31/08/2026
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात FDA ची धाड... नेमकं काय सांगते?
विचार करा, एकाच छताखाली राज्याच्या सत्तापक्षातील दिग्गज नेते बसलेले आहेत…
फक्त नेतेच नाही, हा तर स्वतः मुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत...
आणि अशा वेळी तिथे अचानक अन्न आणि औषध प्रशासनाची गाडी येऊन थांबते आणि चार अधिकारी थेट मंडपात घुसून जेवणाचे नमुने तपासायला सुरुवात करतात... हे ऐकूनच कोणालाही धक्का बसेल… हो ना?
हे तेच FDA खातं आहे, ज्याची धुरा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तुकाराम मुंढे यांच्या हातात दिली आहे?
काय वाटतं, ही धाड पडल्यावर काय झालं असेल?
तुम्हाला माहिती आहे का कोणाचा कार्यक्रम आहे? तुमची हिंमतच कशी झाली? वगैरे वगैरे फिल्मी डायलॉगबाजी आयोजकांकडून झाली असावी. नंतर बघून घेतो, अशी धमकी वगैरे दिली गेली असेल?....
ही घटना आहे पुण्यात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीदरम्यान घडलेली... अगदी खरीखुरी घटना बरं… आजच्याच तारखेची, म्हणजे ३१ ऑगस्ट, २०२६ ची.
सभेची तयारी अगदी जोरात सुरू होती...
सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार होते आणि मुख्यमंत्र्यांचेही आगमन होणार होते...
एवढ्या मोठ्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना अडचण होऊ नये म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती…
पण…
अचानक तिथे तुकाराम मुंढे यांच्या FDA टीमचे चार अधिकारी धडकले…
ज्या पक्षाचं राज्यात सरकार आहे…
ज्या पक्षाचे सुप्रीम बॉस स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत, त्याच पक्षाच्या कार्यक्रमात जाऊन अन्नाची तपासणी करण्याचं हे धाडस साधंसुधं नक्कीच नव्हतं.
कारण सामान्यतः सत्तेच्या जवळ असलेल्या ठिकाणी अधिकारी जाण्यास कचरतात, तिथे प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धाड....
या एका घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि प्रशासनातील दोन अत्यंत महत्त्वाचे धडे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहेत…
सत्तेत असल्यावर काहीही चालतं किंवा आपल्याला कोण विचारणार? हा गैरसमज मोडून काढत, नियम आणि कायदे सामान्य नागरिकासाठी जितके कडक आहेत, तितकेच ते सत्ताधाऱ्यांसाठीही आहेत, हे या कारवाईने सिद्ध केलं. आणि कार्यक्रम कोणाचाही असो, अगदी मुख्यमंत्र्यांचाही, तिथेही अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य बजावायला कसूर करायचा नाही, हा एक संदेश.
तुकाराम मुंढेंसारख्या कडक आणि प्रामाणिक अधिकाऱ्याला हे धाडस कुठून मिळाले? याचे उत्तर इथेच दडले आहे…
जेव्हा राज्याचा नेता प्रामाणिक असतो आणि प्रशासनाला स्पष्ट संदेश देतो की, चुकीला माफी नाही...
तेव्हाच अधिकारी कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतात.
याआधीही देवाभाऊंनी अँटी करप्शनचे अधिकारी कुठेही धाड टाकू शकतात, अगदी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनही तक्रार आली तर ते माझ्याही कार्यालयात धाड टाकू शकतात, ह्याची अधिकाऱ्यांना मोकळीक दिल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने वृत्तवाहिन्यांवर पाहिले आहे, ऐकले आहे.
देवाभाऊंनी प्रशासनाला दिलेली मोकळीक आणि अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून दिलेली ताकदच अशा निडर कारवाईला बळ देते...
पुण्यातील या बैठकीत घुसलेल्या FDA च्या अधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने तिथून जेवणाचे नमुने घेतले आणि त्यांची प्राथमिक तपासणी केली…
सुदैवाने सर्व नमुने योग्य आणि सुरक्षित आढळले. पण इथे मूळ मुद्दा जेवणाचा नव्हता, तर तत्त्वांचा आणि नियमांचा होता….
कायदा हा सामान्य जनतेच्या पंगतीसाठी जेवढा लागू होतो, तितकाच तो व्हीआयपींच्या पंगतीसाठीही लागू होतो, हेच या घटनेने दाखवून दिले.
जेव्हा पाठीशी देवाभाऊंसारखा खंबीर नेता असतो आणि समोर तुकाराम मुंढेंसारखा कडक अधिकारी असतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आणि प्रशासनाचा वचक निर्माण होतो...
खरे तर ही धाड फक्त अन्नाच्या नमुन्यांची नव्हती, तर ती एका विश्वासाची चाचणी होती...
राजकारणात आपलं सरकार आलं की नियमांना सुट्टी मिळते, हा आजवरचा सर्वसामान्य अनुभव...
पण जेव्हा तुकाराम मुंढेंसारखा एक अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता स्वतःच्याच सत्ताधारी पक्षाच्या मंडपात पाय ठेवतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता त्याला राजकीय संरक्षण न देता नियमांचे पालन करू देतो, तेव्हा जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ होतो…
ही घटना दाखवून देते की, खरी जनसेवा ही फक्त भाषणांतून किंवा व्यासपीठांवरून होत नसते, तर ती अशा निडर आणि पारदर्शक कृतीतून घडते. सत्ता कोणाचीही असो, कायदा आणि जनतेचे आरोग्य हेच अंतिम सुप्रीम बॉस असले पाहिजेत… जेव्हा नेतृत्वाचा कणा खंबीर असतो आणि अधिकाऱ्याचे हात प्रामाणिक असतात, तेव्हाच राज्याला एका वेगळ्या आणि आदरयुक्त कारभाराची अनुभूती मिळते.