15/05/2026
"डॉक्टर, मला काही मोठा आजार नाही. फक्त पोट साफ होत नाही."
फक्त.
हा शब्द ऐकला की मला थांबावंसं वाटतं.
रमेश. ४२ वर्षांचा. IT कंपनीत Senior Manager. नाशिकमधून रोज दुसऱ्या गावी ये-जा. सकाळी ७ ची बस. रात्री ९ ला घर. मधे कुठेच वेळ नाही स्वतःसाठी तर अजिबातच नाही.
"किती दिवसांपासून आहे हे?"
"साधारण दोन वर्षं."
मी थांबलो.
दोन वर्षं.
"मग आधी का नाही आलात?"
"अहो डॉक्टर, Constipation म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? वाटलं होतं आपोआप जाईल."
मी त्याला विचारलं -
सकाळी उठल्यावर पहिलं काम काय? - चहा. मग लॅपटॉप उघडतो.
दिवसातून किती पाणी पितो? - दोन-तीन ग्लास असतील.
जेवण कधी होतं? - दुपारी दीड-दोन. कधी कधी तेही नाही.
झोप किती? - पाच-सहा तास. रात्री उशिरापर्यंत मेल्स असतात.
चालणं? व्यायाम? - वेळ नाही डॉक्टर, खरंच.
मी रिपोर्ट बघितले. Thyroid normal. Sugar normal.
पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की, शरीराची सगळ्यात basic गरज म्हणजे वेळ आणि पाणी दोन्ही नाकारलेलं होतं.
Constipation म्हणजे फक्त पोट साफ न होणं नाही.
ते एक संकेत आहे की शरीराची दिनचर्या पूर्णपणे विस्कटलेली आहे.
सतत पोट जड राहणं, डोकं जड वाटणं, चिडचिड होणं, भूक न लागणं हे सगळे Constipation चे भाऊबंद आहेत.
रमेशला मी काही औषधांसोबत तीन गोष्टी सांगितल्या.
* सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी - चहाआधी.
* जेवणात रोज एक वाटी डाळ, भाजी, कोंडायुक्त पोळी बाहेरचं बंद नाही पण कमी आणि घरचं आधी.
* रात्री जेवणानंतर दहा मिनिटे चालणं लिफ्ट नाही, जिना.
मुख्य म्हणजे शरीराला वेळ द्यायला सुरुवात कर.
तीन महिन्यांनंतर तो फोनवर बोलला.
"डॉक्टर, पोट आता रोज साफ होतं. आणि खरं सांगतो डोकंही हलकं वाटतंय आता."
शरीर बदलत नाही, सवयी बदलतात. शरीर फक्त follow करतं.
तुमच्या घरात असा कुणी आहे का जो "Constipation आहे, पण काही नाही" म्हणत वर्षे काढतोय?
त्याला सांगा हे सहन करायची गोष्ट नाही. बरं होण्याची गोष्ट आहे.
तुम्हाला Constipation बद्दल काही प्रश्न आहेत का? कमेंटमध्ये विचारा.
डॉ. सचिन जाधव
Sukhayu Healthcare | नाशिक
(ही माहिती वैद्यकीय जनजागृतीसाठी आहे. वैयक्तिक तक्रारींसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.)