We Support PM Narendra Modi For 2024

We Support PM Narendra Modi For 2024 We are supporters of Prime Minister of India Shri. Narendra Modi. Leading politician from Bharatiya Janata Party.

30/01/2026

नियतीचं 'नॉट रिचेबल' धक्कातंत्र: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'अजित पर्व शांत' !

श्री. प्रमोद रोहिदास परदेशी (प्रदेश सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र) ​- एक भावनिक शब्दांजली

​महाराष्ट्राच्या राजकारणात 'धक्कातंत्र' हा शब्द ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, ते अजित अनंतराव पवार आज खऱ्या अर्थाने कायमचे 'नॉट रिचेबल' झाले. पण हा धक्का मात्र सबंध महाराष्ट्राला सुन्न करणारा आहे. कितीही संकटं कोसळली तरी हसतमुख राहणारे आणि प्रत्येक वादळाला छातीवर घेणारे 'देवेन भाऊ' आज मात्र आपल्या डोळ्यांतील दाटलेली वेदना लपवू शकले नाहीत. सुनेत्रा वहिनींच्या भेटीत देवेंद्रजींची ती शून्यात हरवलेली नजर आणि वाकलेले खांदे बरंच काही सांगून गेले. महाराष्ट्राला घडवण्याच्या निश्चयाने जोडलेली ही 'दोस्तीची दोरी' नियतीने अशी अचानक तोडून टाकावी, हे मनाला पटत नाहीये.

​२२ जुलैची ती 'हॉंट' करणारी तारीख

​देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांच्यात केवळ राजकीय मैत्री नव्हती, तर एक अनोखा योग होता—दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी, २२ जुलैला! आजवर हा दिवस उत्साहाचा असायचा, पण यापुढे ही तारीख देवेंद्रजींना आयुष्यभर सलत राहील. त्यांनी आपली 'मेजर सपोर्ट सिस्टम' आणि आपला 'बर्थडे पार्टनर' गमावला आहे, हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे.

​शिस्त, जरब आणि रांगडा स्वभाव

​अजित दादा म्हणजे केवळ एक नाव नव्हतं, तर तो एक दरारा होता. त्यांची प्रशासनावरची कमांड, त्यांचा जनसंपर्क आणि वयाच्या या टप्प्यावरही असणारा त्यांचा फिटनेस थक्क करणारा होता. सकाळी ६:३० वाजता कामाला सुरुवात करणारा हा 'कमांडर' जेव्हा प्रशासनाचे लगाम हातात घ्यायचा, तेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांचीही बोलती बंद व्हायची.

​त्यांच्या स्वभावात एक विलक्षण 'ह्युमर' होता. सभेत 'दादा आय लव्ह यु' म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला हसत "अरे बायकोला जाऊन म्हण, ती म्हणल गडी कसा काय बिघडला" असं मिश्किलपणे म्हणणारे दादा असोत, किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना "अरे बाबा मी काय तुला म्हातारा वाटलो का?" असा खोचक टोला लगावणारे दादा... त्यांची प्रत्येक कोपरखळी समोरच्याला आपलंसं करायची. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून चिमटा काढताना "मी मात्र उपमुख्यमंत्री होणार आहे" असं म्हणण्याची दिलदारी फक्त अजित दादाच दाखवू शकत होते.

​सामान्य कार्यकर्त्याचा 'आधार'

