24/05/2026
पेट्रोल-डिझेल दरवाढीची आणि तुटवडा चर्चा सुरू झाली... आणि अनेक लोकांनी गरजेपेक्षा जास्त साठवणूक सुरू केली.पण इथेच समाजाची खरी मानसिकता दिसते.कारण संकट आलं की काही लोक "सगळ्यांना कसं मिळेल?”हा विचार करत नाहीत...तर "आधी मला मिळालं पाहिजे" या विचाराने वागू लागतात.आणि याच गोष्टीतून पंपांवर गर्दी, भांडणं आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते.हे नवीन नाही...कोरोनाच्या काळातही आपण पाहिलं होतं - लोकांनी sanitizer, औषधं, oxygen यांचीही गरजेपेक्षा जास्त साठवणूक केली. परिणाम काय झाला?ज्याला खरंच गरज होती,त्याच्यापर्यंत गोष्टी उशिरा पोहोचल्या.संकट फक्त महागाईमुळे वाढत नाही,तर समाजातील स्वार्थी मानसिकतेमुळेही वाढतं.कारण जर प्रत्येक जण फक्त स्वतःचाच विचार करायला लागला,तर सर्वात मोठं नुकसान सामान्य आणि गरजू माणसाचंच होतं.समाज ,देश फक्त पैशाने मजबूत होत नाही,
तर संकटात एकमेकांचा विचार करणाऱ्या मानसिकतेने मजबूत होतो