23/03/2025
हाथ जिनमें हो जुनून कटते नहीं तलवार से,
सर जो उठ जाते है वो झुकते नहीं ललकार से !
आज २३ मार्च म्हणजेच भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारी त्रिकुटाच्या बलिदानाची आठवण करून देणारा दिवस ! ९४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत मातेच्या या तीन सुपुत्रांनी हसत हसत फाशीच्या तख्ताला जवळ केलं आणि मातृभूमीच्या वेदीवर आपले प्राणार्पण केले.
त्यांचं हे महान बलिदान येणाऱ्या असंख्य पिढ्यांना देशभक्तीची आणि एकतेची प्रेरणा देत राहील. हुतात्मा भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन !
#शहीद_दिवस