धाराशिव 24/7

धाराशिव 24/7 हे पेज स्थानिक/राजकीय घडामोडी,समाजहिताचे विषय आणि जनतेपर्यंत बातम्या पोहोचवण्यासाठी चालवलं जातं.

24/05/2026

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्ग कोणी मंजूर करून आणला. पहा संपूर्ण व्हिडिओ..!

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आह...
05/05/2026

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी अत्यंत गंभीर आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असून, सध्या सुरू असलेल्या शेती कामांनाही मोठा फटका बसत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन साठ्याची पारदर्शक माहिती जाहीर करावी आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.

तसेच, सदर बाबीची दखल घेऊन ही मागणी जिल्हाधिकारी धाराशिव तसेच प्रादेशिक व्यवस्थापक BPCL, HPCL, IOCL (पाकणी डेपो, सोलापूर) यांच्याकडेही करण्यात आली आहे.

नागरिक व शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा, हीच अपेक्षा.

#पेट्रोल #डिझेल #तुटवडा #धाराशिव

05/05/2026

👑 ओमदादा 👑

भकासपणाला मर्यादा असते, पण काही लोक तीही ओलांडतात…रेल्वे केंद्र सरकारचीखासदार ओमदादांनी लोकसभेत वारंवार पाठपुरावा करून, ...
03/05/2026

भकासपणाला मर्यादा असते, पण काही लोक तीही ओलांडतात…

रेल्वे केंद्र सरकारची
खासदार ओमदादांनी लोकसभेत वारंवार पाठपुरावा करून, मागणी लावून धरून मंजूर करून आणली

आणि आता तयार कामावर येऊन राणा पाटील पाहणी करतोय…
जणू काही स्वतःच प्रकल्प उभा केला आहे असा आव आणतोय

अरे, जनतेला सगळं कळतं…
कोण काम करतं आणि कोण फक्त फोटो काढतं

“काम दुसऱ्याचं… आणि श्रेय स्वतःचं”
हा प्रकार आता जुना झाला

जनतेसमोर नाटक नाही, काम दाखवा
नाहीतर ही दिखाऊ पाहणी पुढच्या निवडणुकीतच उत्तर देईल

#श्रेयचोर_राजकारण
#काम_ओमदादांचं_नाटक_राणाचं
#जनता_सर्व_पाहते

01/05/2026

धाराशिवच्या जनतेसाठी लढणारा नेता…!

धाराशिव जिल्ह्यातील एका मेहनती मुलीची Indian Post मध्ये BPM (Branch Post Master) पदावर निवड झाली. मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी फक्त एका छोट्याशा ऑनलाइन भरलेल्या चुकीमुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. मराठी विषयाचे ९४ गुण भरले गेले होते, तर प्रत्यक्षात तिचे ९७ गुण होते.

एका छोट्याशा त्रुटीमुळे एका मुलीचे स्वप्न उद्ध्वस्त होणार होते…

पण तेव्हा धावून आले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर दादा!

जनता दरबारात हा विषय मांडताच दादांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोलावले आणि न्याय मिळवून दिला. अपात्र ठरवलेल्या मुलीला पुन्हा पात्र करून तिचे स्वप्न वाचवले.

हा फक्त हस्तक्षेप नव्हता…
हा होता एका मुलीच्या भविष्याचा विजय!

जनतेसाठी तत्पर, अन्यायाविरुद्ध ठाम आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणजे ओमराजे निंबाळकर.

दादा, आपल्या कार्याला मनापासून सलाम!

25/04/2026

आई तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांचे घरे उध्वस्त करणाऱ्या राणा पाटलाला आई तुळजाभवानी कधीही माफ करणार नाही..!
#तुळजाभवानी #तुळजापूर

23/04/2026

जय शिवराय 🚩

Address

Osmanabad

Telephone

+919960625777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धाराशिव 24/7 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to धाराशिव 24/7:

Share