वंचित बहुजन आघाडी नागपूर

  • Home
  • India
  • Nagpur
  • वंचित बहुजन आघाडी नागपूर

वंचित बहुजन आघाडी नागपूर आता फक्त भिमाचं रक्त this is a official page of Vanchit Bahujan Aghadi Nagpur

26/11/2024
वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची ...
17/07/2024

वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी. भेदभावाची सनातनी विचारसरणी झुगारून माणुसकीची संस्कृती संतांनी या मातीत रुजवली आणि स्वराज्याचा पाया रचला. ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे. आषाढी एकादशी निमित्त वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

#वारकरी #आषाढीएकादशी

विजदर वाढीच्या विरोधात वंचित चे आंदोलननागपूर : विदर्भात मुबलक प्रमाणात वीज निर्मिती होते, परंतु विदर्भासोबतच संपूर्ण महा...
13/07/2024

विजदर वाढीच्या विरोधात वंचित चे आंदोलन

नागपूर : विदर्भात मुबलक प्रमाणात वीज निर्मिती होते, परंतु विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वारंवार विज दर वाढीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसतो. महाराष्ट्र शासनाच्या महावितरण ने नुकताच पुन्हा दरवाढी चा निर्णय घेतला, त्याविरोधात आज वंचित बहुजन आघाडी तर्फे दक्षिण नागपूर चे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वात तुकडोजी पुतळा चौक स्थित महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

नागरिकांची वीजदर वाढीतून मोठ्या प्रमाणात शासन व्यवस्था आर्थिक लूट करत आहे. शासनाने प्रथमतः राज्यातील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावे, त्यानंतरच दरवाढीतून जनतेकडून पैसे वसूल करावे. अन्यथा वीजदर वाढ करण्याचा विचार शासनाने करू नये. अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

वीजदर भरमसाठ वाढवून देखिल गावाखेड्यातील नागरिकांना दररोज लोड शेडींगचा सामना करावा लागतो. ग्रामिण भागात दिवसाने लोड शेडिंग केली जाते व रात्रीला तीन फेजचा वीजपुरवठा केल्या जाते. ज्यातून शेतकरी रात्रीला शेतावर जाऊन ओलिताचे काम करतात. हे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे काम आहे. परंतु बेजबाबदार शासन व्यवस्था नागरिकांचे दुःख जाणून घेत नाही. यावर संताप व्यक्त करण्यात आला.

आजचे युग इलेक्ट्रिकचे आहे. इलेक्ट्रिक शिवाय कोणतेही साधन चालत नाही. म्हणून नागरिकांना कमी किमतीमधे सोलर सिस्टम उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्राचे हुकुमशाही जोपासनारे शासन अशा उपाययोजना करेल की नाही याबाबत शंका आहे. प्रीपेड मीटर ला सुद्धा नागरिकांचां विरोध आहे. त्याचप्रमाणे सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकच्या योग्य वापराविषयी सरकारी नोकरदारांना शहाणे बनवावे, यासाठी शासन प्रथमतः शहाणे बनले पाहिजे. जर शासन व्यवस्था कमी दरात वीज उपलब्ध करून देऊ शकत नाही, अशा शासन व्यवस्थेला नागरिकांनी शासन व्यवस्थेतून खाली खेचले पाहिजे, असे मत आंदोलकांनी मांडले.

जर वीज दरवाढ मागे घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दक्षिण विधानसभेच्या महासचिव कांचनताई कांबळे यांनी शासनाला दिला.

प्रसंगी सविता कांबळे, माया मोटघरे, माया पाटील, मंजुषा बागेश्वर, प्रमिता तेलंग, ममता ढोबळे, शत्रुघ्न धनविजय, भीमराव कांबळे, महानंदा मोडक, तारा सोमकुवर, प्रमिला गाडगे, सरिता थूल, आशा भगत व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज याची आज जयंती. शाहू महाराजांनी राजा असूनही आपल्या राज्यकारभारात शोषित, पीडित, ...
26/06/2024

आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज याची आज जयंती. शाहू महाराजांनी राजा असूनही आपल्या राज्यकारभारात शोषित, पीडित, वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरला. किंबहुना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, आरक्षण, शाळा, वसतिगृहे उभारण्याला प्राधान्य दिले.

भेदाभेद नष्ट व्हावा यासाठी समाजिक सुधारणा घडवून आणली. त्यामुळेच आजचा दिवस हा 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा शाहू महाराजांनी पुढे चालवला. अशा क्रांतिकारक आणि पुरोगामी शाहू महाराजांना १५०व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #शाहू_महाराज

- Balasaheb Ambedkar

माता रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. त्या आयुष्यभर दुःखाशी, गरीबीशी जिद्दीने झगडत होत्या. मात्र, हार मानल...
27/05/2024

माता रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. त्या आयुष्यभर दुःखाशी, गरीबीशी जिद्दीने झगडत होत्या. मात्र, हार मानली नाही. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई.

रमाईने अनेक दुःखे झेलली. त्यांच्या इतके मरण कोणीही पाहिले नसेल. तरीही त्या कधीच डगमगल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर त्या एकट्या खंबीरपणे घर चालवत होत्या. अशा त्यागमूर्ती माता रमाई यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो, असे सांगणाऱ्या विश्वाला अहिंसा आणि शांतीच...
23/05/2024

भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो, असे सांगणाऱ्या विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#बुद्ध_पूर्णिमा

- Balasaheb Ambedkar

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी नागपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to वंचित बहुजन आघाडी नागपूर:

Share