Seema Hiray-सीमा महेश हिरे

Seema Hiray-सीमा महेश हिरे MLA From Nashik West Constituency | President Samarth Mahila Mandal | Bjp Maharashtra 🇮🇳 I will try my best to revert back at the earliest to all your feedback.

Everybody is welcome to post their comments, suggestions and complaints pertaining to our ward.

वंचितांचे कैवारी, जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता ...
03/06/2026

वंचितांचे कैवारी, जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

संघर्षातून घडलेला हा नेता म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनाचा नेता होता. गरिबांच्या आशा, शेतकऱ्यांच्या व्यथा, तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर विश्वासाचं हसू उमटवणारा नेता आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे.

त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

#लोकनेतेगोपीनाथरावजीमुंडे #गोपीनाथरावजीमुंडे #विनम्रअभिवादन

 #मंत्रिमंडळनिर्णयराज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अ...
02/06/2026

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४,५०० कोटी रुपये) कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३० टक्के हिस्सा म्हणून सुमारे २१५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे १,९२९ कोटी रुपये) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राज्याच्या ‘एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पांसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) यांच्याकडून प्रत्येकी १ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अर्थसहाय्य दोन टप्प्यांत घेण्यासही मंजुरी दिली आहे.

#मंत्रिमंडळनिर्णय
मुंबईतील हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आता या समूह विद्यापीठात प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, कफ परेड, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वांद्रे-पश्चिम, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्लु असोमुल्लु विज्ञान महाविद्यालय, वांद्रे-पश्चिम आणि थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश होणार आहे.

#मंत्रिमंडळनिर्णय
परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.

या महामंडळांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जातात. या महामंडळांसाठी व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक-प्रशासन, सहायक व्यवस्थापक-वित्त व लेखा ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्यास तर मल्टी टास्किंग स्टाफची सेवा बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी या तीनही महामंडळांना वार्षिक अंदाजे रु.१.१८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

02/06/2026

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये विविध विकासकामांना गती मिळत आहे. या कामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून त्याचा लाभ नाशिककरांना आगामी अनेक वर्षे मिळत राहील.

कुंभमेळ्यासाठी उभारली जाणारी विकासकामे ही नाशिकच्या सर्वांगीण प्रगतीचा मजबूत पाया ठरणार आहेत. या विकासामुळे शहराची ओळख अधिक भक्कम होईल आणि नाशिक प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेल, असा मला दृढ विश्वास आहे.

महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन हे विकसित भारताच्या संकल्पनेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.मा. पंतप्रधान नरेंद्र मो...
02/06/2026

महिलांचा सन्मान, सुरक्षा आणि स्वावलंबन हे विकसित भारताच्या संकल्पनेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवत अनेक उपक्रम राबविले. शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देत महिलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले.

महिलांचा सन्मान, त्यांचे सशक्तीकरण आणि सुशासनाच्या माध्यमातून त्यांना अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प निरंतर पुढे जात आहे.

📍पवन नगर, नाशिक🕒 १ जून २०२६ | सायं. ७:३० वा.पवन नगर येथील कुलस्वामिनी नेत्र सेवा यांच्या नूतन क्लिनिक व चष्मा दुकानास भे...
01/06/2026

📍पवन नगर, नाशिक
🕒 १ जून २०२६ | सायं. ७:३० वा.

पवन नगर येथील कुलस्वामिनी नेत्र सेवा यांच्या नूतन क्लिनिक व चष्मा दुकानास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या नव्या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभो आणि अधिकाधिक रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध होवो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या.

📍खुटवड नगर, नाशिक🕒 १ जून २०२६ | दुपारी १:३० वा.अधिक मासानिमित्त माहेर घर मंगल कार्यालय, खुटवड नगर येथे आयोजित श्री राम य...
01/06/2026

📍खुटवड नगर, नाशिक
🕒 १ जून २०२६ | दुपारी १:३० वा.

अधिक मासानिमित्त माहेर घर मंगल कार्यालय, खुटवड नगर येथे आयोजित श्री राम याग (महायज्ञ) सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला.

गेल्या दोन दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या महायज्ञात सहभागी होत श्रीराम चरणी प्रार्थना अर्पण केली. यावेळी ह.भ.प. श्री. प्रसाद महाराज (अमळनेरकर) यांचे आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य लाभले.

मंत्रोच्चार, भक्तीभाव आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेले वातावरण मनाला समाधान देणारे होते. यानंतर प्रसादाचा लाभ घेतला. समाजात सद्भावना, संस्कार आणि अध्यात्माची प्रेरणा देणारे असे धार्मिक उपक्रम निरंतर सुरू राहोत, हीच प्रार्थना.

📍आडगाव, नाशिक🕒 १ जून २०२६ | सायं. ८:३० वा.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा २०२६ तसेच खासदार मा. श्...
01/06/2026

📍आडगाव, नाशिक
🕒 १ जून २०२६ | सायं. ८:३० वा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा २०२६ तसेच खासदार मा. श्री. रामरावजी वडकुते साहेब यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिली. यावेळी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उत्साह, सामाजिक एकात्मता आणि लोकमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर करणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला. या प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📍जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक🕒 १ जून २०२६ | दुपारी १२:३० वा.नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुत...
01/06/2026

📍जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
🕒 १ जून २०२६ | दुपारी १२:३० वा.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. नरेंद्रजी दराडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीतील विजयी वाटचालीसाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिले.

यावेळी मा. मंत्री दादाजी भुसे, आमदार राहुलभाऊ ढिकले, महापौर हिमगौरी आहेर अडके, उपमहापौर विलास आण्णा शिंदे, भाजप अध्यक्ष सुनील केदार, भाजपा गटनेते शाम बडोदे, अजय बोरस्ते, गुरमित बग्गा तसेच महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

31/05/2026

📍गंगाघाट, नाशिक
🕒 ३० मे २०२६ | सायं. ७:३० वा.

गोदावरीच्या पवित्र तीरावर लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य गोदा आरतीत सहभागी होण्याचा योग आला.

हिंदू धर्मरक्षण, लोककल्याणकारी राज्यकारभार आणि सनातन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. जनतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी उभा केलेला आदर्श इतिहासात अजरामर आहे.

गोदामातेच्या साक्षीने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली. लोकमाता अहिल्यादेवींचा विचार आणि लोकसेवेचा वारसा पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहो, हीच प्रार्थना.

31/05/2026

📍श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सातपूर गाव, नाशिक
🕒 ३१ मे २०२६ | सकाळी ११:०० वा.

मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे आयोजन बूथ क्र. ११४, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सातपूर गाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ‘मन की बात’च्या माध्यमातून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी समाजातील विविध घटक, लोकसहभाग, प्रेरणादायी उपक्रम, पर्यावरण संवर्धन, युवा शक्ती आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. सामान्य नागरिकांच्या सकारात्मक कार्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा हा संवाद प्रत्येकवेळी नवी ऊर्जा देणारा असतो.

यावेळी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Nashik
Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Seema Hiray-सीमा महेश हिरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Seema Hiray-सीमा महेश हिरे:

Share