BJP 4 Pimpri Chinchwad City

BJP 4 Pimpri Chinchwad City Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Pimpri Chichwad City Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

12/07/2026

"महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही!"
मिसिंग लिंक प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विरोधकांना खडसावले.

भारताला सुवर्णपदक!आशियाई U-23 अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने शानदार विजयाने मोहिमेची सुरुवात केली. मिश्र ४x४०० मी...
11/07/2026

भारताला सुवर्णपदक!

आशियाई U-23 अथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने शानदार विजयाने मोहिमेची सुरुवात केली. मिश्र ४x४०० मीटर रिले स्पर्धेत भारताने यजमान चीनचा अवघ्या ०.१० सेकंदांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले.

अस्तिक प्रधान, संदरामोल साबू, सेतू मिश्रा आणि श्रावणी सचिन सांगळे यांच्या संघाने ३:१८.६४ वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले, तर चीनने ३:१८.७४ वेळेसह रौप्यपदक मिळवले.

या विजयासह २१ वर्षीय सेतू मिश्रा यांनी बिहारसाठी इतिहास रचला असून आंतरराष्ट्रीय अथेलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते बिहारचे पहिले खेळाडू ठरले आहेत.

10/07/2026

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे नवे पाऊल!
६० किमी पल्ल्याच्या 'पिनाका' लॉंग रेंज गायडेड रॉकेटची ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी संपन्न झाली. पूर्वनियोजित मार्गाने जात रॉकेटने लक्ष्यावर अचूक प्रहार केला असून, भारतीय संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद कामगिरी आहे.

10/07/2026

विठ्ठल नामाचा गजर आणि टाळांचा आवाज...

दरवर्षी पौष महिन्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा म्हणजे उत्तर महाराष्ट्राची मांदियाळी. ज्ञानेश्वर माऊलींचे आदिगुरु आणि थोरले बंधू असणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्साहापासून ते ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या पुण्यतिथी सोहळ्यापर्यंतचा हा एक पवित्र प्रवास.

09/07/2026

मुंबई महापालिकेत आता AI क्रांती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुंबई महापालिकेत अत्याधुनिक AI प्रणाली लागू होणार असून, त्यानंतर ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विस्तारली जाणार आहे.
◆ १२ AI Agents २४x७ कार्यरत
◆ Human Interference कमी, पारदर्शक कारभार
◆ Compliance साठी AI चे मार्गदर्शन
◆ स्वयं तपासणी (Self-Audit) सुविधा
◆अधिक सोपी, सुसंगत आणि जलद प्रक्रिया
◆ अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा
तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक, स्मार्ट आणि लोकाभिमुख प्रशासन !

भारताच्या जागतिक गौरवात आणखी एक मानाचा तुरा! माननीय पंतप्रधान Narendra Modi जींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बि...
09/07/2026

भारताच्या जागतिक गौरवात आणखी एक मानाचा तुरा! माननीय पंतप्रधान Narendra Modi जींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘बितांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ या सन्मानाने गौरवण्यात आले.

हा १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.

साधु-संत येती घरा. टिळक चौक, निगडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत.
09/07/2026

साधु-संत येती घरा. टिळक चौक, निगडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत.

वारी म्हणजे श्रद्धेसोबतच सेवा आणि समर्पणाची अखंड परंपरा. वारकऱ्यांसाठी आयोजित २६व्या आरोग्यसेवा उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ...
09/07/2026

वारी म्हणजे श्रद्धेसोबतच सेवा आणि समर्पणाची अखंड परंपरा.
वारकऱ्यांसाठी आयोजित २६व्या आरोग्यसेवा उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो.
सेवाभावी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोची विशेष सेवा! ९ जुलै रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर ६ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध.व...
09/07/2026

पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोची विशेष सेवा!
९ जुलै रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर ६ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध.
वारकरी आणि नागरिकांनी सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी मेट्रोचा लाभ घ्यावा.

पालखी सोहळ्यासाठी पुणे मेट्रोची विशेष सेवा!

पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी, भाविक आणि पुणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा, यासाठी गुरुवार, दि. ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या कालावधीत पुणे मेट्रोची सेवा दर ६ मिनिटांनी उपलब्ध राहणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान होणारी वाढती गर्दी लक्षात घेता, वेळेची बचत करणारा, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी पुणे मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय ठरेल. स्थानकांवरील सूचनांचे पालन करून सहप्रवाशांच्या सोयीची काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.

Metro

Address

Pimpri

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Pimpri Chinchwad City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share