06/04/2026
माकपच्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या आवाहनानुसार बुवाबाजी–भोंदुगिरीच्या विरोधात माकपचे मुंबईत जबरदस्त आंदोलन
अंधेरी – नालासोपारा – बेलापूर येथे संतप्त निदर्शने
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व वसईचे तहसीलदार यांना निवेदन
बुवाबाजी करणाऱ्या व त्यात सामील असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह सर्व गुन्हेगारांवर कारवाई तसेच 39 आमदारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य समितीने केले होते.
या आवाहनानुसार मुंबईत आज अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिम,नालासोपारा, बेलापूर स्टेशन येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना राज्यस्तरीय निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख मागणी अशोक खरात वर कठोर काइवाई करा तसेच बुवा बाजी व भोंदुगिरीच्या प्रवृत्तीला साथ देणार्या 39 आमदारांचे राजीनामे घ्या या होत्या.
मुंबई शहर च्या निवासी जिल्हाधिकारी श्रीमती डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांना भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी माकपचे मुंबई जिल्हा सचिव शैलेन्द्र कांबळे व पश्चिम उपनगर तालुका समिती सदस्य अन्थोनी ग्रॅब्रियल व दिनेश जाधव हे उपस्थित होते. निवेदनावर चर्चा करीत मागण्यानवर त्वरित कार्यवाही करावी व निवेदन राज्य सरकारला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पश्चिम उपनगर पट्ट्यात अंधेरी रेल्वे स्टेशन पश्चिम येथे संतप्त निदर्शने करण्यात आली. यात ८०-९० स्त्री पुरुषांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पश्चिम उपनगर तालुका समितीचे सचिव कॉ चंद्रकांत बोजगर हे होते.
बुवाबाजी भोंदुगिरी के खिलाफ आम जनता एक हो’, अशोक, खरात वर कठोर कारवाई करा, अशोक खरात च्या समर्थांनार्थ व बुवाबाजीच्या समरेथांर्थ असणार्या ३९ लोकप्रतींनिधीचा राजीनामा घ्या, वैज्ञानिक संविधान के देश मे बुवाबाजी भोंदुगिरी नही चलेगी, या घोषणांनी अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरातील हजारो नागरिकांचे फक्त लक्ष वेधले नाही तर त्यांना या समस्यांवर विचार करण्यास भाग पाडले.
सदर आंदोलनाला पश्चिम तालुका समिती सदस्य व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉ अंजु दवे, सीआयटीयू चे नेते कॉ राजेंद्र जाधव, डीवायएफआय चे नेते दीपक विश्वकर्मा यांनी संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन तालुका सचिव चंद्रकांत बोजगर यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शन ज्येष्ठ कामगार नेते, सीआयटीयू चे राज्य सचिव व वैज्ञानिक डॉ विवेक मोंटेरो यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्यकर्त्या मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना प्रखर प्रश्न विचारले. डॉ नरेंद्र दाभोळकर यांना मारणार्या प्रवृत्ती आज भोंदू – बुवाबाजीला चालना व राजकीय आश्रय देत असल्याचे सांगत संविधानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्वांवर आणि प्रामुख्याने या अवैज्ञानिक विचारसरणी वर हल्ला चढवत याला संपूर्णपणे हाणून पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी पक्ष जिल्हा समिती सदस्य कॉ. के नारायनण, कॉ. कमल रावत, तालुका सदस्य रुहुल अमिन, अन्थोनी ग्रॅब्रियल, रशिदा सय्यद, माधुरी बोजगर, आदर्श विद्यालय शाखा सचिव रमेश शिगवन हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पक्षाचे मुंबई जिल्हा सचिव कॉ. शैलेन्द्र कांबळे यांनी सरकारच्या बुवाबाजी भोंदुगिरीला आश्रय देणाच्या विरोधात बोलत सरकारला यांवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. जादूटोणा विरोधी कायदा फक्त कागदावर ठेवला असून तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आपल्यालाच संघर्ष करावा लागेल. कायदा बनण्यासाठी देखील डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. पुन्हा तसा संघर्ष आपल्याला या प्रवृत्ती विरोधात करावा लागणार असल्याचे आणि त्या संघर्षात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले. या नंतर जबरदस्त घोषणांसह कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला.
नालासोपारा येथील शिर्डी नगर येथे माकपच्या आवाहनानुसार निदर्शने घेण्यात आली. यात एकूण २५-३० लोका व प्रामुख्याने अर्थात 22 महिलांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माकप पश्चिम उपनगर तालुका समिती सदस्य कॉ. मुकेश शर्मा यांनी केला. अनिस चे कार्यकर्ते संदेश घोलप यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शन माकपच्या राज्य समिती सदस्य कॉ. प्रीती शेखर यांनी केले. यावेळी वसई चे तहसीलदार दीपक गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. कॉ. मुकेश शर्मा, कॉ कांती पद्मशाली, कॉ राजा भारसाकले यांनी निवेदन देऊन चर्चा केली.
बेलापूर स्टेशन च्या बाहेर देखील संतप्त निदर्शने करण्यात आली. यात २०-२५ लोकांचा सहभाग होता. जबरदासत घोषणा देण्यात आळया. पक्ष जिल्हा कमिटी सदस्या कॉ रेखा देशपाडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. कॉ राजीव देशपांडे व कामगार व महिला नेत्या कॉ त्रीशीला कांबळे यांनी देखील सरकारच्या भोंदुगिरीला समर्थन देणाच्या विरोधात आणि जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणण्यासाठी आपल्याला जबरदासत संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगत या संघर्षात ३९ लोकप्रतिनिधी व अधिकार्यान्न्वर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
#अंधश्रद्धा_विरोधात_महाराष्ट्र