25/09/2022
ग्रामपंचायत लोखंडेवाडी ता.दिंडोरी जि.नाशिक येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय समिती प्रमुख पाहुणे मा.श्री.संजय माने साहेब उपसचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई , समिती अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत मोरे साहेब अव्वर सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई, समिती सचिव मा.श्री.बाळासाहेब हजारे साहेब कक्ष अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई, समिती सदस्य मा.रमेश पात्रे साहेब सहाय्यक कक्ष अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई, समिती प्रमुख अतिथी मा.अनिश मोरे सर यांनी काल गावाला भेट दिली व पाहणी केली त्यामध्ये समितीने गावाचे व ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले व आनंद व्यक्त करुन समाधान व्यक्त केले , त्यामध्ये समिती अध्यक्ष मा.चंद्रकांत मोरे सरांनी गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताचे तोंडभरून कौतुक केले त्यात म्हटले की, काय तो संभळ, काय तो डान्स, काय ते स्वागत काय ते गावकरी समधं कसं ओके!!! असे गौरोद्गार काढले, गावाची 12 वर्षांपासून स्वच्छतेची कास अशीच कायम राहू द्या, लोखंडेवाडी गाव नाशिक विभागात 4990 ग्रामपंचायत मध्ये सर्व प्रथम आले,म्हणुन राज्याची कमिटी ते पाहण्यासाठी तुमच्या गावाला आली आहे, सर्वात प्रथम जनता विद्यालय लोखंडेवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची नाटीका सादर केली, नाटीका पाहून उपस्थितांनी दाद दिली व कौतुक केले , गावासाठी योगदान देणारे म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात समिती अध्यक्षांनी गावकऱ्यांचा सत्कार केला.या प्रसंगी उपसचिव मा.संजय माने साहेब यांनी पण गावकऱ्यांशी संवाद साधला व समाधान व्यक्त केले, या प्रसंगी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता मा.डॉ.वर्षा फडोळ मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.भास्कर कनोज साहेब,दिंडोरी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील साहेब, जिल्हा परिषद नाशिक स्वच्छ भारत मिशन कक्षाचे सर्व कर्मचारी , पंचायत समिती दिंडोरी सर्व अधिकारी व कर्मचारी, दिंडोरी तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष व सचिव व ग्रामसेवक बांधव उपस्थित होते, तसेच सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या प्रसंगी सूत्र संचालन श्री.आर.के.पवार यांनी केले, प्रास्ताविक श्री.डी.एस.जाधव यांनी केले गावाचे सादरीकरण ग्रामसेवक श्री. सर्वेश पाटील यांनी केले व गावाच्या वतीने माजी सरपंच श्री.संदीप उगले यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.