Abdul Gaffar - Deputy Mayor Nanded

Abdul Gaffar - Deputy Mayor Nanded •प्रभाग क्र.12 नगरसेवक मनपा नांदेड. तथा मा. उप-महापौर नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड.

नांदेड शहरातील देगलूर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधील इस्लामपुरा भागात निष्पाप शाळकरी मुलांचा एका महानगरपालिका अंतर...
17/04/2026

नांदेड शहरातील देगलूर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मधील इस्लामपुरा भागात निष्पाप शाळकरी मुलांचा एका महानगरपालिका अंतर्गत चालू असलेल्या बांधकामाच्या कामा मधील खड्डामध्ये पडून मृत्यू झाला. तात्काळ संबंधित गुत्तेदार व प्रशासनातील अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा व पीडितांना प्रशासनांच्या वतीने मोबदला देण्यात यावा‌ याबाबतचे निवेदन पालकमंत्री नांदेड मा.अतुल सावे साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार साहेब व सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मधील देगलूर नाका या भागातील इस्लामपुरा येथील लहान बालकांचा प...
16/04/2026

आज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मधील देगलूर नाका या भागातील इस्लामपुरा येथील लहान बालकांचा पाण्याचा खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तात्काळ मी व माझ्या टीमने तीथे जाऊन प्रशासनातील अधिकारी यांना बोलावून त्या बालकांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.हा खड्डा महानगर पालिका हद्दीत किंवा सार्वजनिक बांधकाम हद्दीत किंवा संबंधित मालकाच्या हद्दीत येत असेल तर तो तात्काळ बुजविण्यात यावा अशी विनंती केली.यावेळी प्रभागातील स्थानिक नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज महाराष्ट्र प्रदेश कार्यालय दादर मुंबई येथे वाजेगाव नांदेड ईदगाह परिसरात घडलेल्या विस्फोटाची केंद्रीय गृहमंत्रालय व NI...
31/03/2026

आज महाराष्ट्र प्रदेश कार्यालय दादर मुंबई येथे वाजेगाव नांदेड ईदगाह परिसरात घडलेल्या विस्फोटाची केंद्रीय गृहमंत्रालय व NIA मार्फत सखोल अशी चौकशी करण्यात यावी व आगामी विधानसभेमध्ये आवाज उठवावा याबाबतचे निवेदन नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब व महानगर अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांना देण्यात आले.यावेळी माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पावडे,माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब, नगरसेवक मुन्ना भाई अब्बास, मोहसीन खान भाई,दीपकसींग हुजारिया, गणेश पाटील ढगे वजीरगेकर, दत्ता मामा येवते,रफीक बागवान आदी उपस्थित होते.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यलय दादर मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कम...
31/03/2026

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यलय दादर मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मा.प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटन सर्जन अभियान आयोजित करण्यात आली होती या बैठकी निमित्त नांदेड लोकसभा खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब,माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, जिल्हाध्यक्ष उत्तर राजेश भाऊ पावडे,माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब, नगरसेवक मुन्ना भाई अब्बास, मोहसिन खान भाई,रफीक बागवान सर्व प्रदेश व प्रमुख पदाधिकारी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार मतदार यादी अचूकता की...
31/03/2026

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार मतदार यादी अचूकता की धोका या ब्रीदवाक्याच्या माध्यमातून SIR हेल्पलाईन प्रकिया नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण व महानगर अध्यक्ष शहर कांग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 12 व 13 मध्ये माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार साहेब माजी नगरसेवक अब्दुल मुखतार बल्लू सेट व नगरसेवक मोहम्मद इब्राहिम भाई यांच्या वतीने सुरू करण्यात आली यावेळी आलेल्या नागरिकांना SIR संबंधित सर्व माहिती व मदत करण्यात येत आहे. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रक्रिया समजून घेऊन डॉक्युमेंट ची पूर्तता करून बी.एल.ओ यांच्या उपस्थितीमध्ये मॅपिंग करून घेत आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटन सर्ज...
31/03/2026

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मा.प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटन सर्जन अभियान आयोजित करण्यात आली आहे.बैठकी निमित्त उपस्थित नांदेड लोकसभा खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब, माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, औरंगाबाद शहर अध्यक्ष युसुफ लीडर, माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब, नगरसेवक मुन्ना भाई अब्बास, मोहसिन खान भाई, आमेर शेख,रफीक बागवान आदी उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी,भारतीय जनता पार्टी विरोधक राजकीय पक्ष व संघटनांचा संयुक्त मोर्चा नागपूर ये...
23/03/2026

