आज काळूस येथील शेतकरी उपोषणाचा सलग अकरावा दिवस…
काळूस गावातील बेकायदा पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या आता सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन मंजुरी साठी मंत्रालयामध्ये निर्णायक वळणावर आहेत. सरकारला हा निर्णय घेण्यासाठी जाग यावी आणि गांभीर्याने या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. म्हणून उद्या काळूस याठिकाणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. माझी आपणा सर्व जाणकार शेतकरी बांधवांना तसेच खेड तालुक्यातील नागरीकांना विनंती आहे की आपण या उपोषणकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने काळूस या ठिकाणी सकाळी ठीक १० वाजता उपस्थित राहावे.
आपला
मयुर मगन दौंडकर
प्रदेशाध्यक्ष आम आदमी पार्टी युवा आघाडी
महाराष्ट्र राज्य.