26/01/2026
🟨 वाशीतील ‘डी-हेरिटेज’ संस्थेत ज्येष्ठ नागरिकांचा गौरव ; ७७ व्या प्रजासत्ताक दिनी विशेष उपक्रम
🗓️ २६ जानेवारी २०२६
📍 वाशी – सेक्टर १, नवी मुंबई
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाशी सेक्टर–१ येथील डी-हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभात उपस्थित राहण्याचा मान मिळाला . समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनप्रवासातून समाजाला मिळालेली दिशा, संस्कार व मूल्ये यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. हा सत्कार केवळ सन्मान नसून, भावी पिढीने ज्येष्ठांकडून प्रेरणा घ्यावी व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असा संदेश देणारा ठरला.
याप्रसंगी मा.नगरसेवक श्री. संपतजी शेवाळे यांच्यासह डी-हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी , सोसायटीचे रहिवासी , जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
#प्रजासत्ताकदिन२०२६