EGS Department, Maharashtra

EGS Department, Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from EGS Department, Maharashtra, Government Organization, Mumbai.

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) : व्ही.बी.- जी राम जी (VB-G RAM G) योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कामांचा दस्तावेज

मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी घेलता VB-GRAMG योजनेचा आढावाVB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन,...
25/08/2026

मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी घेलता VB-GRAMG योजनेचा आढावा

VB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, रोजगार आणि E-KYC वर भर द्या - मा. मंत्री महोदयांचे आवाहन

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मा.मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

बैठकीत राज्यातील VB-GRAMG योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेताना सर्वाधिक कामे सुरू असलेल्या ११ जिल्ह्यांच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात आला. ग्रामपंचायतनिहाय कामांची प्रगती, मनुष्यदिवस निर्मिती तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी नंदुरबार, अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची मा. मंत्री महोदयांनी प्रशंसा केली. या जिल्ह्यांनी अवलंबलेल्या प्रभावी कार्यपद्धती जाणून घेत इतर जिल्ह्यांनीही त्याच धर्तीवर नियोजनबद्ध व आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावर विकसित ग्रामपंचायत प्लॅन – पंचवार्षिक आराखडा तयार करून ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. मजुरांना मागणीनुसार वेळेत काम उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा कामांचा शेल्फ (Shelf of Works) तयार ठेवावा. सर्व मजुरांचे E-KYC प्राधान्याने पूर्ण करून जास्तीत जास्त मजुरांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा व योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, योजनेच्या अंतर्गत नियोजनबद्ध ग्रामविकास, मागणीनुसार रोजगार आणि पारदर्शक अंमलबजावणी यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन केले.

या वेळी रोहयो विभागाचे मा. सचिव श्री. आप्पासाहेब धुळाज (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.), मा. सहसचिव (रोहयो) श्री. अतुल कोदे, श्री. कैलास साळुंके, मा. सहआयुक्त डॉ. विवेक घोडके, रोहयो विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपजिल्हाधिकारी (रोहयो) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.



Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR

25/08/2026
मा. मंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पंचसंमेलन उत्साहात संपन्न!“सरपंच हा या योजनेचा शिलेदार आहे” – मा. ...
13/08/2026

मा. मंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पंचसंमेलन उत्साहात संपन्न!

“सरपंच हा या योजनेचा शिलेदार आहे” – मा. मंत्री, श्री. भरत गोगावले

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेचा केंद्रबिंदू ग्रामपंचायत असून, सरपंच हा या योजनेचा मुख्य कणा आहे. गावाच्या विकासात सरपंचांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय पंचसंमेलन आयोजित करण्यात आले.

मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पंचसंमेलनात लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा, २०२५’ (VB-GRAMG Act) बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जलसंधारण, मृदसंधारण, पाणी साठवण व शेतीपूरक कामांना प्राधान्य देत ग्रामीण विकासाला गती देण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतानाच शाश्वत व उपयुक्त मालमत्ता निर्माण करण्यासाठी स्थानिक गरजांनुसार कामांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन मा. मंत्री महोदयांनी केले.

सरपंचांसाठी आयोजित प्रशिक्षण सत्रात मा. सहआयुक्त, VB-GRAMG, श्री. विवेक घोडके यांनी योजनेच्या प्रशासकीय बाबी, अनुज्ञेय ग्रामविकासाचे ३१८ कामे तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या पंचसंमेलनास मा. पालकमंत्री श्री. संजय शिरसाट, आमदार श्रीमती संजना जाधव, आमदार श्री. विलास भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अविनाश गलांडे पाटील, रोजगार हमी योजना विभागाचे मा. सचिव श्री. अप्पासाहेब धुळाज, मा. आयुक्त, VB-GRAMG, श्रीमती अनिता मेश्राम, भा.प्र.से., मा. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा जी. सी., मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम. यांच्यासह रोहयो विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#रोजगारहमी #ग्रामीणविकास #पंचसंमेलन #विकसितभारत

Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Maharashtra DGIPR

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तराव...
03/08/2026

विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा/पंचायत), गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हा एम.आय.एस. समन्वयक कार्यक्रम व्यवस्थापक व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमास आयुक्त, VB-G RAM G, श्रीमती अनिता मेश्राम, भा.प्र.से. यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय बाबी तसेच योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता वृद्धिंगत करून VB-G RAM G योजनेची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.

#रोजगारहमी #ग्रामीणविकास #महाराष्ट्र #प्रशिक्षण

Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR

मनरेगाच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!महाराष्ट्र राज्यातील महात्मा गा...
30/07/2026

मनरेगाच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!

महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) सन २०१४ पासून ३० जून २०२६ पर्यंतच्या कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री मा. श्री. कमलेशजी पासवान यांच्यासोबत कर्तव्य भवन, नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक कामांच्या प्रलंबित निधीचा प्रश्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. महाराष्ट्र राज्याच्या प्रलंबित निधीबाबत केंद्र शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करून येत्या काही दिवसांत राज्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन मा. श्री. कमलेशजी पासवान यांनी यावेळी दिले.

सदर बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे मा. खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मा. सहसचिव श्रीमती रोहिणी भाजीभाकरे, रोजगार हमी विभागाचे मा. सहसचिव श्री. अतुल कोदे तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#मनरेगा #रोजगारहमी #ग्रामीणविकास

CMOMaharashtra
Maharashtra DGIPR
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले

24/07/2026

आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यादरम्यान चित्ररथ, पथनाट्ये व माहितीपत्रकांच्या माध्यमातून विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

या जनजागृती उपक्रमात मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी सहभाग घेत वारकरी बांधवांशी संवाद साधला तसेच नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

#आषाढीवारी2026 #वारी2026 #विकसितभारत #रोजगारहमी

Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR

24/07/2026

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when EGS Department, Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share