Gajanan Narayan Rane

  • Home
  • Gajanan Narayan Rane

Gajanan Narayan Rane सरचिटणीस | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
(अधिकृत फेसबुक पेज)

18/08/2026

१८ ऑगस्ट २०२६ 📍श्रमिकगड,दादर

17/08/2026

कानबाईच्या सणानिमित्त जमलेल्या तमाम खानदेशी कामगार भाऊ- बहिणींस ना कानबाई महोत्सवनी लई लई शुभेच्छा..

आपलं गाव-खेडं सोडीसन कामधंद्याच्या नादानं तुम्ही मोठ्या शहराम्हाई आलात, पन आपली माती, आपली मायबोली, आपली रीत-रिवाज अन् आपली संस्कृती अजून बी आठे जिवंत ठिव राहीना यानं म्हणा मल्हे लई आनंद वाटस भाऊ..

कानबाई म्हंजे आपल्या खानदेशातला लई मोठा अन् मनापासून साजरा करायचा सण..

कानबाईच्या सणाला आपआपल्या गावाले जाऊन माय-मातीची ओढ भागवायची, ही तुम्हणी परंपरा. पन तुम्ही गावाले न जाता, ज्या शहराम्हाई कामधंदा करता, त्येच ठिकाणी लई उत्साहानं कानबाई बसवून आपली संस्कृती जपी राहिणात हे बघून खरंच काळीज भरून येस..

गाव दूर गेलं, पन गाव मनातून दूर जाऊ द्यायचं न्हाई, हे तुम्हन दाखवून दिन्ह .आपल्या खानदेशी संस्कृतीची पताका अशीच उंच ठिवा..

कानबाई माय तुमच्या सगळ्यांवर अन् तुमच्या परिवारावर सुख-समाधान, आरोग्य अन् भरभराटीची कृपा करो, हीच मनापासून प्रार्थना शे..

तमाम खानदेशी कामगार भाऊ-बहिणीले कानबाई महोत्सवनी मनापासून लई लई गहिऱ्या शुभेच्छा..
बरं का भो..

मी बी खानदेशाम्हाई काम करेल शे ; म्हणून कानबाई सणना महत्त्व मले चांगलंच ठाऊक हाय..!

#कानबाईमाता #खानदेश #जळगाव #धुळे #नंदुरबार #नाशिक

15/08/2026

घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या मराठी कामगारांनी न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेली मनसेची युनियन सोडावी म्हणून कामगारांना आमिष देणाऱ्या मालकाचा दलाल...

#मनसे

10/08/2026

SGL lab ही आंतरराष्ट्रीय कंपनी हिरे आणि मौल्यवान वस्तूंचे ग्रेडिंग आणि सर्टिफिकेशन करणारी संस्था आहे. तीन महिन्यापूर्वी येथील काही कामगारांना सस्पेंड करण्यात आले होते. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे किंवा त्यांना relieve करावे यासाठी कामगारांनी मनसे कामगार सेनेकडे दाद मागितली. व्यवस्थापनाने सुरवातीला वेळकाढूपणा केला पण कामगार सेनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकी नंतर कंपनीच्या संस्थापक संचालक श्रीमती शिरीन बंदुकवाला आणि HR व्यवस्थापक प्राजक्ता पवार यांनी श्रमिकगड या कार्यालयात भेट घेऊन कामगारांचे कायदेशीर देणी देण्याची तयारी दर्शवली.

09/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या सततच्या पाठपुराव्याने गुजरात मधील Kotak Mahindra Bank कामगारांना central government ने जाहीर केलेले मिनिमम wages मिळवून देण्यात यश आले. त्यामुळे गुजरात मधील कामगारांचा पगार 12हजारावरून आता 21हजार रुपये करण्यात आला, तसेच यासोबत 21 नोव्हेंबर 2025 पासून आजपर्यंतचा थकीत पगारवाढ म्हणून जवळजवळ प्रत्येकी 72हजार रुपये सुद्धा एक रकमी मिळणार आहेत.
भारतात सेंट्रल गवर्नमेंट ने जाहीर केलेलं मिनिमम wages सर्वप्रथम देणारी कोटक महिंद्रा बँकेतील अधिकाऱ्यांचे देखील आभार

06/08/2026
06/08/2026

कर्नाटकातील सरकार केंद्र सरकार ने जाहीर केलेल्या मिनिमम वेजेस पेक्षा जास्त मिनिमम वेजेस जी आर काढून कामगारांना द्यायला सांगत असेल. तर केंद्र सरकारला सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारने महाराष्ट्र काम करणाऱ्या कामगारांसाठी जास्त मिनिमम वेजेस देण्यासाठी जी आर का काढत नाही

04/08/2026

bank मध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेंट्रल गवर्नमेंट ने जाहीर केलेला मिनीमम वेजेस पूर्वलक्षी भरपाईने देण्यात यावे तसेच कामगारांना मेडिक्लेम योजना आणि सिनीओरिटी प्रमाणे पगारवाढ देण्यात यावी यासाठी व्यवस्थापनाची भेट घेतली.
बँक व्यवस्थापनाने संबंधित कामगाराना पगारवाढ पूर्वलक्षी भरपाईने देण्याची तयारी दर्शवली तसेच Mediclaim आणि सिनियरिटी प्रमाणे पगारातली तफावत देखील राखण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajanan Narayan Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gajanan Narayan Rane:

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share