14/07/2026
📍 श्री क्षेत्र गहिनीनाथ गड
वाचस्पती सिद्ध श्री संत वामनभाऊ महाराज यांनी सुरु केलेल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या मंगल प्रस्थान सोहळ्यास आज सहकुटुंब उपस्थित राहुन मंगल कामना केली,
श्री क्षेत्र गहिनीनाथगडाचे महंत पूजनीय विठ्ठल महाराज यांच्या अधिपत्याखाली अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दिंडीचे प्रस्थान झाले.
बीड जिल्ह्यातील हा सोहळा अद्भुत व अकल्पनीय असा होता.
श्री संत वामनभाऊ महाराज यांची ख्याती आणि महंत परमआदरणीय विठ्ठल महाराज यांचे कार्य या दुहेरी संगमाने अत्यंत विलक्षण, उत्साह, पवित्र अश्याच वातावरणात गड विठ्ठल विठ्ठल नामाने दुमदुमला,
मनी पंढरीची ओढ ...
विठ्ठलाच्या दर्शनाची आस,
आणि "विठ्ठल विठ्ठल" नामाचा अखंड ध्यास! 🙏🚩
असा हा सोहळा नेत्रदीपक ठरला.
यावेळी महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अजय दादा धोंडे, आदरणीय राजु काका धोंडे, आदरणीय दशरथ दादा वणवे, विविध गावचे सरपंच,सह हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक, पदाधिकारी कार्यकर्ते, टाळकरी ,भक्तगण, वारकरी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#संतवामनभाऊमहाराज #संतवामनभाऊपालखी #पालखीसोहळा२०२६ #श्रीक्षेत्रगहिनीनाथगड #पंढरपूरवारी #वारी२०२६ #वारकरीसंप्रदाय #विठ्ठल #पांडुरंग #ज्ञानोबातुकाराम #रामकृष्णहरी #भक्ती #आष्टी #पाटोदा #बीड #महाराष्ट्र
#श्रीसंतवामनभाऊ #महाराज #वारी2026 #श्रीक्षेत्रगहिनीनाथगड #पायीदिंडी #सोहळा #वारकरीसंप्रदाय #पंढरपुर #गहिनीनाथगड