​२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीमध्ये सुमित्रा ताईंसाठी (सुनेत्रा पवार) माइक्रो ओबीसी आणि धनगर समाजाची मोट बांधताना दादांनी दिलेला वेळ आजही माझ्या स्मरणात आहे. दोन तास बसून प्रत्येक कार्यकर्त्याची इत्थंभूत माहिती काढणारे दादा पाहिले की स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. विधानसभा निवडणुकीनंतर दादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंगल्यावरती आम्ही दादांची भेट घेऊन दत्तामामा यांना कॅबिनेट मंत्री विदर्भातून संतोष भाऊ महात्मे यांना विधान परिषद आमदार करावे अशी विनंती मी असता दादांनी मिश्किल उत्तर दिले "अहो साहेब दत्ता कॅबिनेट मंत्री झाला समजा व संतोष पण येणाऱ्या काळात आमदार असणार आहे" दत्ता मामांना मंत्री झाले वा संतोष महात्मे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला शब्द देणे असो, दादांनी कार्यकर्त्यांना कायम बळ दिले. संतोष भाऊंचे स्वप्न जरी अपूर्ण राहिले असले, तरी दादांनी दिलेला विश्वास आजही कार्यकर्त्यांच्या मनात जिवंत आहे व दादांचे वारसदार संतोष भाऊंना नक्कीच न्याय देतील.

​टीकेला माणुसकीने उत्तर देणारा नेता

माझा मित्र नेहमी सोशल मीडियावर पवार कुटुंबावर टीका करायचा, ज्याचं प्रशासकीय काम कुठेच होत नव्हतं, त्याचं काम दादांनी एका महिन्यात करून दिलं. सकाळी ६:३० ला भेटायला आल्यावर "हा तोच ना मला सोशल मीडियावर शिव्या घालतो?" असं विचारतानाही दादांच्या मनात कटुता नव्हती. तो कार्यकर्ता दादांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर फोनवर मी Hello बोलण्या आधीच १० मिनिटे रडत होता, यातच दादांच्या 'माणुसकी'ची पोचपावती मिळते.

संघ शताब्दी वर्षानिमित्त दादांना पुस्तक देण्यास आम्ही गेलो असता गडबडीत ते पुस्तक स्वीय सहाय्यकने दादांकडून घेऊन मागे ठेवला एवढ्या गर्दीत दादांनी पुन्हा विचारले पुस्तक कसले होते तर आम्ही म्हटलं "संघ शताब्दी वर्ष" अचानक दादा स्वीय सहाय्यकावर वर चिडले म्हटले तुला कळतं का? पुस्तक परत आण व ते पुस्तक दादांनी ओपन केले व त्यावर कुणी दिले त्याचे फोन नंबर घेतले व स्वतःची सही केली जेणे करून पुस्तक वाचल्यावर नक्की प्रतिक्रिया देईल, त्यांनी ज्या शिस्तीने आणि आदराने विचारपूस केली, ती त्यांच्या जमिनीवरच्या नेतृत्वाची ओळख आहे.

​साहेब खूप झाले, पण 'दादा' एकच!

​स्वतःच्या राजकीय गुरूंना आणि सख्ख्या काकांना "वय झालंय तुमचं, आता थांबणार नसाल तर आम्हाला कधी चान्स मिळणार?" असं रोखठोकपणे विचारणारा हा 'नोनॉन्सेन्स' माणूस महाराष्ट्रात दुसरा होणे नाही. राजकारणात 'साहेब' खूप झाले आणि होतीलही, पण हक्काने कान ओढून शिस्त लावणारा, आणि शब्दाचा पक्का राहणारा 'दादा' फक्त अजित अनंतराव पवारच!

​पहाटेचा शपथविधी असो किंवा ऐन भरात असताना आयुष्याच्या खेळपट्टीवरून कायमचं 'नॉट रिचेबल' होणं असो... दादा, तुम्ही जाता जाता महाराष्ट्राला दिलेला हा 'शॉक' कधीही विसरता येणार नाही.

​दादा, 'मनातून' काहीच जात नाहीये... वी मिस यू Ajit Pawar दादा!

- श्री. प्रमोद रोहिदास परदेशी
प्रदेश सरचिटणीस भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र
मोबाईल नं. ९८६०९८२९४८

कृपया जादा से जादा share करिये और twitter पर retwitee करीये.
25/11/2025

कृपया जादा से जादा share करिये और twitter पर retwitee करीये.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when We Support PM Narendra Modi For 2024 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to We Support PM Narendra Modi For 2024:

Share

Category