03/11/2025
मुंबई आज दिनांक रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र कोर कमीटी व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या समोर पत्रकार परिषद घेऊन येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष करून मुंबई (BMC), ठाणे, पुणे , नाशिक महानगरपालिका निवडणूक विभागातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा रस्ते पाणी लाईट इत्यादी उत्तम प्रकारे मिळवून देण्यासाठी व वाढती महागाई, शहरांना व गावांना आलेला बकालीपणा,वाढती गुंडगिरी- भ्रष्टाचार , शेतकरी कर्जमाफी व मतदार याद्यांमधील असलेला घोळ -चुका या मुद्यावर लढवणार आहोत. ना कोणती युती व नाही आघाडी असे म्हणुन एकेला चलोरे म्हणून निवडणूक लढवणार आहोंत. BMC बृहन्मुंबई विभागात राष्ट्रीय स्वराज्य सेनेने १६ ठिकाणी विधानसभा निवडणुक -२०२४ स्वबळावर बासरी चिन्हा वर लढवली आहे. मुंबई मध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याने व सर्व पदाधिकारी व उमेदवार सुशिक्षित असल्याने जनसामान्यांच्या अपेक्षा या पक्षाकडून आहेत.मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा विभागात हि आपले बलाढ्य उमेदवार दिले होते .नगरसेवक ची निवडणूक लढवावी अशी आता लोकामधुन मागणी होत असल्याने राष्ट्रीय स्वराज्य सेना हि BMC निवडणूक लढवणार आहे असे आता जाहीर करण्यात येत आहे. Election commission of India नी विधानसभा निवडणुकीत बासरी हे निवडणूक चिन्ह दिले होते. व BMC निवडणूकीत हि आम्हाला हेच बासरी चिन्ह भेटावे अशी लेखी मागणी हि राज्य निवडणूक आयोगाला केलीआहे असे हि जाहीर करण्यात आले आहे.
- ॲड. श्रीहरी बागल .
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष ) REGISTER BY ELECATION COMMUNICATION OF INDIA
निवडणूक चिन्ह -बासरी. संपर्क -9820305909