जिल्हाप्रमुख सतीश भाऊ भिसे, भीमशक्ती परभणी

  • Home
  • India
  • Parbhani
  • जिल्हाप्रमुख सतीश भाऊ भिसे, भीमशक्ती परभणी

जिल्हाप्रमुख सतीश भाऊ भिसे, भीमशक्ती परभणी भीमशक्ती सामाजीक संघटना, परभणी

17/02/2025
22/01/2025
18/12/2024

परभणीतील कॉम्बिग ऑपरेशन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.............. #मा_चंद्रकांत_हंडोरे_साहेब ( #राज्यसभा_खासदार)
त्याचबरोबर मराठवाड्याची मुलूखमैदानी तोफ परभणीचे लोकनेते मा.विजयरावजी वाकोडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. #मा_चंद्रकांत_हंडोरे_साहेब ( #राज्यसभा_खासदार)

 #भीमशक्ती_संघटनेचा_जाहीर_पाठिंबा...            आज जागतीक दिव्यांग दिनानिमित्त सम्यक दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगा...
03/12/2024

#भीमशक्ती_संघटनेचा_जाहीर_पाठिंबा...
आज जागतीक दिव्यांग दिनानिमित्त सम्यक दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगाच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलनास भीमशक्ती संघटना परभणीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला..!

जाहीर पाठिंबा....जाहीर पाठिंबा....जाहीर पाठिंबा.... #डॉ_राहुल_पाटील_के_सम्मान_मे_भीमशक्ती_मैदान_मे..आज देशात अराजकता वाढ...
14/11/2024

जाहीर पाठिंबा....जाहीर पाठिंबा....जाहीर पाठिंबा....
#डॉ_राहुल_पाटील_के_सम्मान_मे_भीमशक्ती_मैदान_मे..
आज देशात अराजकता वाढत चाललेली आहे, मागील काही वर्षात मागासवर्गीय समाजाचे मत विभाजन होऊन जातीयवादी शक्ती बळकट झाली आहे, लोकशाही धोक्यात आणली जात असून संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरू झाले आहे. परंतु या समाजविघातक शक्तींना शह देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे व जातीयवाद्यायांच्या मांडीला मांडी लावून प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे त्यांना मदत करणाऱ्या व समाज चळवळ मोडीत काढणाऱ्या नेत्यांना समाजाने ओळखून भाजप व महायुतीच्या उमेदवारांना पाडून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणांची धूळ माथ्याशी लावून बाबासाहेबांचा समतेचा रथ पुढे नेणारे मा.हंडोरे साहेब हे सामाजीक न्यायमंत्री असतांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या-जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवन बांधले, 400 उद्योजकांना भाग भांडवल म्हणून 7-7 कोटी रुपये दिले, 19 हजार एकर जमीन भूमिहीनांना वाटप केली, 1100 कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज माफ केले, जिल्हा- तालुका व विभागीय पातळीवर मागासवर्गीय मूला-मुलींचे वसतिगृह बांधले, रमाई नावाने 1 लाख लोकांना घरकुल बांधून दिले, विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप मध्ये मोठया प्रमाणात वाढ केली, अश्या कित्येक लोकाभिमुख योजना राबविल्या. परंतु मा.हंडोरे साहेबांनी मागासवर्गीय, दलित व बौद्धांसाठी सुरू केलेल्या सर्व योजना या महाराष्ट्राचे महायुती सरकार बंद करत आहेत.त्यामुळे समाजाला पुनश्च न्याय मिळवून देण्यासाठी मा.हंडोरे साहेबांचे हात बळकट करावे लागतील त्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मा.हंडोरे साहेबांच्या आदेशान्वये महाविकास आघाडी उबाठाचे अधिकृत उमेदवार
#मा_डॉ_राहुल_पाटील_यांना #भीमशक्ती_संघटनेचा_जाहीर_पाठिंबा देण्यात येत आहे.
डॉ.राहुल पाटील यांनी मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेच्या माध्यमातून 5 हजार पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन शिलाई मशिणीचे वाटप केले व बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. तसेच युवक युवती व बालकांना व्यायाम करण्यासाठी शहरातील विविध भागात ओपन जिम उभारून दिल्या. परभणी मध्ये वैद्यकीय महाविद्यालय, सूतगिरणी, दूध डेरी आणि इतर परिसरात विविध बांधकाम व विकास योजनेच्या माध्यमातून रोजगारांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला.तसेच आर.पी.वैद्यकीय महाविद्यालयच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोफत रुग्णसेवा देत असून शहरातील नागरिकांना मोफत वाहतुकीची व्यवस्था करून दिली आहे.त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे मोफत सर्व रोग निदान तपासणी व मोतीबिंदू मुक्त विधानसभा योजनेच्या माध्यमातून हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया या उपचार करण्यात आले, 40 हजार पेक्षा जास्त नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले, जेष्ठ नागरिक मंचाच्या 300 पेक्षा जास्त शाखा व 40 हजार जेष्ठ नागरिकांची तपासणी करून 17 हजार नागरिकांना सहायक साधनाचे मोफत वाटप करण्यात आले आशा प्रकारे मा.राहुल पाटील यांनी आपल्या परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध जनहितार्थ कामे केलेली आहेत व आपल्या परभणी शहराला नियोजनबद्ध विकासाचं एक आदर्श मॉडेल करण्याचा संकल्प मा.राहुल पाटील यांनी केला आहे, त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी व आपल्या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व सुजाण नागरिक मतदार बंधू आणि भगिनींनी पुनश्च एकदा जनसामान्यांच्या मना-मनावर राज्य करणारे परभणी विधानसभाचे लोकप्रिय उमेदवार मा. डॉ. राहुल पाटील यांना आपले अमूल्य मत देऊन आशीर्वाद द्यावेत ही विंनती..

 ील_अभियंता_शंबाळे_व_लाईनमन_मुंढे_यांची_खातेनिहाय_चौकशी_करून_निलंबित_करा... #भीमशक्ती*                      #परभणी: - शह...
25/10/2024

ील_अभियंता_शंबाळे_व_लाईनमन_मुंढे_यांची_खातेनिहाय_चौकशी_करून_निलंबित_करा... #भीमशक्ती*
#परभणी: - शहरामध्ये वाढत चाललेले जमीन व प्लॉटवरील अनधिकृत जबरदस्तीचे व किरायदारांचे कब्जे याचाच फायदा घेऊन PC -1 येथील अभियंता शंबाळे व लाईनमन मुंढे हे संगनमताने दलालामार्फत अशा अनेक अनाधिकृत कब्जे दारांकडून पैसे घेऊन डमी कागदपत्रांच्या आधारे मूळ जागा मालकांच्या माघारी संबधित कब्जेदार व किरायदार यांना विद्युत वापरासाठी अवैधरित्या मीटर देत असून अमाप पैसा गोळा करत आहेत.
तरी में. साहेबांनी PC-1 मधील संपूर्ण परिसरातील विद्युत मिटरांची चौकशी करून संबधित अभियंता शंबाळे व लाईनमन मुंढे यांची सखोल खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा भीमशक्तीच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मा.कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या, परभणी यांना देण्यात आले याप्रसंगी भीमशक्तीचे जिल्हाप्रमुख सतीश भिसे, शहराध्यक्ष विक्रम काळे, तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे, दशरथ कदम, दीपक कणकुटे, संजय वाव्हळे, सुरेश यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.!

Address

Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हाप्रमुख सतीश भाऊ भिसे, भीमशक्ती परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share