नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर

  • Home
  • India
  • Nagpur
  • नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर

नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर � भारतीय जनता पार्टी
नरेंद्र नगर मंडळ, दक्षिण पश्चिम नागपूर
सेवा, समर्पण, संस्कार,विकास

https://www.narendramodi.in/network/userpost-task/6a9408c544dc2d6ca204f420
30/08/2026

https://www.narendramodi.in/network/userpost-task/6a9408c544dc2d6ca204f420

‘मन की बात’च्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र नगर मंडळ सज्ज नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर पंतप्रधान मा. श्री...

29/08/2026

श्रीनगर चौकात दहीहंडीचा जल्लोष; महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने वाढला उत्साह

नागपूर : जन्माष्टमी मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुंदरबन, श्रीनगर, सुयोग नगर, साकेत नगर, नरेंद्र नगर परिसरातील जन्माष्टमी मित्र परिवार व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनगर चौक येथे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या दहीहंडी सोहळ्यास महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व गंगारतीने करण्यात आली. त्यानंतर दहीहंडी स्पर्धेला सुरुवात झाली. गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांना उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व दहीहंडीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदा पथकांचा जल्लोष यामुळे श्रीनगर चौकात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

जन्माष्टमी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ३५व्या वर्षाच्या दहीहंडी सोहळ्याने परिसरातील नागरिकांच्या उत्साहाला नवी उंची दिली.

प्रभाग 35 नगरसेवक, नगरसेविका
नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठकपदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक नगरसेवक श्री. ...
25/08/2026

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक

पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक नगरसेवक श्री. रमेशजी भंडारी यांच्या कार्यालयात, शहराचे पालक श्री. गिरीशजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी नरेंद्र नगर मंडळाचे अध्यक्ष श्री. महेंद्र भुगावंकर, शहर महामंत्री श्री रितेशजी गावंडे ,महामंत्री श्री. भूषणजी केसकर, महामंत्री श्री संजय खोरगडे,श्री संजयजी सिन्हा, श्री. आशिषजी पाठक, सौ. अंजली देशपांडे, सौ.मंजुषाताई भुरे, श्री. अमितजी पुजारी, श्री अरुणजी सोराखे ,श्री. प्रशांत दशपुत्रे, यांची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये पदवीधर मतदार नोंदणी, जास्तीत जास्त फॉर्म भरून घेणे, कार्यकर्त्यांची जबाबदारी व आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी मायक्रो प्लॅनिंग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठकपदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक नगरसेवक श्री. ...
24/08/2026

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक

पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण नियोजन बैठक नगरसेवक श्री. रमेशजी भंडारी यांच्या कार्यालयात, शहराचे पालक श्री. गिरीशजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

यावेळी नरेंद्र नगर मंडळाचे अध्यक्ष श्री. महेंद्र भुगावंकर, महामंत्री श्री. भूषणजी केसकर, श्री. आशिषजी पाठक, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अंजली देशपांडे, श्री. अमितजी पुजारी, श्री. प्रशांत दशपुत्रे, सौ. रुपल दोडके तसेच श्री.मनीष देहाडराय यांची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये पदवीधर मतदार नोंदणी, जास्तीत जास्त फॉर्म भरून घेणे, कार्यकर्त्यांची जबाबदारी व आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी मायक्रो प्लॅनिंग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटितपणे व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मानाचा मुजरा! 🙏

तिरंगा सदैव अभिमानाने उंच फडकत राहो आणि भारत माता की जय! 🇮🇳❤️

जय हिंद! जय भारत! 🇮🇳✨
नरेंद्र नगर दक्षिण पश्चिम मंडळाचे सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Narendra Nagar Mandal Dakshin Paschim Nagpur
नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर

मनःपूर्वक अभिनंदन! 💐महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार व माजी महापौर आदरणीय संदीपजी ज...
14/08/2026

मनःपूर्वक अभिनंदन! 💐

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी आमदार व माजी महापौर आदरणीय संदीपजी जोशी यांची निवड झाल्याबद्दल नरेंद्र नगर मंडळ, दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या अनुभवाचा व नेतृत्वाचा निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत संदीपजींच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

13/08/2026

*भारतीय जनता पक्ष दक्षिण पश्चिम नागपूर तर्फे अखंड भारत दिनानिमित्त उद्या दिनांक 14/08/2026 रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेची सुरवात उद्या सायंकाळी ठीक 5.30 वाजता शताब्दी चौक, रामेश्वरी रिंग रोड या ठिकाणावरून सुरू होणार असून त्याचे समापन नरेंद्र नगर चौक येथे होईल. सर्व आजी माजी नगरसेवक, शहर आणि मंडळ पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्र प्रमुख, कार्यकर्ते व नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन तिरंगा यात्रा यशस्वी करावी ही आग्रहाची विनंती.*

*विनीत.*
*महेंद्र भुगावकर अध्यक्ष नरेंद्र नगर मंडळ.*
*भूषण केसकर, संजय खोरगडे महामंत्री.*
*सचिन जाधव संपर्क प्रमुख*
*संजय सिन्हा सह संपर्क प्रमुख*

07/08/2026

25/07/2026

Address

Narendra Nagar
Nagpur
440915

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नरेंद्र नगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share