02/02/2026
महाराष्ट्राचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थिती लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी अत्यंत जड मनाने दादांना आदरांजली देत भावना व्यक्त केल्या. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा – हेच आमच्यासाठी अभिमानाचे आहे. आज या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपल्या कार्याला, आपल्या संघर्षाला आणि आपल्या नेतृत्वाला मनापासून आदरांजली अर्पण करतो.आपले मार्गदर्शन आणि आपली ऊर्जा सदैव दिशा देत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- विक्रम उत्तम जाधव
(शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहर)
#दादा_सदैव_स्मरणात
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#अजितदादा_अमर_रहे
#शोकसभा