Vijay Lipare

Vijay Lipare शिवभक्त | Member- DPDC, Mumbai City | शिवसेना भायखळा विभागप्रमुख | Proud Father | Founder Urja Foundation | मुंबईकर | ऊर्जा Politics

“मुरली देवरा नेत्र रुग्णालयासाठी लढा — रुग्णसेवा थांबणार नाही!”इमारत धोकादायक असली तरी नागपाडा-भायखळा परिसरातील सर्वसामा...
02/09/2026

“मुरली देवरा नेत्र रुग्णालयासाठी लढा — रुग्णसेवा थांबणार नाही!”

इमारत धोकादायक असली तरी नागपाडा-भायखळा परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची रुग्णसेवा एका दिवसासाठीही थांबणार नाही! रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर याच विभागात असलेल्या ‘ओझोन रिहॅबिलिटेशन सेंटर’ (Ozone Rehabilitation Centre) येथेच करण्यात यावे, यासाठी माननीय खासदार श्री. मिलिंद देवरा जी यांनी महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना अधिकृत पत्र देत प्रशासनाकडे आक्रमक भूमिका मांडली आहे.

माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. पुनर्विकास नक्की करा, पण नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही! जोपर्यंत रुग्णालयाचे याच परिसरात तात्पुरते पुनर्वसन होऊन सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हा लढा आणि पाठपुरावा असाच सुरू राहील.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Milind Deora Shivsena - शिवसेना

भायखळा येथील ‘माझगावचा मोरया’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यादरम्यान घडलेल्या अंडीफेकीच्या दुर्दैव...
28/08/2026

भायखळा येथील ‘माझगावचा मोरया’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यादरम्यान घडलेल्या अंडीफेकीच्या दुर्दैवी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दक्षिण मुंबई संपर्कप्रमुख आमदार मा. श्री. निलेश राणे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

गणरायाच्या आगमनाच्या पवित्र सोहळ्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटनेची गंभीर दखल घेत, “या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. पोलीस प्रशासनाशी माझा सातत्याने संपर्क असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित गणेशभक्त व स्थानिक नागरिकांना दिला.

गणेशोत्सव हा आपल्या सामाजिक ऐक्याचा, श्रद्धेचा आणि बंधुभावाचा उत्सव आहे. अशा घटनांमुळे उत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागू नये, यासाठी प्रशासनाने तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, स्थानिक नागरिक तसेच मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Shivsena - शिवसेना
Nilesh Narayan Rane Office of Nilesh Rane

आज नारळी पौर्णिमेनिमित्त भायखळा शिवसेना शाखा क्र. २०९ आणि शिवसेना उपनेते मा. यशवंत जाधव साहेब तसेच नगरसेविका तथा स्थापत्...
27/08/2026

आज नारळी पौर्णिमेनिमित्त भायखळा शिवसेना शाखा क्र. २०९ आणि शिवसेना उपनेते मा. यशवंत जाधव साहेब तसेच नगरसेविका तथा स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा मा. सौ. यामिनी यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शन व पुरस्कृत सहकार्याने आयोजित साईनाथ गोविंदा पथकाच्या नारळ फोडणे स्पर्धेस उपस्थित राहण्याचा योग आला.

यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उत्साह, जिद्द आणि एकजुटीचा सुंदर संगम असलेल्या या स्पर्धेने नारळी पौर्णिमेचा उत्साह अधिकच द्विगुणित केला. माझ्यासोबत माझे सहकारी यतिन यशवंत जाधव,
उपविभाग प्रमुख भारत पाटील, म. शाखाप्रमुख सौ. अश्विनी खटावकर, दत्तात्रय जाधव, सुनिल वाघे, स्मिता यादव, अल्पेश पारकर, साईराज परब आदी सहकारी उपस्थित होते.

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब…
शिवसैनिकांच्या संघर्षात प्रेरणास्तंभ आणि सामान्य माणसाच्या दु:खात आधारस्तंभ ठरलेले महामानव...
26/08/2026

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब…
शिवसैनिकांच्या संघर्षात प्रेरणास्तंभ आणि सामान्य माणसाच्या दु:खात आधारस्तंभ ठरलेले महामानव!

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांनी दिलेले समाजसेवेचे धडे आणि विचारांची ज्योत कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या स्मृतींना शतशः नमन!

#दिघेसाहेब #आनंददिघे_साहेब🚩

शिवसेनेचे भायखळा विधानसभा संघटक तथा माझे सहकारी, मित्रवर्य श्री. कृष्णा रेनोसे यांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शु...
18/08/2026

शिवसेनेचे भायखळा विधानसभा संघटक तथा माझे सहकारी, मित्रवर्य श्री. कृष्णा रेनोसे यांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

आपल्या नेतृत्वाला, कार्याला आणि सामाजिक-राजकीय वाटचालीला सदैव यश लाभो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐🚩💐

Krishna Renose

रायगडच्या विकासपर्वाचे नवे शिल्पकार! 🚩रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या विकासासाठी स...
18/08/2026

रायगडच्या विकासपर्वाचे नवे शिल्पकार! 🚩

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेले मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले साहेब यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐

आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची समर्थ साथ लाभल्याने रायगडच्या विकासाला निश्चितच नवी गती, नवी दिशा आणि नवे क्षितिज लाभेल. रायगडच्या सर्वांगीण प्रगतीचे हे विकासपर्व आपल्या नेतृत्वाखाली अधिक समृद्ध होवो, जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळो आणि रायगडच्या उज्ज्वल भविष्याचा पाया अधिक भक्कम होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

भरतशेठ, आपल्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩💐



Development

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना Milind Deora Yashwant Jadhav Yamini Yashwant Jadhav

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥पहिल्या श्रावण सोमवारच्या हार...
17/08/2026

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijay Lipare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vijay Lipare:

Shortcuts

Share