Security Guard Board

Call Website Contact the organization

Security Guard Board Government Organization

During the year 1980-81, the Maharashtra Rajya Suraksha Rakshak and General Kamgar Union had represented to Government that about 70,000 persons are working as Security Guards in various Factories and Establishments in Greater Bombay and Thane District

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल ३९६ सुरक्षा रक्...
07/07/2026

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी तब्बल ३९६ सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यात येत आहे. मंडळाच्या नोंदणीकृत आस्थापनांमध्ये मागणीनुसार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

🗓️ ऑनलाइन अर्ज कालावधी:
०७ जुलै २०२६ ते ०६ ऑगस्ट २०२६ (सायं. ६:१५ वाजेपर्यंत)

📍 कार्यक्षेत्र:
✅ चंद्रपूर जिल्हा
✅ गडचिरोली जिल्हा

📋 पात्रता:
उमेदवारांनी शासन निर्णय क्र. एसजीए-२०२४/प्र.क्र. ९६/कामगार/कामगार-५, दि. २७.०३.२०२५ मधील पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

🌐 अर्ज कुठे करायचा?
Security Guards Board Registration या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.

🛡️ सुरक्षा रक्षक बांधवांसाठी महत्त्वाची माहिती 🛡️सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांना खालील साहित्य नियमानुसार वा...
04/06/2026

🛡️ सुरक्षा रक्षक बांधवांसाठी महत्त्वाची माहिती 🛡️

सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांना खालील साहित्य नियमानुसार वाटप करण्यात येते :

👔 १) युनिफॉर्म – ७३० दिवस (२ वर्षे)

👞 २) शूज – ७३० दिवस (२ वर्षे)

🌧️ ३) रेनकोट व गमबूट – १४६० दिवस (४ वर्षे)

🧥 ४) स्वेटर – १४६० दिवस (४ वर्षे)

👗 ५) साडी (महिला सुरक्षा रक्षकांसाठी) – ७३० दिवस (२ वर्षे)

🩴 ६) चप्पल – ७३० दिवस (२ वर्षे)

📢 सर्व सुरक्षा रक्षक बांधवांनी आपल्या हक्काच्या साहित्याबाबत माहिती ठेवावी व नियमानुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा.

🤝 सुरक्षा • शिस्त • सेवा

सुरक्षा रक्षक मंडळ
महाराष्ट्र शासन स्थापित
🛡️ सुरक्षा व अनुशासन 🛡️

27/05/2026
📢 महत्वाची सूचना 📢बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सर्व सुरक्षारक्षक बांधवांना कळविण्यात येते की, आपल्या स...
25/05/2026

📢 महत्वाची सूचना 📢

बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सर्व सुरक्षारक्षक बांधवांना कळविण्यात येते की, आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकृत ॲपवर Form-16 अपडेट करण्यात आलेला आहे.

सर्व सुरक्षारक्षकांनी तात्काळ ॲपमध्ये लॉगिन करून आपला Form-16 तपासून घ्यावा व भविष्यातील आवश्यक कामकाजासाठी डाउनलोड करून सुरक्षित ठेवावा.

📄 Form-16 हे आयकर व इतर शासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी वेळेत तपासणी करून डाउनलोड करणे आवश्यक आहे.

✅ ॲपमध्ये लॉगिन करा
✅ Form-16 तपासा
✅ डाउनलोड करून सेव्ह ठेवा

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद 🙏

🚨 बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सर्व सुरक्षा रक्षकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी...! 🚨ज्या गोष्टीची सर्...
25/05/2026

🚨 बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सर्व सुरक्षा रक्षकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी...! 🚨

ज्या गोष्टीची सर्व सुरक्षा रक्षक बांधव आतुरतेने वाट पाहत होते, त्या वेतनवाढ व भत्ते सुधारणा संदर्भातील जाहीर सूचना आज दिनांक २५.०५.२०२६ रोजी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे.

सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा यांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) योजना २००२ मधील तरतुदीनुसार सुरक्षा रक्षकांच्या वेतन दर व भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे.

📌 विविध सुरक्षा रक्षक संघटनांनी मुळ वेतन व इतर भत्ते मिळून ₹४,००० ते ₹८,३०० पर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे.

📌 महत्वाची बाब म्हणजे — लेव्ही दरामध्ये कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

📌 शासनाकडून दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्यात जाहीर होणारी महागाई / विशेष भत्ता वाढ मुख्य मालकांनी मंडळास देणे बंधनकारक राहणार आहे.

📌 वेतन व भत्ते सुधारणा संदर्भात आपले सूचना, हरकती किंवा निवेदने दिनांक १६.०६.२०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत मंडळाच्या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करता येणार आहेत.

🌐 अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :
www.securityguardsboard.in

✊ आता वेळ आली आहे सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी एकजुटीने उभे राहण्याची…!

24/05/2026
भविष्य निर्वाह निधी  स्लिप उपलब्ध झाली आहे सण 24-25 करिता
01/11/2025

भविष्य निर्वाह निधी स्लिप उपलब्ध झाली आहे सण 24-25 करिता

Address

Navi Mumbai

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+912227751385

Alerts

Be the first to know and let us send you an email when Security Guard Board posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Security Guard Board:

Shortcuts

Share