21/03/2025
महिला दिन २०२५ चा सोहळा ज्योतिर्लिंग बहुद्देशीय समाजसेवी संस्था, गादेगाव आणि ज्योतिर्मय योग निसर्गोपचार केंद्र, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून तो अधिक गौरवशाली करणाऱ्या सर्व मान्यवर, सन्मानित महिला व सहभागी पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार.
या कार्यक्रमास अधिक खास बनविणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजश्री डेडे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिता नागराळे मॅडम, ॲड.सुकेशिनी शिर्के-बागल मॅडम, उद्योजक राजेश वाघमोडे, डॉ.माणिक म्हस्के, मिलिंद वायकर आदी मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी विचारांनी हा सोहळा अधिक आनंददायी आणि संस्मरणीय बनला.
ज्योतिर्मय योग निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका योगगुरू डॉ.ज्योती अनिल शेटे मॅडम आणि त्यांच्या योग साधिकांनी दिलेल्या अप्रतिम सादरीकरणासाठी विशेष धन्यवाद. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व आयोजक, स्वयंसेवक व सहकाऱ्यांचेही हार्दिक आभार!
महिला दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा, तर आपल्या कृतीतून दररोज साजरा व्हावा, हीच आमची इच्छा..!
#महिलादिन२०२५ #आभार
नागेश एकनाथ फाटे