22/12/2022
Baburao Dattoba Chandere
Vishal Baburao Vidhate
Poonam Vishal Vidhate / पुनम विशाल विधाते
#बाणेर_बालेवाडी_पाषाण_सुतारवाडी_सुस_म्हाळुंगे या भागाचा भागाचा #पाणीप्रश्न कायमचा सुटला पाहिजे, माता-भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली पाहिजे, या भागाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, या विचारातून आदरणीय #बाबूराव_चांदेरे साहेबांनी #पाणी योजनेचा सखोल अभ्यास करून एक शाश्वत आराखडा तयार केला. भविष्यात या गावांचा महापालिका कार्यक्षेत्रात समावेश होऊ शकतो, #स्मार्ट_सिटी योजनेचा फायदा होऊन या गावांचा कायापालट होऊ शकतो, या दूरदृष्टीतून चांदेरे साहेबांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरु केले होते, हे सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
सन २०२० मध्ये तत्कालीन #उपमुख्यमंत्री व पुण्याचे #पालकमंत्री #अजितदादा_पवार यांना चांदेरे साहेबांनी लेखी पत्र दिले होते. त्यामध्ये लिहिले होते की, २४*७ पाणी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यासाठी वारजे #जलशुद्धीकरण केंद्रापासून स्वतंत्र एक्स्प्रेस लाईन टाकली तर या भागाचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल. त्यानंतर दादांनी महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कामाच्या सूचना दिल्या होत्या.
आज *या योजनेचा भूमिपूजन समारंभ १३ नोव्हेंबर २०२१ रोजी या नगरसेवक बाबुराव आप्पा चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आणि त्यानंतर काम युध्दपातळीवर सुरु आहे*. मात्र नेहमीप्रमाणे विरोधकांकडून या कामाचे #श्रेय लाटण्याचे काम सुरु झाले आहे. कशी सोशल मिडिया तर कधी वृत्तपत्राचा आधार घेऊन हे काम कसे आपण केले केल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मुळात पाच वर्षे जनतेने यांच्या हाती सत्ता दिली तरीही अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे #पाणीप्रश्न काही सुटला नाही.
आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक जागे झाले आहेत. त्यांना आता पाणीप्रश्न, नागरिकांचे त्यांना दिसू लागलेत. मतांसाठी लाचार झालेले विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले काम आपणच केल्याचे सांगत आहेत. भाजपाची ही जाहिरातबाजी, आंदोलनाची स्टंटबाजी जनता ओळखून आहे. राज्यात, केंद्रात सत्ता असूनही ज्यांना पाच वर्षात पाणीप्रश्न सोडवता आला नाही, ते दुसऱ्याचे श्रेय घेणारच. कारण त्यांच्याकडे जनतेला दाखवण्यासाठी स्वतःचे असे काही भरीव कामच नाही.
काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितले होते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक पाणी योजनेच्या श्रेयवादाचे राजकारण करणार, आता तेच घडत आहे. पण जनता सुजाण आहे. जनतेच्या दरबारात नेहमीच न्याय होत आलेला आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.
जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कायम भविष्याचा विचार करून काम करत आहे आणि करत राहील.
प्रश्न कितीही मोठा असो, तो सोडविताना केवळ लोकांना बरे वाटावे म्हणून वरवरची मलमपट्टी न करता त्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून, नियोजनबद्ध पध्दतीने त्याचा विकास आराखडा तयार करून त्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढून पायाभूत सुविधा उभारणे, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची विकासनीती आहे. संपूर्ण देशात अत्यंत गतीने आणि नियोजनबद्ध पध्दतीने विकसित झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा लौकिक आहे. जे करायचं ते बंद्या रुपयासारखं खणखणीत ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची काम करण्याची पध्दत आहे.
बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे या भागाचा स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश होऊ शकतो, हे ओळखून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात मूलभूत व पायाभूत सोयी सुविधा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो.
गेल्या पाच वर्षांपासून या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नगरसेवक बाबुराव चांदेरे साहेबानी २०२० मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लेखी पत्र दिले होते. त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की वारजे जलशुद्धीकरण केंद्रापासून स्वतंत्र एक्स्प्रेस लाईन टाकली तर या भागाचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल. त्यानंतर दादांनी आयुक्त व महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कामाच्या सूचना दिल्या.
आज या योजनेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आजच महापालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला. फेब्रुवारीअखेरपर्यंत एक्सप्रेस लाईनचे काम पूर्ण होऊन या भागाला नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, असे आयुक्तांनी सांगितले आहे.
जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे राजकारण करून मतं मिळवणं, दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं ही विरोधकांची नेहमीचीच खेळी आहे. आता पाणीप्रश्नावर आंदोलन करतायत, एक्सप्रेस लाईनचे काम झाले की म्हणणार आमच्यामुळेच झाले. पण जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कायम भविष्याचा विचार करून काम करत आहे आणि करत राहील.
Ajit Pawar
Baburao Dattoba Chandere
Nationalist Congress Party - NCP
Sameer Baburao Chandere
Rahul Balwadkar
Poonam Vishal Vidhate / पुनम विशाल विधाते