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी,भारतीय जनता पार्टी विरोधक राजकीय पक्ष व संघटनांचा संयुक्त मोर्चा नागपूर येथे आयोजित करण्यात आला संविधान चौक नागपूर येथून हा संयुक्त मोर्चा आर एस एसच्या मुख्यालयावर काढण्यात आला यामध्ये प्रमुख मागण्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान यांचे नांव एप्सटीन फाईल मध्ये आले संपूर्ण देशात बदनामी आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली.RSS ही संघटना भाजपाशी निगडित आहे तरी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी.अशा विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर संविधान चौक ते RSS मुख्यालय नागपूर पर्यंत मोर्चा काढण्यात आला.व तसेच आलेल्या सर्व देशांची वास्तव परिस्थिती सांगण्यात आली.यावेळी माझ्या सोबत गटनेते नगरसेवक इंजी प्रशांत भाऊ इंगोले, मुन्ना भाई अब्बास,पाशा भाई, सत्यपाल सावंत, कुलदीप राक्षसमारे,जहीर भाई सिद्दीकी आदी उपस्थित होते.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांना दिनांक 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद ...
23/03/2026

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांना दिनांक 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद निमित्त गोदावरी नदीला लागून वाजेगाव इदगाह परिसरात एका अज्ञात व्यक्तीकडून घडविण्यात आलेल्या स्फोटाबाबत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व तसेच नांदेड जिल्हा फॉरेन्सिक लॅब यांच्याकडून सविस्तर असं अहवाल मागवून आगामी विधानसभेमध्ये यावर आवाज उठवण्याचा व तसेच विशेष चौकशी लावून संबंधित स्फोटाचे गुन्हेगार वर कारवाई करावी याबाबतचे निवेदन देऊन स्फोट बाबत सविस्तर माहिती देताना नांदेड नगरीचे माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब,नगरसेवक इंजी प्रशांत भाऊ इंगोले, बाबू भाई खोकेवाले,नगरसेवक मुन्ना भाई अब्बास,पाशा भाई, इब्राहिम भाई,सत्यपाल सावंत,आदी उपस्थित होते.

दिनांक 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद निमित्त गोदावरी नदीला लागून वाजेगाव इदगाह परिसरात एका अज्ञात व्यक्तीकडून घडविण्यात आल...
23/03/2026

दिनांक 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद निमित्त गोदावरी नदीला लागून वाजेगाव इदगाह परिसरात एका अज्ञात व्यक्तीकडून घडविण्यात आलेल्या स्फोटाबाबत नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व तसेच नांदेड जिल्हा फॉरेन्सिक लॅब यांच्याकडून सविस्तर असं अहवाल मागवून आगामी विधानसभेमध्ये यावर आवाज उठवण्याचा व तसेच विशेष चौकशी लावून संबंधित स्फोटाचे गुन्हेगार वर कारवाई करावी याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब व सुजात दादा आंबेडकर साहेब यांना देण्यात आले यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब,गटनेते नगरसेवक इंजी प्रशांत भाऊ इंगोले, नगरसेवक मुन्ना भाई अब्बास,पाशा भाई, सत्यपाल सावंत, पाशा भाई कुलदीप जहीर भाई शाम कांबळे आदी उपस्थित होते.

आज नांदेड शिवाजीनगर भागातील पवित्र रमजान महिना शेवटचे दिवस चालू असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत दुकाने चालू होती परंतु...
18/03/2026

आज नांदेड शिवाजीनगर भागातील पवित्र रमजान महिना शेवटचे दिवस चालू असल्या कारणाने रात्री उशिरापर्यंत दुकाने चालू होती परंतु पोलीस प्रशासनातील काही अधिकारी यांनी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले व दुकाने बंद करण्यात आले. तात्काळ तेथील दुकानदारांनी माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब यांना फोन द्वारे कळवले.लगेच शिवाजी नगर भागात जाऊन फोन द्वारे पोलीस अधीक्षक साहेब व शिवाजी नगर पोलीस निरीक्षक यांना कळवून सविस्तर माहिती देवून दुकाने चालू करून घेतली.स्थानिक नागरिकांनी माजी उपमहापौर नगरसेवक अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार साहेब यांचे आभार मानले यावेळी नगरसेवक साबेर भाई चाऊस, मुन्ना भाई अब्बास, माजी नगरसेवक मुन्तजीब भाई शिवाजी नगर भागातील सर्व दुकानदार व व्यापारी स्थानिक नागरिक उपस्थित होते.

विरोधी पक्षनेता हा सामान्य जनतेच्या प्रश्नाचा आवाज असतो आणि त्याशिवाय सभागृह चालवणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा आह...
18/03/2026

विरोधी पक्षनेता हा सामान्य जनतेच्या प्रश्नाचा आवाज असतो आणि त्याशिवाय सभागृह चालवणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा आहे.यासाठी ताबडतोब विरोधी पक्षनेत्याची निवड करावी अशी विनंती महापौर साहेबा कडे केली.

Address

Head Office (HILAL TOWER TYRE BORAD DEGLOOR NAKA
Nanded
431604

Telephone

+919970797979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abdul Gaffar - Deputy Mayor Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share