Yashwant Jadhav - यशवंत जाधव

Yashwant Jadhav - यशवंत जाधव शिवसेना उपनेते | मा. अध्यक्ष स्थायी समिती, बृहनमुंबई महानगरपालिका | मा. सभागृह नेता, बृहनमुंबई महानगरपालिका | रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख.

श्री. यशवंत कमलाकर जाधव
शिवसेना उपनेते
नगरसेवक - १९९७, २००७, २०१७ (बृहन्मुंबई महानगरपालिका)
सभागृह नेता - २०१७
अध्यक्ष - स्थायी समिती २०१८, २०१९, २०२०, २०२१
अध्यक्ष - स्थापत्य समिती (शहर) २००० ते २००१
अध्यक्ष - प्रभाग समिती ( A,B, & E Ward) २००१ ते २००२
अध्यक्ष - बाजार व उद्यान समिती २००७ ते २००९
सदस्य - स्थायी समिती १९९७ ते २००२ आणि २००९ ते २०१२
VJTI बोर्ड मेंबर - १९९७ ते २००२
प्रिंस वेल्स म्युझीयम बोर्ड मेंबर - १९९७ ते २००२
माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कार्याध्यक्ष - १९९५ ते २००५
अध्यक्ष - २००५ ते आजपर्यंत
कार्याध्यक्ष - बौद्धजन सहाय्यक संघ. माझगाव ताडवाडी
--------------------------------------------------------

सौ. यामिनी यशवंत जाधव
*नगरसेविका
*अध्यक्ष - बाजार व उद्यान समिती.
*सदस्य - शिक्षण समिती
*सदस्य - जिल्हा नियोजन समिती ( मुंबई शहर)

मराठी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारे, आपल्या साहित्यकृतींतून जीवनाचे विविध पैलू उलगडणारे थोर सा...
02/09/2026

मराठी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून देणारे, आपल्या साहित्यकृतींतून जीवनाचे विविध पैलू उलगडणारे थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन.

भारतीय हॉकीला ऑलिम्पिक सुवर्णपदकाची ऐतिहासिक उंची मिळवून देणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभ...
29/08/2026

भारतीय हॉकीला ऑलिम्पिक सुवर्णपदकाची ऐतिहासिक उंची मिळवून देणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून, संदेशांद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा, सदिच्छा आण...
29/08/2026

माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवरून, संदेशांद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!

आपण व्यक्त केलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू देत, हीच मनापासून अपेक्षा.

लांजा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्नलांजा शहरातील बौद्ध समाजाच्...
28/08/2026

लांजा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

लांजा शहरातील बौद्ध समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीचे केंद्र ठरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या प्रस्तावित इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार किरण सामंत यांच्या शुभहस्ते, तसेच शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख यशवंतजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करताना सामाजिक एकता, समता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी हे स्मारक भवन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार किरण सामंत यांनी बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. “बौद्धवाड्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही. समाजाच्या मूलभूत गरजा, पायाभूत सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देऊन ती कामे पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले.

शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख यशवंतजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. समाजाच्या विकासासाठी शासन आणि जनतेमध्ये समन्वय साधत विविध विकासकामांना गती देण्याची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा सावली कुरूप, अनिरुद्ध कांबळे, संतोष जाधव, सचिन जाधव, श्रीकांत कांबळे, आर. बी. कांबळे, सिद्धार्थ देवदेकर, भिकाजी कांबळे, दत्ताराम कांबळे, भागोजी कांबळे, किरण कांबळे, भाऊ कांबळे, धनवडे साहेब, मोहन धनावडे, विलास धनावडे, संतोष कांबळे यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तसेच शेकडो धम्मबांधव, धम्मभगिनी, नागरिक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि बंधुतेच्या विचारांना कृतीची जोड देत लांजा परिसरातील बौद्ध समाजाच्या विकासाला नवी दिशा देणारे हे स्मारक भवन निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

#लांजा

बहिणीच्या प्रेमाचा, मायेचा आणि आशीर्वादाचा धागा म्हणजे रक्षाबंधन! भाऊ-बहिणीच्या या अतूट नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव...
28/08/2026

बहिणीच्या प्रेमाचा, मायेचा आणि आशीर्वादाचा धागा म्हणजे रक्षाबंधन!

भाऊ-बहिणीच्या या अतूट नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा सदैव असाच कायम राहो, हीच सदिच्छा.

रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

समुद्राशी असलेले अतूट नाते आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या नारळी पौर्णिमेच्या मंगल पर्वानिमित्त सर...
27/08/2026

समुद्राशी असलेले अतूट नाते आणि आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या नारळी पौर्णिमेच्या मंगल पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!





धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
26/08/2026

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

प्रेम, करुणा आणि सेवाभाव यांचा आदर्श आपल्या कार्यातून निर्माण करणाऱ्या मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!    ...
26/08/2026

प्रेम, करुणा आणि सेवाभाव यांचा आदर्श आपल्या कार्यातून निर्माण करणाऱ्या मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
26/08/2026

सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सहज, ओघवत्या शब्दांतून ग्रामीण जीवनाचे भावविश्व आणि मानवी नात्यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना ...
24/08/2026

सहज, ओघवत्या शब्दांतून ग्रामीण जीवनाचे भावविश्व आणि मानवी नात्यांचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.





Address

Mumbai
400010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Jadhav - यशवंत जाधव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category