PMC Care

PMC Care PMC Care - An official citizen engagement platform of Pune Municipal Corporation!

आजचं बालपण बदललंय…खेळाची जागा घेतलीय स्क्रीननेबालकांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी “Less Screen, More Play” विषयाची माहिती ...
03/06/2026

आजचं बालपण बदललंय…

खेळाची जागा घेतलीय स्क्रीनने

बालकांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी “Less Screen, More Play” विषयाची माहिती मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा.

Van Leer Foundation

नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश - मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त...
03/06/2026

नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश - मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) श्री. प्रजित नायर

पुणे शहरातील मान्सूनपूर्व नाले सफाई, कल्व्हर्ट दुरुस्ती व जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित कामांचा मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर यांनी सविस्तर आढावा घेतला. शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रलंबित बाबी व अडचणींची चर्चा करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नियोजित कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुढील आठवड्यापासून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले व कल्व्हर्ट कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात येणार असून, कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी करण्यात येणार आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी परिमंडळ अधिकारी मा. उपायुक्त श्री. विजयकुमार थोरात, मा. उपायुक्त श्री. अरविंद माळी, मा. उपायुक्त श्री. माधव जगताप, मा. उपायुक्त श्री. अविनाश सकपाळ, मा. उपायुक्त श्रीमती आशा राऊत, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

ECD Implementation Science Workshop, Shillong | Day 2 HighlightsOn Day 2 of the ECD Implementation Science Workshop – Fr...
03/06/2026

ECD Implementation Science Workshop, Shillong | Day 2 Highlights

On Day 2 of the ECD Implementation Science Workshop – From Science to State Action: Building Integrated Systems for Early Childhood Development, Pune Municipal Corporation participated in field visits and the World Café Session on Implementation Lessons with representatives from cities and states across India.

Participants attended a field visit on parental wellbeing and the role of supportive environments in shaping early childhood development, followed by technical sessions and World Café discussions. The PMC team exchanged implementation experiences and addressed questions on coordination, sustainability, financing, community ownership, and scaling ECD interventions.

The workshop was addressed by Mr. Sampath Kumar, Additional Chief Secretary, Government of Meghalaya. The participation and engagement of Ms. Madhavi Sardeshmukh, Commissioner, ICDS Maharashtra and Ms. Leena Moreshwar Bansod, Commissioner, Tribal Development, Government of Maharashtra. Their engagement in the field visits and discussions reinforced the importance of integrated, evidence-based approaches to strengthening ECD systems.

Representing PMC, Mr. Dinkar Gojare (Chief Engineer, Projects), Mr. Amol Rudrake (Deputy Engineer, Garden Department), and Dr. Milind Khedkar (Medical Officer, Health Department) shared Pune’s Urban95 and Nurturing Neighbourhoods journey, highlighting child-friendly public spaces, interdepartmental convergence, and the integration of Early Childhood Development into urban systems.

Van Leer Foundation

जनगणना २०२७जनगणना ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.· अधिकृत सूचनांचे पालन करा.· प्रगणकांना सहकार्य करा.· अफवांना बळी पडू नका...
03/06/2026

जनगणना २०२७

जनगणना ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

· अधिकृत सूचनांचे पालन करा.
· प्रगणकांना सहकार्य करा.
· अफवांना बळी पडू नका.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Census India 2027

जनगणना २०२७ : आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची आढावा बैठक; १४ जूनपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देशपुणे महानगर...
02/06/2026

जनगणना २०२७ : आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची आढावा बैठक; १४ जूनपूर्वी शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे निर्देश

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे जनगणना अधिकारी, चार्ज अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जनगणना कामकाजाची सविस्तर समीक्षा केली. यावेळी जनगणना प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रलंबित कामे तसेच नागरिकांपर्यंत पोहोचताना निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

जनगणना २०२७ हे राष्ट्रनिर्मितीचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य असून ते वेळेत, अचूक आणि प्रभावीपणे पूर्ण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी मा. आयुक्तांनी नमूद केले. त्यांनी जनगणना अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक प्रभागातील जनगणना कामकाजाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्याच्या सूचना दिल्या. क्षेत्रीय स्तरावर उद्भवणाऱ्या अडचणींची नोंद करून त्यावर तातडीने उपाययोजना करणे, नागरिकांना जनगणनेचे महत्त्व समजावून सांगून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, तसेच जनगणना नोंदी अचूक, पारदर्शक आणि त्रुटीरहित राहतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी मा. आयुक्तांनी जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असल्याचे सांगत त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी जबाबदारीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन केले. दि. १४ जूनपूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून जनगणना कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेने एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनगणना कार्यात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मा. आयुक्तांनी दिला. तसेच, ज्या प्रगणक (Enumerator) व पर्यवेक्षक (Supervisor) यांनी नेमून दिलेल्या कर्तव्यावर हजर राहण्यास टाळाटाळ केली किंवा जनगणना कार्यात सहकार्य केले नाही, त्यांच्याविरुद्ध जनगणना अधिनियम, १९४८ अन्वये फौजदारी कारवाई करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एका सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकाऱ्यांकडून जनगणना कामकाजात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जनगणना कार्यात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबिले जाणार असून जबाबदारी टाळणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून नागरिकांनी प्रगणकांचे ओळखपत्र तपासून त्यांना अचूक, संपूर्ण आणि वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. अचूक जनगणना ही भविष्यातील विकास आराखडे, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि कल्याणकारी योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यावश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. उपायुक्त श्री. विजय लांडगे, मा. उपायुक्त श्रीमती आशा राऊत, मा. उपायुक्त श्री. विजयकुमार थोरात, मा. उपायुक्त श्री. अरविंद माळी, मा. उपायुक्त श्री. तुषार बाबर, तसेच सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी आणि सुमारे ५०० पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

#जनगणना२०२७ #पुणे #विकासाचापाया Census India 2027

निसर्गाला गृहीत धरू नका.रस्त्यावर टाकलेला प्रत्येक कचरा, तोडलेले प्रत्येक झाड आणि वाया घालवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या ...
02/06/2026

निसर्गाला गृहीत धरू नका.

रस्त्यावर टाकलेला प्रत्येक कचरा, तोडलेले प्रत्येक झाड आणि वाया घालवलेला प्रत्येक थेंब उद्याच्या संकटाला आमंत्रण देतो.

चला, नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखूया.

आपल्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडूया.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Swachh Bharat Mission - Urban Swachh Bharat Mission, India Majhi Vasundhara

पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे एप्रिल व मे महिन्यात मागील वर्षापेक्षा दुप्पट कर संकलनपुणे शहरातील ...
02/06/2026

पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडे एप्रिल व मे महिन्यात मागील वर्षापेक्षा दुप्पट कर संकलन

पुणे शहरातील सर्व सुजाण नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार !

📲 आजच “PMC CARE” ॲप डाउनलोड करा आणि घरबसल्या कर भरा- https://fxurl.co/PMCCARE

जनगणना २०२७जनगणना ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.· अधिकृत सूचनांचे पालन करा.· प्रगणकांना सहकार्य करा.· अफवांना बळी पडू नका...
02/06/2026

जनगणना २०२७

जनगणना ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

· अधिकृत सूचनांचे पालन करा.

· प्रगणकांना सहकार्य करा.

· अफवांना बळी पडू नका.

शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMC Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to PMC Care:

Share