MNS Ward 208 म.न.से प्रभाग २०८

  • Home
  • India
  • Mumbai
  • MNS Ward 208 म.न.से प्रभाग २०८

MNS Ward 208 म.न.से प्रभाग २०८ MNS Ward 208 म.न.से प्रभाग २०८ - अधिकृत

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा |आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे |सदस्य नोंदणी अभियान प्रभागातील स...
08/03/2026

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा |
आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे |

सदस्य नोंदणी अभियान

प्रभागातील सर्व आजी माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांस कळविण्यात येते की उद्या ९ मार्च रोजी पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनी पक्षाची द्विवार्षिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ उद्या संपूर्ण महाराष्ट्रात सन्मानीय राजसाहेब ठाकरे यंच्या शुभहस्ते होणार आहे.

त्याच अनुषंगाने आपल्या प्रभागात देखील विविध ठिकाणी सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे.

या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ उद्या मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच सरचिटणीस श्री संजय भाई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सायंकाळी ठीक ६.०० वाजता फेरबंदर येथील नाका तेथे शाखा येथे होणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित रहावे.

आपले नम्र
किरण टाकळे - शाखाध्यक्ष
श्रीम.सुरेखा मारणे -शाखाध्यक्षा

अत्यंत दु:खद घटना. प्रशासनावर मजबूत पकड असलेला जननेता गमावला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼💐
28/01/2026

अत्यंत दु:खद घटना.

प्रशासनावर मजबूत पकड असलेला जननेता गमावला.

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼💐

19/12/2025
कॉपी करायची नाही…….!!!!!!कामं छोटंसं आहे पण महत्वाचं आहे प्रभागातील रामभाऊ भोगले मार्गाचे सिमेंटीकरण केल्यानंतर सदर रस्त...
09/12/2025

कॉपी करायची नाही…….!!!!!!

कामं छोटंसं आहे पण महत्वाचं आहे

प्रभागातील रामभाऊ भोगले मार्गाचे सिमेंटीकरण केल्यानंतर सदर रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहतूक होत होती.

त्याचा परिणाम म्हणून दोन दिवसांपूर्वीच घोडपदेव येथे अपघात झाला.

भविष्यात देखील अपघाताची शक्यता नाकरता येत न्हवती. म्हणूनच मनसे सरचिटणीस श्री. संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेला तातडीने गतिरोधक बसविण्यासाठी विनंती पत्र देऊन गतिरोधक बसवून घेतले.

कृपया नागरिकांनी आपली वाहने सावकाश चालवावीत.

धन्यवाद महानगर पालिका.

आपला नम्र
किरण टाकळे - मनसे शाखाध्यक्ष
भायखळा विधानसभा -प्रभाग २०८

06/12/2025

भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दत्तजयंती निमित्त प्रभागातील विविध मंडळाससरचिटणीस श्री संजय नाईक,विभाग अध्यक्ष जगदीश राऊत, सचिव महेश थोरात, मनविसेचे विभ...
06/12/2025

दत्तजयंती निमित्त प्रभागातील विविध मंडळास
सरचिटणीस श्री संजय नाईक,विभाग अध्यक्ष जगदीश राऊत, सचिव महेश थोरात, मनविसेचे विभाग अध्यक्ष अमोल रोगे, मनीष पाथरे,सचिव श्याम जाधव,महाराष्ट्र सैनिक मिलिंद शिंदे, संजय खामकर,राहुल विचारे,दिलीप परब,सचिन वारंगे, सदानंद कावळे,यज्ञेश चव्हाण,दिनेश शेटे,सागर यादव यांच्या समवेत सदिच्छा भेट देऊन श्री गुरुदेव दत्तानंचे शुभाशीर्वाद घेतले.

तसेच मंडळातील सभासद व तेथील राहिवशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

आपला नम्र

किरण टाकळे -मनसे शाखाध्यक्ष
भायखळा विधानसभा प्रभाग २०८

विभागातील वाळुंज चाळ येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती साजरी झाली. तेथील रहिवाशांच्या विनंतीनुसार  वाळुंज चाळ...
05/12/2025

विभागातील वाळुंज चाळ येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती साजरी झाली. तेथील रहिवाशांच्या विनंतीनुसार वाळुंज चाळ परिसरात महानगर पालिकेच्या माध्यमातून दत्तजयंती आधी सफाई करण्यात आली.

आपला नम्र
किरण टाकळे - मनसे शाखाध्यक्ष
भायखळा विधानसभा प्रभाग २०८

03/12/2025

#बोगसमतदार

Address

फेरबंदर
Mumbai
400033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Ward 208 म.न.से प्रभाग २०८ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share