Yogesh Gavali

Yogesh Gavali Traveller
Freelancer
Social Activist
Public Relations Officer (PRO).

सर्वप्रथम माणुसकी फाउंडेशनच्या सर्वच टीमचे खूप आभार...🙏🏻अतिशय नियोजनबद्ध व सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा दान उत्सव हा 2 द...
06/10/2025

सर्वप्रथम माणुसकी फाउंडेशनच्या सर्वच टीमचे खूप आभार...🙏🏻

अतिशय नियोजनबद्ध व सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असा दान उत्सव हा 2 दिवशीय कार्यक्रम आपण छत्रपती संभाजी नगर सारख्या शहरात आयोजित केला.
यातून अनेक संस्थांना आपली माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याची योग्य व्यवस्था आपण निर्माण केली, हे खूप गरजेचे होते.

कारण यजुर्वेन्द्र मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण काम खूप उत्तम करतो, परंतु ते पोहचवण्यासाठी ची व्यवस्था आपल्याकडे नसते किंवा आपण त्यासाठी कुठेतरी कमी पडतो. परंतु आपल्या माध्यमातून दात्यांना संस्थांपर्यंत व संस्थांना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी खूप मदत झाली.

बाकी नियोजन जर विचाराल तर अप्रतिम टीम वर्क अभय सरांनी जी टीम तयार केली आहे ती खूपच उत्तम आणि योग्य आहे. कारण ज्या तळमळीने हंचनाळ परिवार सर्वांची आपुलकीने विचारपूस करत होते त्याच व तितक्याच आत्मीयतेने सर्वच टीम जेवनापासून ते अगदी शेवटी स्टॉल चे समान गाडीत ठेवे पर्यंत मदत करत होती ते पण खूप मनाला भावणारे होते.

एकंदरीत सर्वच अनुभव खूपच छान होता, अभय सर व संपूर्ण माणुसकी टीम तसेच सर्व संस्था व दात्यांकडून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल अभय सरांचे मनःपूर्वक धन्यवाद...🙏🏻

योगेश गवळी
जनसंपर्क अधिकारी,
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल,
जळगाव
[email protected]
www.deepstambh.org



26 ते 28 सप्टेंबर "मुंबई ग्राहक पंचायतच्या" टीम ने सेतू बांधा रे हा अतिशय सुरेख उपक्रम हाती घेतला. मागिल 3 वर्षांपासून आ...
29/09/2025

26 ते 28 सप्टेंबर "मुंबई ग्राहक पंचायतच्या" टीम ने सेतू बांधा रे हा अतिशय सुरेख उपक्रम हाती घेतला. मागिल 3 वर्षांपासून आपण "दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल" जळगाव संस्थेला स्टॉल देत आहात. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो...

"सेतू बांधा रे" या नावातच सर्वकाही आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना एक मदतीचा हात मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला.
हा उपक्रम सामाजिक संस्थांनी बनवलेल्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचे मनोबल वाढावे या उद्देशाने सुरू केला आहे.
3 दिवस मुंबई ग्राहक पंचायत च्या माध्यमातून सर्व स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या राहणे, जेवण व स्टॉल ची उत्तम प्रकारे व्यवस्था आयोजकांनी केली होती.

या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच संस्थांना अनेक चांगले लोक जोडल्या गेले, सामाजिक संस्था व त्यांना भेडसावत असलेल्या समस्या तसेच आपले काम लोकांपर्यंत कसे पोहचले पाहिजे ही एक मोठी समस्या असतांना "सेतू बांधा रे" ची टीम आज निस्वार्थ पण हे सगळे अगदी मनापासून करत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

"मुंबई ग्राहक पंचायत" टीमची सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे.

सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना ऊर्जा व सकारात्मकता तसेच त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे यासाठी असे उपक्रम राबविले गेले पाहिजे.

योगेश गवळी
जनसंपर्क अधिकारी
दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल
जळगाव.
8080378807
www.deepstambh.org

आज उद्योगमंत्री उदयजी सावंत यांनी मुंबई ग्राहक पंचायत आयोजित सेतू बांधा रे सामाजिक संस्थांच्या विक्री व प्रदर्शनास भेट द...
27/09/2025

आज उद्योगमंत्री उदयजी सावंत यांनी मुंबई ग्राहक पंचायत आयोजित सेतू बांधा रे सामाजिक संस्थांच्या विक्री व प्रदर्शनास भेट दिली....
यावेळी त्यांनी दीपस्तंभ मनोबल संस्थेच्या कामाचे कौतुक देखील केले.



Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Gavali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share