AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Mumbai
  • AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र The All India Democratic Women's Association is an independent left oriented women's organisation.

27/08/2026
*अखिल भारतीय जनवादी महिला संघटना* महाराष्ट्र राज्य कमिटीई-५, एन्सा हटमेंट्स, महापालिका मार्ग, आझाद मैदानाजवळ, मुंबई –१ e...
27/08/2026

*अखिल भारतीय जनवादी महिला संघटना*
महाराष्ट्र राज्य कमिटी
ई-५, एन्सा हटमेंट्स, महापालिका मार्ग, आझाद मैदानाजवळ, मुंबई –१
e mail [email protected]

Sonya Gill, former State Secretary and former Central Executive Committee member of the All India Democratic Women’s Association (AIDWA) and one of the pillars of the organisation is no more with us. Her sudden and deeply shocking demise has devastated us and the left, democratic movement. She fought a long and determined battle against a serious illness for many years, yet remained active in the movement until the very end. She even participated in the nationwide Jail Bharo agitation on August 10, 2026. Sonya Tai showed us, through her own life, what ideological commitment and dedication truly means in practice.

This is an irreparable loss for the Maharashtra State and Mumbai District units of the AIDWA. In this difficult hour, all our like-minded comrades, leaders of various political parties and women’s organisations, and her old and new colleagues came to take a last glimpse of her. Many others who could not come sent touching messages. All this response was not only a tribute and a testament to Sonya’s work, but also brought immense solace to all of us. For this, we offer our heartfelt thanks to you all, with heavy hearts but deep gratitude.

The struggle will continue. We will all remain together in it. Strengthening our united movement, and defeating the Manuwadi, communal and pro-corporate forces—this alone will be a true tribute to Sonya tai.

Once again, revolutionary greetings and heartfelt gratitude to all of you.

*Naseema/Prachi/Rekha/Hemlata/Preethy/Sugandhi/Anju/Sangita*

AIDWA State Centre

कॉम्रेड्स, आपल्या मार्गदर्शक कॉम्रेड सोन्या गिल यांचे दुःखद निधन 25 ऑगस्ट रोजी झाले. *त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 26 ऑ...
26/08/2026

कॉम्रेड्स,
आपल्या मार्गदर्शक कॉम्रेड सोन्या गिल यांचे दुःखद निधन 25 ऑगस्ट रोजी झाले.

*त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता जनशक्ती कार्यालय, वरळी येथे सर्वांसाठी ठेवण्यात येइल* व

दुपारी 3.30 वाजता *दादर चैत्यभूमी जवळील शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमी येथे अंतिम निरोप दिला जाईल.*

कॉ. सोन्या गिल अमर रहे!
कॉ. सोन्या गिल को लाल सलाम!

कॉम्रेड्स, आपल्या मार्गदर्शक कॉम्रेड सोन्या गिल यांचे दुःखद निधन 25 ऑगस्ट रोजी झाले. *त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 26 ऑ...
26/08/2026

कॉम्रेड्स,
आपल्या मार्गदर्शक कॉम्रेड सोन्या गिल यांचे दुःखद निधन 25 ऑगस्ट रोजी झाले.

*त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता जनशक्ती कार्यालय, वरळी येथे सर्वांसाठी ठेवण्यात येइल* व

दुपारी 3.30 वाजता *दादर चैत्यभूमी जवळील शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमी येथे अंतिम निरोप दिला जाईल.*

कॉ. सोन्या गिल अमर रहे!
कॉ. सोन्या गिल को लाल सलाम!

ब्रिज भूषण सिंग यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय अत्यंत दुर्दैवीदिल्ली उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाद्वारे महिला क...
03/08/2026

ब्रिज भूषण सिंग यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय अत्यंत दुर्दैवी

दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालाद्वारे महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले भाजपचे माजी खासदार ब्रिज भूषण शरण सिंग आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून महिला खेळाडूंना नाउमेद करणारा आणि अत्याचार करणाऱ्याना संजीवनी देणारा आहे, असे स्पष्ट मत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची महाराष्ट्र राज्य कमिटी व्यक्त करीत आहे. सध्याच्या काळात इतर अनेक घटनात्मक संस्थाप्रमाणे प्रमाणे न्यायव्यवस्थेने सुद्धा आपले स्वातंत्र्य गमावले आहे की काय ही शंका या निकालाने बळावली आहे.

सर्व क्षेत्रांत, आणि त्यातही क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी महिला खेळाडूंना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शासन आणि न्यायव्यवस्थेने हे लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

मात्र त्याचबरोबर, या सर्व परिणामांची जाणीव असूनही हिमतीने आपल्यावरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि त्यांच्या बाजूचे अखेरपर्यंत उभे राहणारे त्यांचे पुरुष सहकारी बजरंग पुनिया यांच्या धैर्याला जनवादी महिला संघटना सलाम करीत आहे. या सर्वांची लढाई वाया जाणार नाही. या लढाईतून प्रेरणा घेऊन अत्याचार पीडिता अधिक हिमतीने पुढे येतील, अशी खात्रीही आम्ही व्यक्त करीत आहोत.

विनेश फोगाट हिने आपली लढाई सुरूच राहणार असल्याच्या केलेल्या व्यक्तव्याचेही आम्ही स्वागत करीत आहोत.
नसीमा शेख – राज्य अध्यक्ष
प्राची हातिवलेकर – राज्य सचिव

मीराबाई चानू आणि शर्मिला धनकरतुम्ही फक्त बारबेल्सच उंचावल्या नाहीत तर, कोट्यवधी भारतीय महिलांच्या  आशा-आकांक्षा उंचावल्य...
29/07/2026

मीराबाई चानू आणि शर्मिला धनकर

तुम्ही फक्त बारबेल्सच उंचावल्या नाहीत तर, कोट्यवधी भारतीय महिलांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या आहेत.
तुमची ताकद, शिस्त आणि चिकाटी ही पितृसत्ताक व्यवस्थेने आपल्या सर्व बहिणींसमोर उभ्या केलेल्या प्रत्येक अडथळ्याला मारलेला एक जोरदार धक्का आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, महाराष्ट्र

तिला ठार मारायला आले, तेव्हा ती डगमगली नाहीएक केस तिला काय घाबरवणार?कॉम्रेड आईशे घोष यांना क्रांतिकारी सलामी, आणि दिल्ली...
29/07/2026

तिला ठार मारायला आले, तेव्हा ती डगमगली नाही
एक केस तिला काय घाबरवणार?
कॉम्रेड आईशे घोष यांना क्रांतिकारी सलामी, आणि दिल्लीतील तरुण विद्यार्थी नेतृत्वाला!

विमल रणदिवे (१९१५–१९९९): स्वातंत्र्यासाठी झटणारे धगधगते जीवन विमल रणदिवे (१९१५–१९९९) या महाराष्ट्रातील एक तेजस्वी भारतीय...
24/07/2026

विमल रणदिवे (१९१५–१९९९):
स्वातंत्र्यासाठी झटणारे धगधगते जीवन

विमल रणदिवे (१९१५–१९९९) या महाराष्ट्रातील एक तेजस्वी भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेत्या होत्या. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. परदेशी कापडाचा बहिष्कार करणाऱ्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे १५ व्या वर्षी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९४६ च्या रॉयल इंडियन नेव्ही बंडात त्या प्रमुख संयोजिका म्हणून उदयास आल्या. त्यांनी मुंबईत जनसभा आयोजित केल्या आणि बंडखोर खलाशांच्या पाठिंब्याने मोठमोठे मोर्चे काढले. सीपीआय आणि नंतर सीपीआय(एम) नच्या निष्ठावान सदस्या म्हणून त्या आयुष्यभर कामगार चळवळ आणि कामगार हक्कांसाठी झटल्या. त्यांच्या अतुलनीय धैर्यामुळे त्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारी वामपंथीय महिला नेत्यांमधील एक आघाडीच्या नेत्या ठरल्या.

कॅप्टन लक्ष्मी सेहगळ या क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, वैद्यकीय डॉक्टर तथा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय...
23/07/2026

कॅप्टन लक्ष्मी सेहगळ या क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक, वैद्यकीय डॉक्टर तथा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेतील (आय.एन.ए.) प्रमुख अधिकारी होत्या, ज्यांनी सर्व-महिला राणी झाशी रेजिमेंटचे नेतृत्व केले. पात्र स्त्रीरोगतज्ज्ञ असूनही, नेताजींच्या प्रेरणेने त्यांनी सिंगापूरमधील आपली वैद्यकीय प्रॅक्टिस बंद करून ही रेजिमेंट स्वीकारली आणि तात्पुरत्या आझाद हिंद सरकारमध्ये त्या एकमेव महिला मंत्री झाल्या. ब्रिटिशांनी त्यांना बंदिवान केल्यानंतर व नंतर सुटका झाल्यावर, त्या कानपूर येथे स्थायिक झाल्या व स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या दवाखान्याद्वारे गरीब व उपेक्षित जनतेची सेवा करण्यासाठी आयुष्यभर तत्पर राहिल्या. त्या सातत्याने सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या म्हणून सक्रिय होत्या, भारतीय कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी) सामील झाल्या व ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (अ.भ.ज.म.सं) च्या त्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. इ.स. २००२ मध्ये त्यांना डाव्या पक्षांच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली, जे धर्मनिरपेक्ष व समाजवादी मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा व प्रतिष्ठेचा स्पष्ट पुरावा आहे. कॅप्टन लक्ष्मी सेहगळ यांचे संपूर्ण आयुष्य अतुलनीय शौर्य, समर्पण व कर्तव्यनिष्ठतेने ओतप्रोत होते, आणि तो वारसा आजही करोडो जनांना प्रेरणा देत आहे.

Address

E-5, ENSA Hutments, Near Press Club Mumbai
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र:

Shortcuts

Share